देवाने, मुलींना अस का बनवल?

Submitted by nikhil_jv on 5 March, 2009 - 03:36

देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?

कोणाचे डोळे, तर कोणाचे केस
प्रत्येकीत काहीतरी वेगळाच गुण
नजर एकीवरच टिकत नाही
पाहताच वाजु लागते प्रेमाची धुन

कोणी हासुन आपलस करत
कोणी लाजुन मनामध्ये शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपल काळीज कुठे आपल्याजवळ उरत

कोणी नजरेतूनच गार करत
कोणी बोलण्यातूनच वार करत
किती अदा लुभवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्‍यात फसत

कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच मनाला घेरतात

नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते

अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्‍हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल

खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?

गुलमोहर: 

नंदू, आणि याला मनोरंजक कोण म्हणतंय... तर एक स्त्रीच! व्वा!>>>>>>>>>>>>>

साधनाजींनीही त्याची परेड घेतलीच आहे..तुम्ही कदाचीत त्याच्या वरचे वाचले नाही!

म्हनायचे एवढेच आहे कि हे सगळे लोक फक्त घाणीवर जशा माशा बसतात तसे अशा ठिकाणीच का जमतात ??

बाकी बरीच ठिकाणे(काही चांगले साहित्य.. बरं चांगले राहु दे यापेक्षा ठिक म्हणु!) ओकीबोकी पडलेली असतात.... तिथे का ह्यांच्या पाउलखुणा दिसत नाहीत !

स्तुतीसुमने ऊधळायची राहु देत....अ‍ॅटलीस्ट अभिप्राय तरी लीहीत जा तिथे !

आता कुठे पाऊलखुणा सोडायच्या हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... हे आधीच मान्य करतो

मला जे वाटले ते स्ट्रेट लिहील आहे !

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

फक्त घाणीवर जशा माशा बसतात >> म्हणजे ज्यांना तुम्ही माशा म्हणताय; ते जिथे आले आहेत; त्याला घाण म्हणताय हे लक्षात येतंय ना?

निखिलराव, इथे मायबोलीवर एखादे साहित्य आवडले नाही तर प्रतिसाद न द्यायचा अलिखित असा एक प्रोटोकॉल आहे. त्यामुळे तुमच्या बाकी कविता कुणी वाचल्याच नाहीत असे नाही पण कवितांना प्रतिसाद देण्यास लोक का आले नाहीत याचा विचार तुम्ही करु शकता. परंतू जेव्हा एखाद्या साहित्यात सर्वसाधारण सामाजिक प्रश्न किंवा मते मांडली जातात तिथे लोकांचा सहभाग हा येणारच. उदाहरणार्थ, थोर लेखक आनंद यादव यांची संत तुकारामांच्या जीवनावरील कादंबरी रोखली गेली. (हे कितपत योग्य अयोग्य हा मुद्दा वेगळाच) का? तर संत तुकाराम हे एका संपूर्ण समाजाचे आदर्श आहेत आणि त्यामुळे त्यावर उलटसुलट विचार झाले. पण तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांच्या बाबतीत का नाही झाले? कारण त्या वैयक्तिक पातळीवरच्या होत्या. हीच कविता तुम्ही एखाद्या मुलीला/ स्वप्नसुंदरीला उद्देशून केली असतीत तर सगळ्यांनीच ती हलके घेतली असती. पण तसे नव्हते. तुमच्या बाकी कविता या अशाच व्यक्तिगत पातळीवरच्या असल्याने कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. तुम्ही जेव्हा तुमचे साहित्य पब्लिक फोरम वर टाकता तेव्हा चांगल्या वाईट दोन्ही प्रतिसादांची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. आणि जर आपले म्हणणे आपण योग्य रितीने मांडू शकत नाही असे वाटले तर साहित्यात एक टीप म्हणून तुम्ही तसे नमूद करु शकता. म्हणजे त्यावर उहापोह होणार नाही. (कुणी नवा लेखक माबो वर लिहीताना तसा उल्लेख करतो तेव्हा त्याच्या टायपो एरर्स कुणी सांगत नाही असे तुम्ही पाहिले असेलच.) असो. तुम्हाला पुढील लेखनास शुभेच्छा.
----------------------
एवढंच ना!

माझा प्रत्येक प्रयत्न तुम्ही सावधानशी का जोडता?
तो आपोआपच जोडला जातोय मित्रा. तुझ्या 'सावधान' मधली काही मते, वाक्ये या कवितेत पुन्हा अधोरेखित झाली आहेत. त्या लेखाला वाचकांनी गांभीर्याने घ्यावे अन या कवितेला 'मजेशीर' म्हणून घ्यावे-असे तू कसे काय ठरवलेस?

