प्रेम

Submitted by हेमंत पुराणिक on 23 June, 2009 - 09:02

नकळत आपुले प्रेम हे जुळले
तू मज बघता मनी मी लाजले
तुला बघितले मी तुला बघितले

तू मज बघता गाली हसले
शब्द ओठीचे अबोल झाले
मुकेपणाने मी तुज हेरले

तुझे नी माझे प्रेम जुळले
प्रीत पाखरा पंख फुटले
प्रीत फुलाला चुंबुनी गेले

स्पर्श साजणा सांगुनी गेले
हृदय थबकले स्तब्ध जाहले
भ्रमर ज्योतीचे नाते कसले

ओठ चुंबण्या अधिर जाहले
हातानी तुज कवेत बांधले
दोन जीवांचे नाते जुळले

गुलमोहर: 

न म स्का र ...........
मस्तच ......... मस्त...... ना द खुळा..........