या वर्षी पावसाने खुप वाट पहायला लावली... जणु काही तो माणसाला आपलं महत्व पटवुन देऊ इछित होता.... गावाकडे सगळे शेतकरी आकाशाकडे डोळा लावुन बसले होते... रोज पेपर मध्ये त्यांच्याबद्दल वाचुन मन भरुन येत होत... अजुन ही सगळिकडे पाऊस पोहोचला नाहीये.....
या कवितेच्या रुपाने मी ही वरुन राजाला साकडं घालत आहे...
शेतकरी आणि शेतकरीण आकशाकडे पहात आहे. शेतकरीण खुप उदास आहे आणि तिचा धनी तिची समजुन काढत आहे..
नको लावु जीवा घोर, बरसलं त्यो घन राजा
त्याला आहे गं काळजी, नको जाळू तु जीवाला
त्याला हायं ठावं सार्या लेकरांचं हालं
उशेरा का व्हइना, त्यो नक्किच बरसलं
त्यानच गं ही सारी धरा वसविली
त्यानच गं ही पालवी फुलविली
गुर ठोरं गं त्याला आशीर्वाद देई
किड्या-मुंग्यांना पन त्यो जीवन देई
किती जीव त्याने जपले गं आजवर
केली धरा शांत त्याने अगदी खोलवरं
सुधारला गं मानुस त्याच्याच मदतीनं
झालं जिमिनीचं सोनं त्याच्याच कृपेनं
त्यो हाये गं बाये लई उदार मनाचा
आज एथं उद्या तिथं, हाय त्यो सगळ्यांचा
रान-वन बहरली, फुलांना सुगंध त्याचा
शेतं तरारली, पाठीराखा त्यो सार्यांचा
मानुस झाला गं मोठा, त्याने ठेवली नाही जाण
मोठा होता होता, त्यो विसरला भान
घरं बांधली मोठाली केली धरा वस्त्रहीन
उजाड केली गं सारी वनं माळरानं
म्हनुनचं गं बये घन राजा हा रुसला
येतो येतो मनुन बघ कुठं निघुनी गेला
रानं वनं टेकड्या त्याचे होते गं सवंगडी
आता कोनासाठी बरसल उघडी झाहली पहाडी
पन तु नको सोडुस धीर हाये विस्वास माझा
कळलं त्याला आपलं दुख, दूर करी त्यो राजा
मानुस चुकला मनुन त्यो नाही गं तसा वागायचा
थोडा का व्हईना, त्यो करलं शांत धरेला
चला रं सगळे मिळुन साकडं घालु त्याला
परत न्हाय चुकी व्हनार वचन देतो तुला
फुलवु धरा परत जपु या खजिन्याला
तुझीच लेकरं आम्ही ये ना आशीर्वाद दायला
खुप छान ...
खुप छान ... आवडली
मस्त...
मस्त...
सुंदर.... पन
सुंदर....
पन तु नको सोडुस धीर हाये विस्वास माझा
कळलं त्याला आपलं दुख, दूर करी त्यो राजा
जबरदस्त आत्मविश्वास आहे
त्यामुळे तो आता यायला लागलाय.