एखाद्या मुलीने ही कविता लिहिली असती, तर तू तिच्याबद्दल मनात काय विचार केला असतास?

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

मला वाटले इथे लोकांना उपरोध समजतो.. पण ठिक आहे....

साधना
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

एक मजेशीर घेण्यासारख्या कवितेला तुम्ही वेगळच वळण देताय.

>> पण जर मला तुमची कविता मजेशीर न वाटता अपमानास्पद वाटत असेल तर.. एक स्त्री म्हणून माझ्या भावना दुखावल्यात जात असतील तर.. आणि हे फक्त मीच म्हणत नाहिये. बहुतेकजण म्हणतायत हे ही लक्षात घ्या.
--------------
नंदिनी
--------------

प्रकाश,
चांगले साहित्य असेल तर त्याला प्रतिसाद मिळतच रहातात. एकमुखाने मिळत रहातात.
उदाहरणार्थ
पूनमची सध्याची कथा घ्या किंवा ट्युलिपचं काही लिखाण घ्या किंवा दादचं काही
किंवा हेम्सची एखादी कविता किंवा वैभवची एखादी गझल इत्यादी...

सुमार गोष्टींना अन्नुलेखाचे शस्त्र वापरले जाते. आणि खूपच वाईट असेल तर त्यावर निगेटीव्ह प्रतिक्रिया दिल्या जातात किंवा मग टरही उडवली जाते.. सतत सगळंच सिरीयसली घेणं पेलण्यासारखं नसतं. . ज्याला तुम्ही घाणीवर माश्या इत्यादी उपमा देताय.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

म्हनायचे एवढेच आहे कि हे सगळे लोक फक्त घाणीवर जशा माशा बसतात तसे अशा ठिकाणीच का जमतात ??

बाकी बरीच ठिकाणे(काही चांगले साहित्य.. बरं चांगले राहु दे यापेक्षा ठिक म्हणु!) ओकीबोकी पडलेली असतात.... तिथे का ह्यांच्या पाउलखुणा दिसत नाहीत !

स्तुतीसुमने ऊधळायची राहु देत....अ‍ॅटलीस्ट अभिप्राय तरी लीहीत जा तिथे !

>>>> वर आशु_डी ने लिहिल्याप्रमाणेच एखादे साहित्य आवडले नाही तर प्रतिसाद न द्यायचा अलिखित असा एक प्रोटोकॉल आहे. अभिप्राय आपसूकच द्यावा वाटतो एखादे साहित्य ,प्रकाशचित्र आवडले तर पण तुम्ही काहीही लिहाल अन पाउलखुणा सोडा म्हणणार , ते मान्यच नाही !
अन ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहेच ...
-----------------------------------------
सह्हीच !

आयला असे प्र्क्षोभक लिहीले की प्रतिसाद मिळतात होय. मज्जाय.

