प्रश्नावली

Submitted by पॅडी on 10 March, 2024 - 00:36

सांग कुणाच्या श्रध्देमधून
उगवलास पहिल्या प्रथम,
कुणी केले लाडकोड अन् -
निगुतीने भरणपोषण...?

कुणी घातले पाळण्या- बिळण्यात
मुंज, लग्न, नामकरण,
वाऱ्या- बाऱ्यात लावली रांग
कोण आले पहिले शरण...?

काय प्रिय काय वर्ज्य
कुणी ठरवले विधी-निषेध ,
बेल फुले धूप दीप
केला कुणी बुध्दीभेद..?

वस्त्र शस्त्र शंख चक्र
दागिन्यांनी कुणी मढवले,
मूषक मोर गरुड नंदी
पशूपक्षांवर कुणी चढवले...?

उपास रोजे नैवेद्याची
कुणी बनविली मेन्यूकार्ड ,
मोदक मेवा मटण मुर्गा
कोणी केला राडा द्वाड...?

स्वर्ग नर्क मुक्ती- बिक्ती
लंब्या -चौड्या गप्पा-टप्पा,
संसाराच्या धबडग्यात तू -
निर्गुणनिराकार कसा बाप्पा...??

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

wow!

छान..

संसाराच्या धबडग्यात तू -
निर्गुणनिराकार कसा बाप्पा...??

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

सुंदर....