Submitted by FundooPriya on 26 June, 2009 - 15:00
जीवनाच्या वळणावर काटेरी कुंपणावर
उमलले एक फुल तुझ्या माझ्या मैत्रीचे....
आठवतात का ते दिवस लहानपणीचे
चटकदार लोणचे आवळा, कैरीचे
मांडलेला तो खेळ सारीपाटाचा
गंध अंगाला ओल्या मातीचा
शाळेतील दिवस, रागावणे गुरुजींचे
उमलले एक फुल तुझ्या माझ्या मैत्रीचे....
अंगणातला पाऊस पहाटेचा गार वारा
तुझ्या-माझ्या मैत्रीने वेचल्या त्या गारा
अंगणातली अंगतपंगत, दोर पतंगाचा
घरकुलातली भांडीकुंडी, खेळ जिबल्यांचा
बहरले ते दिवस तुझ्या माझ्या संगतीचे
उमलले एक फुल तुझ्या माझ्या मैत्रीचे....
उमलत्या फुलाला आपल्या मैत्रीचे खत
येतील का ते दिवस फिरुनी परत
वेगळ्या झाल्या वाटा पण स्वप्न होत एकच
भेटुया परत होती आस एकच
महत्व नाही कळणार जगाला या वेड्या मैत्रीचे
उमलले एक फुल तुझ्या माझ्या मैत्रीचे....
गुलमोहर:
शेअर करा
फार सुरेख
फार सुरेख
छान..
छान..
छान !! असच॑
छान !! असच॑ मस्त लिहित रहा..शब्दप्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा....
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
उमलत्या
उमलत्या फुलाला आपल्या मैत्रीचे खत
येतील का ते दिवस फिरुनी परत
वेगळ्या झाल्या वाटा पण स्वप्न होत एकच
...... भेटुया परत ....
छान .
च टका
च टका लावऊन गेली