मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

शशक १- चल- अजिंक्यराव पाटील

Submitted by अजिंक्यराव पाटील on 29 August, 2025 - 09:46

हॉस्पिटलबाहेर पावसाने जोर धरलेला असताना ती खिडकीतून पश्चिमेला नजर लावून उभी होती, असाच इंद्रधनू, पण अवकाळी पावसातला. आणि अवकाळी पावसासारखा तो त्यांचा धुंद प्रणय..
"मला नाही जमणार आताच ही जबाबदारी, अबॉर्ट कर.."
लॅपटॉपबाहेर तोंडही न काढता तो म्हटला होता..
5 महिन्यात सात जाऊन एकच रंग उरला होता, काळपट करडा.. दुखणारे ओटीपोट आवळत असतानाच तिला खोलीतल्या कोपऱ्यातून हाक ऐकू आली..

"आई"

आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.

पातळशी त्वचा, अर्धवट डोळे नाक कान इवलेशे बोटं एका अर्थाने सुंदर पण आणि विद्रुप पण त्याच्या हातात, तिच्या नवऱ्याचा लॅपटॉप?

विषय: 

शशक ३ - हे पान पाहायची परवानगी नाही - अni

Submitted by अni on 29 August, 2025 - 04:25

साल २५२०. मानवाने मंगळावर मायबोली उभारूनही शेकडो वर्षे लोटली होती. आज ती, नव्याने गवसलेल्या सूर्यमालिकेतील मृत पृथ्वीवर प्रथमच मिळालेल्या सजीव संकेतांचं विश्लेषण करत होती. लियोऑप्टसच्या खडकाखाली तिला एक जैविक कोड मिळाला – तो मानव डीएनएशी ९८% जुळत होता. तिने ते वाचायचा प्रयत्न केला पण सतत एकच मेसेज येत राहिला - हे पान पाहायची परवानगी नाही.

"हे शक्यच नाही!" ती पुटपुटली. हा तर माझाच पहिला आयडी.

इतक्यात तिने पाठवलेल्या रोबोटने तिला विपु केली – "ते परत आले आहेत."

.

.

.

.

विषय: 

शशक १- विश्वास - अni

Submitted by अni on 28 August, 2025 - 13:45

आज पासून सेमिस्टर ब्रेक सुरु म्हणजे सर्व होस्टेल रिकामी.
पण ती तिकडेच होती.
झोप येईना म्हणून अभ्यास करत बसलेली.

खुप उशिरा रात्री अचानक तिचा मोबाईल वाजला.
स्क्रीन वरील नाव दिसले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले..

"पप्पा..." – ती घाबरून ओरडली.

दोन वर्षांपूर्वीच तर गेले होते पप्पा.
पण नंबर तर त्यांचाच होता.

काही क्षण शांतता. मग पुन्हा हलका आवाज....

"बाळा, अभ्यास कसा चाललाय?"

ती गारठली.
ओठ थरथरले.

"चांगला... तुम्ही कुठे आहात?"

"कायम तुझ्याजवळच आहे बेटा."

फोन कट झाला.

विषय: 

हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

विषय: 

वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

कृष्णमंत्र!

Submitted by अक्षय समेळ on 13 April, 2025 - 09:56

सोसूनि उन्हाचा चटका जळले तनु माझे
शीतल हवांचा शोध न लागे, दु:ख हे साचे
अंतास आता आरंभ गवसे, मंत्र हा काळा
प्रवास नव्याचा मार्ग खुला, चित्त हे उजळा

परतीत गेले मेघ उमटती, आशा हरपली
वर्षाव होता, संहाराची सीमा गाठली
वाटेवरीती अंधार होता, एकटी झाली
मार्तंड आला, तेजाने दिशा उजळली

सुखसुविधा या येऊनि बसती दारामाजी
स्वप्नांमध्ये फक्त दिसे हे, खरे काही नाही
सुवर्णयुग फसवेपणाने हुलकावणी देते
इच्छा बिचारी, कैद होऊनि थांबुनी बसते

शब्दखुणा: 

तू प्राणप्रिये...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:58

मी देह तरी तू प्राण प्रिये
हि बात आता तू जाण प्रिये
जणू एक तपस्वी जाण मला
मी स्मरतो ते तू ध्यान प्रिये

मज सृष्टी चा तू सूर्य जणू
मी दीपक एक लहान प्रिये
महासागर तू ग प्रेमाचा
मी मिथ्या अभिमान प्रिये

तुज ठाईच मन रमते माझे
तू जगण्याला आधार प्रिये
तुज विन अपुरा आहे मी
तुज संगे मी साकार प्रिये

प्रेम तुझे माझे...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:50

देह माझा, देह तुझा
आज आहे, उद्या नाही
परी प्रेम हे तुझे माझे,
कधी संपणार नाही

वृद्ध झालो जरी तू मी
परी प्रेम ते तरुण,
अन वाढत्या वयात
दाट होई ते अजून

जन्म दुसरा कोण पाही ?
तू मज मिळेल की नाही?
आज आहे तुझ्यासवे
उद्या होणार ते होई

जरी नभ कोसळले
जरी भूमी ही फाटली,
तुझ्या माझ्या या प्रेमाची
किरणे अनंत दाटली...

सांग ना...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:47

का स्वप्नी माझ्या येतेस तू?
का डोळ्यात माझ्या भरतेस तू?
का भान मजला राहिना?
काय जादू मजवर करतेस तू ,?सांग ना...

का एकांती तुजला आठवतो ?
का गर्दीत तुजला शोधतो ?
चेहरा तुझा तो पाहता
का लुप्त होई क्रोध तो,? सांग ना...

का तू हवीशी वाटतेस?
का तुलाच पाहावे वाटते?
काही त्रास तुजला होताच
का डोळ्यात पाणी दाटते,? सांग ना...

का मी तुलाच कळतो ?
का तू मलाच कळते ?
का मन तुझे अन माझे
एकमेकांकडे वळते,? सांग ना...

प्रेम माझं

Submitted by Vishal Madhav Vaidya on 17 March, 2025 - 20:19

डोळे असे तिचे चिंब, जसे पाण्यामध्ये प्रतिबिंब
ओठांवर तिच्या असा साज होता, जसा पक्षांचा चिवचिवाट होता
कपाळाच्या आढ्यावर ती वेगळीच वाटायची,
रागात असल्यवर मला ingore करायची
ओठावर तिच्या एक वान होता,
तिला नजर न लागण्याचा तो साज होता
हसलेली मला ती खूप आवडायची,
कधी कधी तिची मला भीती पण वाटायची
ती रूसायची, चिडायची, रडायची,
मनवायला तिला मजा पण यायची
स्वतःपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करायची,
रागाच्या भरात काही पण बोलायची
प्रेम ती माझ्यावर खूप खूप करायची,
माझ्या प्रत्येक गोष्टीत सोबत असायची

Pages

Subscribe to RSS - मायबोली