तुमचा आवडता/आवडती कॉमेडीयन कोण आहे?

Submitted by वर्षा on 1 February, 2024 - 22:09

स्टॅन्ड अप कॉमेडी बघता का?
तुमचा आवडता/आवडती कॉमेडी आर्टीस्ट / इन्फ्ल्युएन्सर कोण आहे?
मला अय्यो श्रद्धाचा कंटेंट आवडतो . कॉर्पोरेट विश्वावर विनोद करणार्‍या आणखी एकाचा हिंदी कंटेंट आवडला होता पण त्याचे आता नाव आठवत नाहीये. इथे अमेरिकेत झरना गर्ग बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे असे दिसते.
त्यामुळे इंग्रजी/हिंदी/मराठीतील तुमचे आवडते कलाकार येऊ द्यात. रेको प्लीज. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला कोणालाही खूप बघितलं की तोचतोचपणा लक्षात येऊन कंटाळा यायला लागतो. खूप पूर्वी रसेल पिटर्स आवडायचा. आता तो ही त्याच त्याच टाईपच्या जोक्समुळे आवडेनासा झाला. दोनेक दिवसांपूर्वी झाकीर खान पाहिला जो आवडला. त्याचं कंटेंट एकदम फ्रेश वाटलं.
अय्यो श्रद्धा कधी आवडते, कधी नाही. सेम विथ झरना गर्ग.

छान धागा
हल्लीच मला आवडू लागलाय हा स्टँड अप कॉमेडीचा प्रकार. अधेमध्ये नजरेस पडेल तेव्हा बघतो पण आवर्जून शोधून बघत नाही कारण नेमके काय शोधायचे याची कल्पना नाही.
इथे लोकं सुचवतील त्याचा फायदा होईल. धागा फॉलो करतोय...

सध्या अमित टंडन आवडतो. राजू श्रीवास्तव ' गजोधर ' साठी आणि एकंदरीतच आवडायचा. बाकी हिंदी वाले बरेच बघते, पण ठराविक लोकांचे ठराविक कंटेंट आवडतात, सगळेच आवडतात असं होत नाही. बऱ्याच जणांच्या बाबतीत ओढून ताणून वाक्यागणिक स्लॅंग शब्द नकोसे होतात. तरी अतुल खत्री, बस्सी, उपमन्यु, सेबॅस्टियन, झरना गर्ग इत्यादींचे काहीकाही खूपच मस्त आहेत. पण पुढे तोच तोच पणा येतो.
अमित टंडन चे सगळे बघण्या/ ऐकण्यासारखे आहेत.
बस्सी - वॅक्सिंग, हॉस्टेल सारखे काही.
उपमन्यू - क्राईम पेट्रोल वर एक आहे, दिल्ली आणि मुंबईतील लोकांमधला फरक असे काही.
अतुल खत्री - जस्टिन बिबर च्या वाशीतील concert वरचा भाग.
वरुण ग्रोव्हर - सिक्युरिटी चेक

मॅक्स अमिनी
जीमी कार
ह्या दोघांचेही आवडतात!

ट्रॅव्हर नोव्हा!! तळमळीनं बोलतो. विनोदामागे एखादी भुमिका, एखादा विचार असतो बरेचदा, जो विनोदी शैलीतून कळकळीनं मांडतो.

अमित टंडन, जेरी साईनफिल्ड क्लीन विनोद करतात. मला स्टँड-अपच्या नावाखाली, शिव्या आणि अपमान हे कम-अस्सल दर्जाचे परफॉर्मन्सेस वाटतात.

अमिनी आवडतो.
ट्रेवर आवडतोच. शिव्या आणि अपमान यांचं गणित जमलं तर ते पण आवडतात. क्लीन आहे का नाही याला मी महत्त्व देत नाही. रादर हसू आलं की झालं. मुलं जवळ नाहीत ते बघून.

वा ! काय मस्त प्रश्न..

पूर्वी राजू श्रीवास्तव, सुनील पाल आवडले होते.

