लेखन

संवाद : BMM २०२६: उत्तररंग सह-अध्यक्षा (co-chair) - श्रीमती उषा आडगावकर

Submitted by सुखदा देवधर on 17 July, 2026 - 13:30

नमस्कार मंडळी!

बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.

विषय: 

गेले करायचे राहून - सोनू.

Submitted by सोनू. on 25 September, 2026 - 15:55

एखादी गोष्ट करायची ठरवली तर कधी ना कधी ती पूर्णत्वाला न्यायची इच्छा अगदी तीव्र होते आणि कधी अनायसे तर कधी जाणीवपूर्वक, ती घडते. माझ्या बकेटलिस्ट बद्दल मी याआधी लिहिलं आहेच आणि अजूनही त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी पूर्ण करतेच. किंबहूना कामंधामं सोडून मनाला येईल तसं जगणच सुरू आहे माझं बऱ्याच वर्षांपासून. पण आत्ता लिहीतेय माझ्या राहून गेलेल्या इच्छेबद्दल.

विषय: 

गेले करायचे राहुन - प्रज्ञा९

Submitted by प्रज्ञा९ on 25 September, 2026 - 15:11

मला वेळेत जमण्यासारखा वाटलेला हा एकच उपक्रम, पण प्रत्यक्ष वेळ गाठायला भारतात आत्ता रात्रीचे पावणेबारा वाजले आहेत. त्यामुळे हे लिखाणही "गेले लिहायचे राहुन" होणार असं वाटायला लागलं होतं. पण शेवटी सगळं अवसान गोळा करून बसले आहे, थोडं मनमोकळं व्यक्त व्हायला.

विषय: 

गेले करायचे राहून - सावित्रीच्या लेकी

Submitted by सावित्रीच्या लेकी on 25 September, 2026 - 11:52

मायबोली सदस्य होऊन पाच वर्षे झाली
आजपर्यंत मी काहीही लेखन केले नाही
दरवर्षी गणेशोत्सवाचे विषय बघून आपण काहीतरी लिहायचेच असं ठरवते
पण दरवर्षी गणेशोत्सव संपल्यावर लक्षात येते
गेले लिहायचे राहून

विषय: 
शब्दखुणा: 

पहिला विमानप्रवास -mrsbarve

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 10:29

पहिला विमानप्रवास :
लग्न झालं आणि तीन चार दिवसात व्हिसा च्या कामासाठी मुंबईला जायचं होतं ! इन मिन पाऊण तासाचा विमान प्रवास होता . घरची सगळी मंडळी झाडून ! विमानतळावर आलेली ! दिरांच्या छोट्या चार वर्षाच्या मुलीला विमानतळ जाम आवडलं. तिने त्या गुळगुळीत चकचकीत फरशीवर बैठक मारून पाहिली होती ते आठवत. मग चकचकीत स्वच्छ रेस्टरूम मधला टोयलेट पेपर ची लांब पट्टी तोडून तो बाहेर घेऊन आलेली आणि रिबन सारखी त्या बरोबर खेळत होती. नुसता दंगा चालला होता , तिची आई बिचारी नाकी नऊ आल्याने काय करायचे ते कर अशा पावित्र्यात होती.

विषय: 

कहाणी माझ्या गौराईंची - मृण्मयी

Submitted by संयोजक on 25 September, 2026 - 05:26

Gaurai_1.jpg
शीर्षकात माझ्या गौराई लिहिलं आहे. गौराई, आमच्याकडे विदर्भात महालक्ष्म्या म्हणतात. ध्यानीमनी नसताना अंगावर आलेली जबाबदारी. जबाबदारी म्हणू की आशीर्वाद? त्यांचे त्यांनाच ठाऊक.

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : शर्मिला.

Submitted by शर्मिला. on 25 September, 2026 - 03:01

माझा पहिला विमान प्रवास

बैलगाडीच्या, अन् तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काटकसर म्हणून पॅसेंजरने प्रवास (तोही वर्षातून एकदाच) करणाऱ्यांच्या काळात जन्मलेल्या मला, विमानप्रवास कधी स्वप्नातही आला नव्हता.
आकाशात उडण्याची स्वप्न पडायची, ती मला पंख फुटले म्हणून! विमानाचा संबंध म्हणजे, त्याचा आवाज आला की धावत अंगणात जाऊन आकाशाकडे बघणं एवढाच होता. पण त्याचं कधी वैषम्यही नव्हतं. आपण पंतप्रधान नाही किंवा आपण कुठले राष्ट्रप्रमुख नाही ह्याचं वैषम्य तरी कुठे असतं! विमान तेवढंच लांब किंवा उंच होतं आमच्याकरता.

विषय: 

गेले करायचे राहुन - अंजली_१२

Submitted by अंजली_१२ on 24 September, 2026 - 16:25

या विषयाने थोडा विचार करायला भाग पाडले.

माझं काय करायचं राहून गेलंय आठवतेय- आणि चक्क काही सुचतच नाहीये..

सगळं जगून बिगून झालं की काय असा एक डिटॅचमेंट मोड वगैरे ऑन झाल्याची शंका यायला लागली.

विषय: 

गेले करायचे राहून - सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 11:06

मला सकारात्मक आणि एकदम व्हायव्हॅशिअस आणि गर्विष्ठ , स्वाभिमानी, सुगरण, नवर्‍याची लाडकी, एक चांगली आई वगैरे वगैरे व्हायचे आहे.
त्याकरता मात्र नवीन जन्मच लागणार आहे.
मला तूळ लग्न (स्वाती नक्षत्र) - आमच्या श्रीपादांचे लग्न नक्षत्र.
सिंह रास (मघा नक्षत्र)
आताचाच शुक्र (अनुराधेचा, वृश्चिकेतला) हवा आहे.
आताचेच चंद्र-शुक्र आणि नेपच्युनचा त्रिकोण हवा आहे.
-----------------------------------------------------------------------

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 24 September, 2026 - 06:34

माझा पहिला विमानप्रवास

माझ पहिला विमान प्रवास हा विषय लयच भूतकाळातला आहे. तरी पहिला म्हणून अजून लक्षात आहे. विमान काय साधा एष्टीचा प्रवास ही सामान्य नसलेल्या काळातली मी आहे. लाल डब्याच्या प्रवासाच ही अप्रूप वाटे तेव्हा कारण एकंदरच प्रवास तसा दुर्मिळच होता. ना प्रवासाची साधने होती ना खिशात प्रवासाला लागणारा पैसा होता. आमच्या मागच्या पिढ्या कधी कुलदेवतेच्या दर्शनाला ही बाहेर पडल्या नाहीत. कोकणातून थेट आंबेजोगाई गाठणं म्हणजे आज परदेशात जाणं सोपं एवढं कठीण होतं .

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन