(पुढच्या टेबलवर एक छानसा गॉगल होता बबन ने घालून पहिला आणि काढणार तोच डॉक्टर म्हणाले उजव्या काडीला फक्त बोटाच्या चिमटीत धर आणि काय आश्चर्य बबन ला भिंतीच्या पलीकडचे आरपार दिसू लागले. डॉक्टर म्हणाले बॉडी हिट सेन्सिटिव्ह क्ष-ray गॉगल. या दिसायला डोकेदुखीच्या गोळ्या आहेत परंतु पाण्यात टाकताच हजारोचा जमाव काबूत आणण्या इतका अश्रू धूर होतो. शेवटी डॉक्टरनी एक टूथपिक दाखवली ते म्हणाले कि हि टूथपिक तुझ्या बोटाचे ठसे ओळखण्या साठी प्रोग्राम केली आहे. हि तू कोणाला टोचल्यास ती व्यक्ती दहातास बेशुध्द पडेल. बी केअर फुल. बबन म्हणाला सर आय मस्ट से आय एम इम्प्रेस्ड! )
(आता पुढे )
पेराशुट जसे उघडले तसा त्या घनदाट जंगलाच्या दिशेने आकाशातून खाली येताना बबनला एक सुखद डुलकी लागली. झाडा-फांद्या मधून खरचटत लोंबकळत आणि झाडावरल्या माकडांची झोप मोडत जेव्हा बबन आणि काही बेसावध माकडे एकदाचा धरती मातेच्या कुशीत आली तेव्हा बबनने बाकीचा काही फालतू विचार न करता उरलेली झोप पूर्ण करण्यासाठी जे काही हिरवळीवर बिधास्त पडी मारली ती बघून ती घाबरलेली बबून माकडे सुध्धा चकित झाली.
धैर्यवान आणि मूर्ख माणसांचा हा एक गुण फार उत्तम कुठल्याही परिस्थिती मध्ये त्यांना झोप लागते. अशा अर्थाचे एक भाषांतरित सुभाषित गाईड मध्ये वाचल्याचे आपल्या स्मरणात असेलच.
बबन ला जाग आली तेव्हा त्याच्या बाजूला काही बेरी सदृश फळे टप-टप पडली होती त्याने ती मधुर फळे खात खात वर पहिले तर काही पक्षी मधुर कुंजन करत होती. दोन चार माकडे बागडत होती दोन लंगडत होती. सर्वत्र ओल्या पाना फुलांचा आणि जंगलात असतो तसा सुवास सर्वत्र पसरला होता. दूर वर त्याला धबधब्याचा आवाज आला. चला अंघोळीची तर सोय झाली असा मनात विचार करत बबनने मग आळोखे पिळोखे देवून झाल्यावर सर्व हाडे शाबूत आहेत याची खात्री केली आणि चहा मिळाला असता तर बरे झाले असते असा विचार करत तो उठून उभा राहिला आणि निघण्या आधी आठवण म्हणून दोन चार सेल्फी त्याने घेतले शेवटचा सेल्फी घेतल्या वर काही तरी वेगळे वाटले म्हणून पाहतो तो काय त्याची बोबडी वळायची बाकी राहिली त्याच्या सेल्फी मध्ये त्याच्या बरोब्बर मागे डायनासोरचे प्रचंड डोके दिसले. बबनने मागे वळून पहिले तो कोन्डासोर तो प्राणी ज्याचे डोके दिसायला डायनासोर सारखे पण धड अनाकोंडाचे . मनुष्याला सहज गिळू शकतो असा वीस फुटी अजगरच तो. बबनला विचार करायला वेळच मिळाला नाही बेडकाने किडा टिपावा तसा कोन्डासोरने बबनला खट्टकन मटकावला. एखाद्या उग्र वासाच्या जेली ने भरलेल्या लिबलिबीत पाईप मधून आपण पुढे ढकलले जात आहोत असेच बबनला वाटले. अजून पाचच मिनिटाने कोन्डासुराने एखाद्या विशाल वृक्षाला विळखा घालून बबनची हाडे मोडली असती आणि त्याला अधिक पाचक केले असते. बबनच्या हातात अजूनही फोन तसाच होता त्याही अवस्थेत त्याने दोन चार सेल्फी काढलेच. तेव्हढीच एक शेवटची आठवण! त्याही अवस्थेत ते अजब फोटो फेसबुक वर सेंड करावे मग मरावे असा विचार करत असतानाच इतक्यात कोन्डासुराने एका विशाल झाडावर चढायला सुरुवात केली.
कोन्डासुराने हालचाल केल्याने बबनच्या हातातील फोन सुटला आणि कोन्दासुराच्या पचन संस्थेच्या दिशेने ओढला गेला. आपला शेवटचा फोटो फेसबुक वरच्या चाहत्यांना पाठवता आला नाही याच्या बबन ला मरणप्राय यातना झाल्या त्या रागात बबन ने आपल्या हात पायाची सर्व शक्ती एकवटून त्या लिबलिबीत मासाच्या पाईपला धरून पुढे ओढला न जाण्या साठी प्रयत्न केला. त्याच्या मनात आता किंचित भीती येवू लागली परंतु त्याला मग एकदम रीलॅक्सेशन टेकनिक (हे मीच त्याला सांगितले होते) आठवले आणि त्याने स्ट्रेस कमी करण्या साठीचा राम बाण उपाय म्हम्हणून त्याने मस्त पैकी शिळ घालायला सुरुवात केली.
टांझानियाच्या त्या दुर्गम जंगलामध्ये आदिम जमातीचे लोक न रहात असल्यास नवलच. अशीच एक जगाला फारशी माहित नसलेली एक "झुर्रा" नावाची जमात तिथे राहत असे. अंगाला राख फसलेले आणि ओठा नाका मध्ये प्राण्यांची छोटी हाडे आभूषणे म्हणून घातलेले हे लोक कुंभ मेळ्यात अघोरी साधू म्हनून सहज खपले असते पण त्यांचा आणि यांचा अर्था अर्थी काहीही संबंध नव्हता. त्यांच्यातलाच एक बुटका झुर्रा सकाळी सकाळी बायको चिडल्याने वन दर्शनास एकटाच बाहेर पडला होता आणि आत्ता टीव्ही वर एखादा लाइव्ह कार्यक्रम बघावा तसा झुडपां आडून कोन्डसुराला एक माणूस जिवंत गिळतानाचे अपूर्व दृश्य डोळे भरून पाहत होता. जसा कोंडासूर वृक्षा वर चढू लागला तसा त्याने जमिनीवर पडलेले पराशूतचे कापड त्यांच्या दिवाळीस बायकोस देवून उरलेल्या कपड्याची मच्छरदाणी शिवून खुश करण्याचा डाव देखील आखला. कोंडासूर अजून थोडा वर चढतो न चढतो तोच एक आश्चर्य घडले कोंडासुराच्या पोटा मध्ये अक्षरशः बॉम्ब स्फोट झाला आणि आगीच्या लोळात त्याचे दोन तुकडे झाले वरच्या तोंडा कडच्या तुकड्याचा आतून एक जिवंत माणूस धबकन खाली पडला तर दुसरा शेपटी कडचा भाग जळत पराशुत वर पडला आणि झुर्र्याचे पराशूत चे स्वप्न जळून गेले.
कोन्दासुराच्या पोटातल्या चिकट द्र्वानी माखलेला बबन अजूनही शिळ घालत होता मग त्याच्या लक्षात आले कि सेलफोन चा शिळे मुळे बॉम्ब आक्टिवेट झाला आणि त्या मुळेच हा उरलेला पोस्ट मोर्टोम चा कार्यक्रम झाला. आपला पुनर्जन्म झाला म्हणून मनातल्या मनात त्याने भारतीय वैज्ञानिकांना सलाम केला.
बबनने पायाशी काय वळ वळते आहे म्हणून खाली पहिले तर एक राख फसलेला नागडा माणूस चक्क त्याचे पाय धरून याचना करत होता. झुर्र्याला तर जणू देवच भेटला होता. कधी एकदा या देवाला घेवून आपल्या तांड्या वर जातो असे त्याला झाले होते.
विशाल धबधब्याच्या पायथ्याशी मनसोक्त स्नान केल्यावर बबनला जरा बरे वाटले. झुर्रा मात्र एखाद्या अज्ञाधारक कुत्र्या सारखा किनार्यावर बसून राहिला.
बबन बाहेर आल्यावर लक्षात आले कि गरज न वाटल्याने झुर्र्याने त्याचे वाहत्या पाण्यात कपडे फेकून दिले आहेत आणि त्याला बबनच्या लाल अंडरवेअरचे कुतूहल वाटत आहे. बबनने त्याला खाणा खुणा करून अंडर वेअर म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केला परंतु या सांस्कृतिक देवाण घेवाणीत झुर्र्याला अजिबात काही कळेना उलट बबन काही तरी अश्लील जोक सांगतो आहे असे वाटून तो गडबडा लोळून हसू लागला. आता हा जर हसून हसून मेला तर या जंगलातून वाट काढणे मुश्किल होईल म्हणून बबनने तो विषय तात्काळ तिथेच थांबविला. आजच्या रात्रीच्या पार्टीत हा देवमाणूस बहार आणणार या खुशीत मग झुर्रा बबन ला घेवून तांड्याच्या दिशेने निघाला.
(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग
५) गुप्तहेर बबन बोंडे - कोंडासुराचा वध
Submitted by सखा on 30 March, 2017 - 10:18
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशक्य भारी लिहिलय..डोळ्यात
कोंडासुर नाव खूप आवडलं
महान केवळ! सेल्फीत
महान केवळ! सेल्फीत डायनोसोरचं डोकं दिसल्यावर अशक्य हसले.
अत्यंत भन्नाट आणि निखळ आचरट लेखन. अजून येउंद्यात.
घनदाट जंगलाच्या दिशेने आकाशातून खाली येताना बबनला एक सुखद डुलकी लागली
भारी डिटेल्स आहेत हे.
अशा अर्थाचे एक भाषांतरित सुभाषित गाईड मध्ये वाचल्याचे
दोन चार माकडे बागडत होती दोन लंगडत होती.
चला अंघोळीची तर सोय झाली असा मनात विचार करत बबनने मग आळोखे पिळोखे देवून झाल्यावर सर्व हाडे शाबूत आहेत याची खात्री केली आणि चहा मिळाला असता तर बरे झाले असते असा विचार करत तो उठून उभा राहिला
>>>>
Jabara
Jabara
खतरी
खतरी
थान्कू सखाजी...
थान्कू सखाजी...
आणि हो, लिहित जा बरं तुम्ही...
भन्नाटस्य भन्नाटम् ! हहगलो
भन्नाटस्य भन्नाटम् !
हहगलो:
भन्नाटस्य भन्नाटम् ! :
भन्नाटस्य भन्नाटम् !
: हहगलो:
छान मोठी कादंब्री लिहा
छान
मोठी कादंब्री लिहा
लोकाना आयडी घ्यायला नवी नावे
लोकाना आयडी घ्यायला नवी नावे मिळतील
धैर्यवान आणि मूर्ख माणसांचा
धैर्यवान आणि मूर्ख माणसांचा हा एक गुण फार उत्तम कुठल्याही परिस्थिती मध्ये त्यांना झोप लागते.
बबन ला जाग आली तेव्हा
बबन ला जाग आली तेव्हा त्याच्या बाजूला काही बेरी सदृश फळे टप-टप पडली होती त्याने ती मधुर फळे खात खात वर पहिले तर काही पक्षी मधुर कुंजन करत होती.>>
क्या इसका मतलब वही है जो मै सोच रही हू
बापरे काय सोच
बापरे
काय सोच
म्हणूनच कदाचित चहाची तलफ आली असेल
फळे खाल्यावर थोडा चवीत बदल
खूप दिवसांनी निखळ विनोदी
खूप दिवसांनी निखळ विनोदी लिखाण वाचायला मिळालं. हे जबरदस्त आहे..
पुढचे भाग लवकर येऊद्या...
जबरी आहे हे
जबरी आहे हे
<<<<<<त्याही अवस्थेत त्याने
<<<<<<त्याही अवस्थेत त्याने दोन चार सेल्फी काढलेच. तेव्हढीच एक शेवटची आठवण! त्याही अवस्थेत ते अजब फोटो फेसबुक वर सेंड करावे मग मरावे.>>>>>> एक नंबर भन्नाट कल्पना...!!! अजुन ही हसु आवरेना...!!!

खुप दिवसांनी माबोवर आलात....!!
=)) लय भारी!
=)) लय भारी!
पुढचा भाग ?
पुढचा भाग ?
खरच पुढचा भाग ?
खरच पुढचा भाग ?
>>
"६) गुप्तहेर बबन बोंडे - और खजूर मे लटके"
हहपुवा झाली.
हहपुवा झाली.
सिनेमा निघू शकेल यावर.