आवेग

Submitted by श्वेतपर्ण on 19 December, 2023 - 02:05

का लाट होऊन धावले
तुझ्याकडे खड्का ?
पाहण्या का कोरल्या
जुन्या लाटांच्या जखमा ?

सांधण्या अंतर प्रेरित मला
क्षणोक्षणी तुझे आवेग,
पाहताच तुला कोसळले
हृदयी चे सगळे संवेग.

ना आवरले मला घट्ट
तुला मिठी मी मारली,
सांगत होती काया तुझी
अशी ना मी पाहिली.

बरेच झाले भेटले
मला पाण्याचे सर्वांग,
नको दिसाया आसवे,
अन् जानवाया हृदयभंग.

मीच खिन्न आता
या किनारी पसरले,
होऊन पाणी ,आवेग
सारे पाण्यातच विरले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults