उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् - -Gold Digger - - अतरंगी

Submitted by अतरंगी on 20 September, 2023 - 03:11

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...

ती आजही कॅालेजला असताना दिसायची तशीच अगदी सुंदर दिसत होती….. पण आता गळ्यात मंगळसुत्र होतं. चेहऱ्यावरच्या चकाकी लग्न मानवल्याची साक्ष देत होती.

क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून कॅालेजचे ते जादुई दिवस तरळून गेले. सोबत फिरणं, हॅाटेलिंग, शॅापिंग….. नंतर आपल्याशी ब्रेक अप झाल्यावर तिने केलेलं ॲरेंज मॅरेज…..

जाऊ दे… गेले ते दिवस…

चला, बाकीचे येतील तेव्हा येतील, आपला चहा झाला, आपण कशाल ऊगाच वेळ वाया घायवायचा……

असं म्हणून त्याने बॅग ऊचलली आणि पहिली आरोळी दिली……

“ए चाय बोलो चाय चाय चाय…..

गरमा गरम चाय…..”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे! त्याच्याकरता अरेरे. तिच्याकरता नो जजमेन्टस अ‍ॅट ऑल!! Happy

ओह्ह! Happy भारीच जमली आहे

>> सेम फेसबूक इन्स्टावर रील्स असतात
तेच का, चौकात बाईकवर नवराबायको सिग्नलला थांबलेले. आणि एक वेडा भिकारी येतो जो तिचा पूर्वी प्रियकर असतो :प