अय्यो श्रद्धा मध्ये खूप बघायचे, पण आता थोडा मोठा pause झालाय.

Trump होता तेव्हा Jimmy Kimmel, Stephen Colbert, Steve Meyer, आणि Trevor Noah regularly बघायचे.
पण त्यांच्यात Trevor Noah आवडायचा. तिकडे

परवाच Trevor Noah च where was I बघितलं आणि आज हा प्रश्न

आण्टी झरना आधी थोडी interesting वाटली पण नंतर थोडी लाऊड आणि बोअरिंग वाटायला लागली.
हसन minaj पण कधी आवडलेला. एकदा दोनदा fluffy pan आवडलेला.

Netflix वरती Steve Martin Cha ek show होता तो पण मस्त होता.

आता वाटतंय. अख्खा निबंध लिहिला..

हो एखाद्याचा सातत्याने सर्वच्या सर्व कंटेंट आवडणं जरा कठीणच आहे. पण अय्यो श्रद्धाचा बहुतेक आवडलाय - आई-वडील-मुलगी त्रिकूट , ती एक कॉर्पोरेट वर्कर म्हणून, आणि मिसेस कुलकर्णी - हे तिन्ही त्याच क्रमाने आवडतात.
तिचे कॉर्पोरेट दिपावली गिफ्टींग, लेऑफ विषय मस्त होते.
अनघा_पुणे, कुणाचा स्पेशली कुठला भाग्/कंटेंट आवडला हे लिहिलंत हे चांगलं केलंत. ते शोधून बघते.

मी फार बघितले नाहीत.
शेखर सुमनचा तो जुना शो (नाव आठवेना)
आणि ट्रेव्हर नोहा आवडतात.
वर उल्लेख आलेली कित्येक नावे माहिती नव्हती. बघायला पाहिजे.

मी आजकाल माझ्या स्क्रिन टाईम मधे शक्यतो स्टॅंडअप कॅामेडीच बघतो. त्यातल्या त्यात माझे आवडते कॅामेडीअन्स….

झाकीर खान
वरून ग्रोव्हर
विपुल गोयल
अमित टंडन
बस्सी
गौरव कपुर
Trevor Noah
Gabriel Iglesias
कुणाल काम्रा
Mohd suhel

या धाग्यावर खरेतर आवडलेल्या व्हिडिओजच्या लिंक्स टाकायला हव्यात म्हणजे आपण काही मिसलं असेल तर पाहता येईल.

ओके मला वर्क फ्रॉम होम्/ऑफिस विषयावरचा ज्याचा कंटेट आवडला होता त्या रवि गुप्ताचा हा भाग सापडला, त्यातही सर्व नाही पण काही भाग आवडलेला/पटलेला :लोल : https://www.youtube.com/watch?v=2SaqWINtD3A

The great Indian laughter challenge नावाचा स्टँड अप कॉमेडी शो होता. शेखर सुमन आणि सिद्दु जज्ज असायचे.

अभिषेक उपमन्यू
डेव्ह शपेल
जॉर्ज कार्लिन
क्राउड वर्क वाले एकदोन आहेत जे युट्यूब शॉर्ट फिड मध्ये येत असतात (नावे लक्षात नाहीत) ते पण चांगले आहेत.

@WallE': हो, movers and shakers , धन्यवाद.

Jimmy Yang ची reels pan chha. असतात.

जास्त करून Asian पालक किंवा त्याची background aani America अस काही असतं.

आद्य स्टँड अप कॉमेडियन - पु ल देशपांडे.

वरुण ग्रोव्हर आणि अय्यो श्रद्धा लक्षात आहेत. इतर कोणाचं एकापेक्षा जास्त वेळा पाहिलं नसावं.

अय्यो श्रद्धा स्टँड अप असते की सिटिंग डाउन?

