उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् - -आजचा दिवस माझा- - अतरंगी

Submitted by अतरंगी on 20 September, 2023 - 11:51

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

तो मान वळवणार तितक्यातच तिनेही त्याच्याकडे पाहीले…. नजरेला नजर भिडली….. तिने एका नजरेत त्याच्या डोळ्यातले भाव वाचले… तिला त्याचयवेळेस कळून चुकले की ती ज्या क्षणांची ईतकी वर्षे वाट पहात होती तो क्षण आज आला आहे….

त्याने हळूच प्लॅटफॅार्मच्या ज्या बाजूला कोणी नसते त्या दिशेला चालायला सुरुवात केली. एक अनामिक सुखद लहर तिच्या अंगात फिरली. ती लगोलग त्याच्या मागोमाग चालायला लागली…..

ईतक्या दिवसात जे घडले नाही के आज घडू शकेल या जाणिवेने त्याच्याही ह्रदयातली धडधड वाढली…. तिला मागे येताना पाहून त्याच्या पावलांचा वेग अजूनच वाढला.

एकदाची ती त्याच्याजवळ पोचलीच….

त्याच्या खांद्यावर हात ठेवून मनातील आनंद चेहऱ्यावर व आवाजात न दाखवता शक्य तितक्या नियंत्रित टोन मधे तिने विचारले…..

“ भाईसाहब, टिकट दिखाईये…..”

.
.
.
.
.
.
.
.
.

First woman ticket checker to collect Rs 1 crore fine from passengers earns railway ministry’s plaudits>>>>

https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/first-woman...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यला सुरुवात केली. एक अनामिक सुखद लहर तिच्या अंगात फिरली. ती लगोलग त्याच्या मागोमाग चालायला लागली…..

ईतक्या दिवसात जे घडले नाही के आज घडू शकेल या जाणिवेने त्याच्याही ह्रदयातली धडधड वाढली…. तिला मागे येताना पाहून त्याच्या पावलांचा वेग अजूनच वाढला.>>>> हे वाचत असतानाच वाटलं की ती टीसी आहे

छान आहे

मस्त Happy

Pages