असाच एक सुंदर दिवस

Submitted by केदार१२३ on 20 December, 2007 - 06:19

तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटले समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून तो मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा. म्हणायचा- तरूणपणी माझा रूबाब तू बघायला हवा होतास. किन्वा कदाचित माझे गोव्या- कोकणातले भाऊबंद तरी बघायला हवेस तू.

आणि असाच एक दिवस अचानकच कोकणात जाण्याचा योग आला. माझ्या आईच आजोळ वेंगूर्ल्याच, तिथेच जवळ उभ्यादांड्याला वडिलोपार्जीत घर. घर म्हणजे अगदी परीकथेच मॉडेल समोर ठेवूनच बांधलेल. समोर सुन्दर सुन्दर झाड. आणि परसाच्या बाजूला समूद्र किनारा. कोणीस म्हणाल, " जा जरा जावून बघून तर ये किनारा." आणि म्हटल तर काहीश्या निरुत्साहानेच गेलो मी.

वाट इतकी सुन्दर होती. जशी कोणी मुद्दामच वाळू शिम्पडलीये वाटेवर.कसली कसली झुडूप उगवलीयेत वाटेत. जणू गावातली छोटी मूलच. शहरी पाहूण्याला बघताहेत. आपापसात खाणाखूणा चालू आहेत. कोण बर हा? आधी कधी पाहीला नाही ह्याला. मग वाळूची एक उंचच उंच टेकडी. तिथेच एक छोटूकली होडी. कोणीतरी मुद्दाम चित्र काढायला आणून ठेवलेली कशी. खूप खूप खेळून आलीये ती लाटांबरोबर. रापलेला रंग आणि लाटांच्या फेसाळलेल्या खूणाच सांगताहेत की. जसजस पूढ जाव तस तस पायाखालची वाळू कशी मऊ मऊ होत जातेय आणि माझ मन पण कस मवाळतय त्या वाळूबरोबरच. वाळूत पसरलेले शिम्पले किती सुन्दर दिसताहेत. मी नसताना रात्री, आकाशातून कोणीतरी उतरून खेळून गेलय. त्याच्याच खूणा ह्या. छोटे छोटे धामण (म्हणजे छोट्या कूर्ल्या) धावताहेत सैरावैरा. त्यान्च्या छोट्या घरात जावून लपून बसताहेत. अगदी घरी कोणी नवीन पाहूणा आल्यावर, छोटी मूल बूजून लपून बसतात अगदी तश्शेच. एका लयीत पडणारी ती छोटीशी पावल कीती सुन्दर दिसताहेत. त्यांना वाटतय, आपण कूठे लपलोय ते ह्याला कळणारच नाही. पण त्यांच्या छोट्याश्या पावलांच्या छोटूल्या रेषा सांगताहेत की त्यांच्या लपण्याची ठीकाण. का त्यांचा खेळाचा तास सम्पलाय म्हणून वर्गात जाऊन बसलीयेत गूपचूप.

त्यात वारा खूपच धीट म्हणायचा. अगदी मला स्पर्श करून बघतोय की- गालाला , केसांना. मी त्याला म्हटल " बराच धीट आहेस की रे?" तर मला म्हणतो कसा, " मी खूप खूप आनंदात आहे. माझ कीनै लग्न ठरलय ह्या चांदण्या रात्री." मी त्याला विचारल, " मी आल तर चालेल का रे लग्नाला?". तस म्हणाला , " ये की. खुशाल ये." मी त्याला विचारल , " अरे पण वधू कोण , कूठची ते तरी सांग." तसा लाजलाच आणि समुद्राकडे पळून गेला हळूच. पण लाटाही कसल्या खट. त्याही वार्याची मस्करी करताहेत. लाटा किती सुन्दर दिसताहेत. निळा करडा रंग थोडा किनार्याजवळ आला की पांढूरका होवून मोती उधळून जातो. आणि येताना रिकाम्या हाताने येत नाहीत त्या. वाळूसाठी छान छान शिम्पले घेवून येतात. वाळूही कशी हरखून जाते. तरी मी म्हटलच तीला , " मज्जा आहे बूवा एका मूलीची. सारख्या सारख्या भेटवस्तू मिळताहेत तिला" तशी लटक्या रागाने चापटच मारली तिने.

