तुझी उणीव...

Submitted by FundooPriya on 7 July, 2009 - 00:12

पहाट सारी गारठली आहे
सारं जग साखरझोपेत आहे
मी मात्र जागीच आहे
कारण तुझी थाप नाहीये..

चहाचा घोट घेत आहे
पहिला घेतला दुसरा उतरत नाहीये
कारण दुसरा घोट तुझा आहे
आणि तु सोबतीला नाहीये..

रस्त्यावरुन चालत आहे
रिमझिम पावसात भिजत आहे
या भिजण्याला अर्थ नाहीये
कारण तुझी ऊब नाहीये..

कॉलेजचा कट्टा गजबजला आहे
मित्र-मैत्रिणींचा गलका आहे
त्या गप्पांमध्ये आता रस नाहीये
कारण तुझा आवाज नाहीये..

ती बघ आपली टपरी आली
गरमागरम भजी खुणावत आहे
त्या भज्यांना आता चव नाहीये
कारण घास भरवायला तु नाहीये..

नदीकाठची सांज फुलत चालली आहे
हवेची झुळुक अंगावर शहारा आणत आहे
ही गोड थंडीही आता बोचरी वाटत आहे
कारण जवळ घायला तु नाहीये..

हळुहळु चांदण पसरत आहे
चंद्रानेही हजेरी लावली आहे
मला मात्र सार फिक फिक वाटत आहे
कारण आज चांदण्यात तु दिसत नाहीये..

गुलमोहर: 

वा ... अतिशय प्रांसगिक. खुप छान.

सस्नेह
देवनिनाद

छान. एकटेपणाचा संसर्ग होत चालला काय माबोवर. भजी शेअर करणे मला अजुनही अवघड जाते.

ह्म्म्म्म्म्म्म Happy

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

पियु अप्रतिम.....