माणुसकी

Submitted by FundooPriya on 8 July, 2009 - 22:52

आयुष्य कसे जगावे माणसाने भरकटलेल्या या जगात...

करोडो माणसे असुनही टिचभर माणुसकी नाही
मरुन पडले तरीही विचारपुस नाही

माणसांबरोबर धर्म वाढले अन देवही
देवपण मात्र देवळातही सापडत नाही

गरीब राहतो गरीब श्रीमंत होतो आणखी श्रीमंत
पैशांशी खेळणार्‍या लोकाना कसली आहे खंत

उमलण्या आधीच कळ्या होतात आतंकवादी
राजकारणात फ़क्त चालवायची असते गादी

भ्रष्टाचार शिष्ठाचार देवळातही चालतात
नेते, अभिनेते सरळ गाभाय्रात घुसतात

माणसांच्या अत्याचाराबरोबरच निसर्गही कोपतो
मग मात्र माणुस माणुसकीला हाक मारतो

गुलमोहर: 

छान लिहिलय!