समृद्धी महामार्ग

Submitted by जावेद_खान on 8 July, 2023 - 01:31

सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?

Group content visibility: 
Use group defaults

मी ऐकून आहे दुबई मध्ये असा नियम आहे.
अपघात मध्ये नुकसान झालेल्या गाडी ची दुरुस्ती कोणताच garaje वाला करू शकत नाही ..
जर त्याच्या कडे त्या अपघात ची सरकार दरबारी नोंद झाली नसेल तर.
अगदी किरकोळ अपघात झाला तरी त्याची नोंद पोलिस मध्ये होण्या साठी ह्या नियमाचा चांगला उपयोग होतो.
अपघात लहान असू किंवा मोठा .
त्या मागे ड्रायव्हर चे वर्तन हे समान असते.
निष्काळजी पना, नियम मोडण्याची वृत्ती,मानसिक विकृती.
हे समान असते.

मटा एक मुलाखत बघितले त्या तज्ञ व्यक्ती चे विचार पटले.
१) भारतात जे टायर वापरले जातात ते डांबरी रोड लक्षात घेवून च बनवलेले असतात..
सिमेंट च्या रस्त्यावर जास्त घर्षण होते आणि टायर फुटण्या ची शक्यता वाढते
Tyre ४० हजार किलोमीटर पेक्षा जास्त वापरले असतील तर कमजोर झालेले असतात.
२) समृध्दी वर जे दिशादर्शक बोर्ड आहेत ते चुकीच्या
व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे.
Technicaly पूर्ण चुकीचे आहेत.
अक्षर न साठी जो रंग वापरला तो चुकीचा आहे.
बोर्ड ची size आणि जागा हे पण चुकीचे आहे.
जवळ गेल्या शिवाय तो बोर्ड दिसत नाही.दिसला तर त्या वर काय चिन्ह आहे किंवा काय लिहाल आहे हे पण दिसत नाही.
इतक्या वेगात जेव्हा अचानक माहीत पडते आपले ठिकाण च फाटा आलेला आहे तो पर्यंत गाडी पुढे निघून गेलेली असते.
किंवा अचानक ब्रेक मारल्या मुळे अपघात होतो.
३) संमोहन होते हे तर कारण आहेच.
४) divider चे दगड आणि त्याच्या आत असलेली लोखंडी पट्टी ह्या मधील अंतर बऱ्याच ठिकाणी योग्य नाही
गाडी चे चाक जेव्हा divider ला घासत जाते तेव्हा गाडी परत रस्त्यावर येते.
पण जी आतमध्ये लोखंडी पट्टी लावली आहे ती चुकीच्या ठिकाणी असेल तर गाडी ची बॉडी त्या वर घासली जाते आणि ठिणग्या उडून गाडी पेट घेते

<< Tyre ४० हजार किलोमीटर पेक्षा जास्त वापरले असतील तर कमजोर झालेले असतात. >>

-------- किती हजार किमी यापेक्षाही हे अंतर कुठल्या रस्त्यांवर (डांबरी, निव्वळा खडकाळ, काँक्रिट... खड्ड्यांनी भरलेला ) वाहन धावले आहेत , किती लोड त्यांनी वाहून नेला आहे हे महत्वाचे आहे ( मेट्रिकटन-किमी असे एकक वापरा ).

सर्वात सोपे म्हणजे प्रवासा आधी टायरचे visual inspection करणे, टायर डेप्थ मोजणे ( चपटी रुलर, नाणे वापरायचे किंवा स्क्रू).

हे पहा अपघात कसे होतात.
Six members of a family died and two people were severely injured on Tuesday morning when their SUV collided head-on with a school bus moving on the wrong side of an expressway in Ghaziabad, a senior police official said.

त्या गाजियाबाद मधल्या अपघातात स्कूलबस सारखी मोठी बस पूर्णपणे उजव्या लेन मधून जात होती. मुळात जर अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड वे आहे तर ती चुकिच्या किंवा खुष्कीच्या मार्गानी त्या रस्त्यावर आली हे उघड आहे.

समृद्धी एक्सप्रेसवे वर अपघाताची बरीच कारणे आहेत आणि ती मोस्टली गाडीच्या कंडिशन्स, ट्रक आणि इतरही गाड्या चुकीच्या ठिकाणी उभ्या करणे आणि ड्रायव्हर एरर यांवरचीच आहेत.
रोड हिप्नॉटिझम हा एकमेव रस्त्याबाबत चा ड्रॉबॅक. जो टाळणं सहज शक्य आहे.
बाकी पाट्या वगैरे चुकीच्या आहेत असं मला सुरुवातीला वटलेलं पण तसं ते नाहीय. आणि हो एखाद्या एक्स्चेंज ची माहीती २-३ किमी आधीपासूनच देतात त्या पाट्या; इग्नोर ड्रायवर्स करतात.
बाकी ६०-७० च्या स्पीड नी उजव्या'च' लेनीतून चालणे (ठिकठिकाणी मोठमोठ्या फॉण्ट मध्ये + आयकॉन्स मध्ये उजवी लेन ओवरटेक, मधली १२० ची आणि डावी १०० ची असं लिहिलेलं असूनही) , पुढल्या गाडीच्या अगदी जवळ जाऊन मग ओव्हरटेक करणे (पुन्हा ठिकठिकाणी २०० मीटर्स हेडवे ठेवा अश्या पाट्या आहेतच), दोन ट्र्क्स नी दोन्ही लेन्स अडवणे हे नेहेमीचे यशस्वी प्रकार तिथेही आहेतच.
रस्त्यावर कुठेही घाट नाही, तीव्र चढ-उतार नाहीत, वळणं ही नाहीत सो मुं-पु एक्सप्रेसवे वर ट्र्क्स ची जी दमछाक होते ते इथे व्हायचा प्रश्नच नाहीय.

Pages