लेखन उपक्रम - २- संन्यास- दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 September, 2023 - 09:25

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
ती केसांची केरसूणी झालेली, मळकट कपड्यातली , नजर शुण्यात लावलेली, अस्थिपंजर म्हातारी. स्थळकाळ विसरलेली. सर्वस्व हरवलेली.
एवढ्यात याच्या ओळखीचा हिमालयात परतणारा साधूंचा जथ्था फलाटावर आला‌. गाडीत बसला. यानं खुणेनेच त्यांना सांगितलं मी येतो.
त्यानं संन्यास घ्यायचा दृढनिश्चय केला होता . एका मठात प्रवचनासाठी गेला असता त्याची काही साधूंची नियमित भेट व्हायची. त्यातूनच त्याचा हा विचार बळावला.
एवढ्यात एकाएकी ती म्हातारी असंबद्ध बडबडायला लागली. मधेच थांबून अंगाई म्हणू लागली.
बाळा जो जो रे.
गाडी सुरू झाली. साधू त्याला बोलवू लागले. पण त्याचे पाय फलाटात घट्ट रुतले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान, वेगळ्या धाटणीची.

प्रव्रज्या अनेकदा खुणावते, खोटे का बोला ? पण तेच .... पाय रुततात Happy

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....
>>>>प्रव्रज्या अनेकदा खुणावते, खोटे का बोला ?>>>>
अनिंद्य समजलो नाही.... Happy

ओह मला वाटलं मायबोलीवर वापरलं जाणारं एक शब्दास्र आहे का... एक नवीन शब्द समजला.
धन्यवाद Happy
सध्या मला एक संन्यासी आवडतात...गौरगोपाल....
तुम्ही गेलात तर दोन होतील. Happy

>>>>संन्यास हवं ना?>>>
भरत दोनदा धन्यवाद
सुधारणा करतो...

छान

Pages