मभागौदि २०२५: लहान मुलांसाठी खेळ: अक्षरचित्रे
कसे आहात बच्चे मंडळी? मजेत ना?
अभ्यास करताय ना? काय म्हणता ? अभ्यासाचा कंटाळा आलाय ?
तुमचा कंटाळा घालवण्यासाठी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक मस्त उपक्रम - अक्षरचित्र
अक्षरचित्र म्हणजे अक्षरांपासून बनवलेली चित्रं. पण ही अक्षरं देवनागरी हवीत बरं का!
तुमची कल्पनाशक्ती लढवून तुम्ही एका अक्षरापासून कितीही चित्रे बनवू शकता. उदाहरण म्हणून ही पहा दोन चित्रे.