मी म्हटल वार्याला, " काय रे लाटांमागे जावून लपतोस? ये की जरा बाहेर." तसा आलाच तो गिरकी घेत. मला म्हणतो कसा " चल आपण लाटांबरोबर खेळू" आणि हात धरून ओढतच घेवून गेला मला. लाटाही कश्या पावलांवर मोती टाकून जाताहेत. हळूच पाय काय ओढताहेत. ढकलताहेत काय. मी त्यांना विचारल, " कूठूनशी आणता तूम्ही मोती आणि शिम्पले? जरा मला पण सांगा की?" तशी एकमेकांशी नजरानजर करत मला म्हणतात कश्या, " ते आमच गूपीतै. तूला नाहीच सांगणार आम्ही ते" मी म्हटल , " राहील. मी कीनै माझ्या मित्राला वार्याला विचारेन. तो नक्की सांगेल मला." तश्या गलबलाट करायला लागल्या.

परत जाताना मी हळूच मागे वळून बघीतल. तर सर्व जण कसे बघताहेत माझ्याकडे. परत कधी येणार विचारताहेत. मी म्हटल येणारै लवकरच.

परवा जूहूला गेलेलो सहज. मी काही म्हणायच्या आधीच मला तो म्हणतो कसा, " काय, कसा काय वाटला आमचा भाऊ?. मी म्हटल " छानै रे. खरच खूप खूप छान." मग मी त्याला वेड्यासारख विचारल, " पण तूल कस रे कळल?" तसा म्हणतो कसा, " अरे वारा येऊन गेलेला आमंत्रणाला.आणि बघ तर तूला काय देऊन गेलाय?" अस म्हणून हळूच मला दोन छानशे शिम्पले काढून दिले. अजूनही ते दोन शिम्पले मी जपून ठेवलेत. अहो का म्हणून का विचारताय. माझ्या अश्याच एका सुन्दर दिवसाच्या आठवणी आहेत ना त्यात.

गुलमोहर: 

केदार... फारच सुंदर लिहिलस रे!

मला समुद्र खुप आवडतो. तुझी आठवण वाचता वाचता प्रेमात पडलेय मी त्याच्या .

छान, सुरेख वण्रन.

मला समुद्र खुप आवडतो. तुझी आठवण वाचता वाचता प्रेमात पडलेय मी त्याच्या .

छान, सुरेख वण्रन.

मला समुद्र खुप आवडतो. तुझी आठवण वाचता वाचता प्रेमात पडलेय मी त्याच्या .

छान, सुरेख वण्रन.

केदार,
वाव, आमच्यासारख्या ज्यांचे आजोळ कोकणात नाही त्यांनासुद्धा समुद्राचे वेड लावलेस राव!!!!!
मस्तच!!!!!! मलापण एक शिंपला हवा हं!!!!!!

डब्बो!!!!

धन्यवाद चेतना, पूर्वा आणि डब्बो Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

मस्त केदार. माझ्याकडे पण असाच शिंपला आहे आठवणिंचा, वाचताना ते सगळ आठवल पुन्हा Happy
-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

मस्तच... मला आताच गणपतीपुळ्याचा वाळुत उभे असल्यासारखे वाटले. लाटा मोजत बसण्याचा माझा जुना नाद आहे..:)

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

धन्यवाद कविता आणि साधना Happy

मिलींदा Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केदार, छान लिहिलयस. खरच गावचा समुद्र असच वेडा करतो! माझ्या सासरी टाकाला पण असच आहे (अजूनतरी) सगळं स्वच्छ आणि निरागस! Happy

आणि वार्‍याच पण लग्न ठरलय का? बरं बरं! Wink