अमित टंडन
ट्रेव्हर नोआ
राजशेखर मामिडाना, केन्नी सबॅस्टियन - दोघांचं क्राउड वर्क चांगलं आहे.
ऐय्यो श्रद्धाचे जाहिरातबाजी नसलेले भाग
मंदार भिडे, वरुण ठाकूर आणि वरुण ग्रोव्हर या मंडळींचे १-२ बरे वाटले, पण बाकीचे नाही
वरुण ठाकूर आणि चौकडीचे द इंटरनेट सेड सो - काहीकाही भाग धमाल होते. ते लोक फार काही भारी नाहीयेत, पण म्हणूनच त्यांच्या एकेका गोष्टीवर कमेंट्स बघायला मजा येते. सध्या कंटाळा आला आहे.
-------------

शेखर सुमनचा तो जुना शो (नाव आठवेना) >> रिपोर्टर Wink

झाकीर खान
अनुभव सिंग बस्सी - जनरली आवडतोच. पण यूपीएससी, वॅक्सिन्ग वगैरे खासच होते.
अतुल खात्रीचा जस्टीन बिबर वाला एपिसोड आवडला होता. पण तो कधी कधी डोक्यात जातो.
एक अगरवाल आहे तो मारवाडी आणि एकंदर बनिया जमातीची जाम खेचतो
ट्रेवर नोहा
देसी फॅमिली का असे काहीतरी आहे ना ज्यात आई, आजी, मुलगी व तिची मैत्रीण असते. ते शोजही आवडतात.
शाझिया मिर्झा
भा डी पा मधली लीना भागवत. एकंदरीत तिचे कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे

झाकिर खान कॉमेडी पेक्षा जिवना वर बोलू काही टाईप्स असते आणि आवडून जाते कारण तो आव आणत नाही कधीच..
अभिषेक उपमन्यू -- हा माणूस अफलातून आहे..त्याचे ते खरगोश, कछुवा नोनसेन्स कॉमेडी असली तरी जाम हसू येतं..
गौरव कपूर- कुठे ही अपमान नाही पण तरी धमाल कॉमेडी सेन्स आहे ह्याला. नक्की बघा, फॅन व्हाल.

केनी सेबास्टियन- खूप आधी व्हिडीओ यायचे ह्याचे. पण आता शो वरच करतो.

बिग बॉस विनर फारुकी चे ही काही व्हिडीओ मस्त आहेत, स्पेशली गरीब लोक लग्ना ला जातात आणि मिळेल तिथे राहतात, पडेल ते काम करतात वाला विडीओ. ह बि बॉस वर येण्या आधी पासूनच माहित आहे.
अमित टंडन- मार्मिक आणि खुसखुशित.

कॉमिक फेमस होण्या पुर्वी युट्युब वर कन्टेंट बनवून ठेवतात, मग नाव झाले की शोज मधून आवक सुरू होते..असा साधारण प्रकार असतो.

एक अगरवाल आहे तो मारवाडी आणि एकंदर बनिया जमातीची जाम खेचतो>>> तो विकी कोशल सारखा दिसणारा का? तो पब्लिक चा फार अपमान करतो..आवडत नाही फारसा..

स्टॅन्ड अप कॉमेडी -
गौरव कपूर (सगळेच मस्त आहेत, "बचपन का प्यार" माझा favourite!)
आकाश गुप्ता ("जूनियर कॉलेज" आणि "चाइल्डहूड ड्रीम्स" पर्सनल favourites)
आशिष सोलंकी (क्लीन कॉमेडी असते, "बेहेन की शादी" खूप खूप अमेझिंग आहे!)

बाकी कॉमेडी videos साठी-
कॅप्टन निक ( निहारिका सिंहचं चॅनल आहे, खूप मस्त videos असतात, aiyyo shraddha चा कंटेंट आवडत असेल तर कॅप्टन निक मस्ट वॉच आहे. आई बाबा, ती आणि भाऊ पुच्चू असे सगळे roles ती करते.)
मला आवडलेले काही-
https://www.youtube.com/watch?v=nQgRNelV8u4
https://www.youtube.com/watch?v=ErSpF88XBmE&t=522s
https://www.youtube.com/watch?v=vtXI8yC3AoQ&t=6s
https://www.youtube.com/watch?v=-t_IURkb_54
अजून आठवलं काही तर सांगेन...

Pages