~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6108
~~~~~~~~~~~~

घाणीवर जशा माशा बसतात तसे अशा ठिकाणीच का जमतात >>>
कारण सोप्पंय. ही 'घाण' आहे, हे त्यांना लगेच कळते. Proud

पण अशा लोकांनी, म्हणजे 'माशांनी' इतर चांगल्या ठिकाणी (उदा. तुमच्या कवितांवर) प्रतिसाद द्यावेत, असं तुम्हाला का वाटतं? मरू देत की, नाही दिले त्यांनी प्रतिसाद तर!!

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

>>पण अशा लोकांनी, म्हणजे 'माशांनी' इतर चांगल्या ठिकाणी (उदा. तुमच्या कवितांवर) प्रतिसाद द्यावेत, असं तुम्हाला का वाटतं? मरू देत की, नाही दिले त्यांनी प्रतिसाद तर!!<<
साजिर्‍या, तुला काय कर्णपिशाच्च वश आहे की काय? मैभी येईच बोल्नेवाली थी!!

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पण अशा लोकांनी, म्हणजे 'माशांनी' इतर चांगल्या ठिकाणी (उदा. तुमच्या कवितांवर) प्रतिसाद द्यावेत, असं तुम्हाला का वाटतं? मरू देत की, नाही दिले त्यांनी प्रतिसाद तर!!
>>>>>>>>

नाही रे मित्रा वैयक्तिक नको घेऊस हे सारे !

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

देवाने माश्यांना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर चिडायच
सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या
मग कोणा एकीच्याच ताटात का पडायच?

कोणाचे पाय, तर कोणाचे पंख
प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण
दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही
पाहताच वाजु लागते आजाराची धुन

कोणी गुणगुणून नकोस करत
कोणी लाजुन पांघरूणात शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते

कोणी गूणगुणून गार करत
कोणी भुण्भूणून वार करत
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्‍यात फसत

कचर्‍यातल्याही माशा कमाल करतात
नकोनको म्हणताना तोंडावर येऊन बसतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच नाका तोंडाला घेरतात

(चु भू द्या घ्या ) Light 1

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केद्या........................... रामबाण! Lol
...;
आपला, लिम्बुटिम्बु

(चु भू द्या घ्या ) Light 1

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

केदार , काय रे हे?? अगदी बेष्ट.
--------------
नंदिनी
--------------

केदार ............................ Rofl

कचर्‍यातल्याही माशा कमाल करतात
नकोनको म्हणताना तोंडावर येऊन बसतात

मस्तच !!! मुळ प्रति पेक्षा जास्त आवडली.....

केदारा, अरेरे काय केलेस हे?
हाकल, हाकल त्या माशांना!! Proud

बहरात घालव या माशांना!

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

साजिर्‍या, बघ की, ते कार्य मी संपन्न केलंय आधीच. Happy
----------------------
एवढंच ना!

जल्ला नाका वरची माशी उडवता येत नाही... आणि चाल्ले घाणीवरच्या माश्या उडवायला...

केदार अगदी रामबाण... :d

आयला .... ह्याला कविता म्हणतात !! सहीच रे केदार !!! इन्द्रा खरय ..... 'एकदम रामबाण' आहे मूळ 'कविते'वर.

=== I m not miles away ... but just a mail away ===

केदार एकीच्याच च्या ऐवजी एकीनेच असं लिहीलंस तर कवितेला एक खोली प्राप्त होईल. असो.

एडमिननं मायबोलीला असं का बनवलं
जॉइन होताच कविता पाडाव्याशा वाटतात
गळणार्‍या नाकातून एकच थेंब का गाळायचा
पाटच पाट वहावेसे वाटतात

कशात इशारा तर कशात सल्ला
प्रत्येकात कायतरी वेगळीच भुणभुण
एक भावना मेली एक क्षणभर टिकत नाही
आधी लांब रहायचा इशारा लगोलग बाळंतपणाची कुण्कुण

कुणी तसा जादू करतो
कुणी असा प्रश्न पाडतो
प्रत्येक कविता वाचल्यावर
मायबोलीकराला कुठे काळीज उरतो

कोणी विषयातून गार करत
कोणी व्याकरणातून वार करत
किती तर्‍हा छळण्याच्या असतात
मायबोलीकर वेडा वाचून फसतो

कवितेतही कवि कमाल करतात
शब्द शब्द जमवून जंजाळ करतात
कोणाकोणाला नजर द्यावी (वाचायला)
एकजात सर्वच डोक्यात शिरतात

प्रतिक्रीयातही त्यांच्या बात असते
त्याच वाचण्यात खरी मजा असते
भेजा आमचा भंजाळून टाकतात
त्या वाचण्यासारखी दुसरी सजा नसते

खरच! एडमिननं मायबोलीला अस का बनवल?
की जॉइन होताच नव्कवीनं घडायच
मनात येईल ते का नाही लिहायचं?
मग मायबोलीकरानं गप्प का रहायचं?

(माझा हा पहिलाच प्रयत्न आहे कृपया सांभाळून घ्या)

मीनू Rofl
माझा हा पहिलाच प्रयत्न आहे कृपया सांभाळून घ्या)>>> हे लै झ्याक!! Lol

केदार, मित्रा तोडलस!!! Wink

निखिलराव, अजुन येउद्या!!! Lol
नेक्ट कविता 'देवाने, मुलांना असं का घडवलं' यावर पाडा..

बराच वेळ सगळे प्रतिसाद वाचत होतो पण केदार तू प्रतिसाद द्यायला लावलस.
म्हणजे..>>आयला .... ह्याला कविता म्हणतात ! !<<<
>>>...... 'एकदम रामबाण' <<<<

मंडळी,

तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही "निखिलराव" ला pre-judge करत आहात?

मी बर्‍याच वेळा मायबोली वरचा अलिखित नियम पाळतो..म्हणजे मला एखादे साहित्य आवडले नाही तर मी त्यावर काही प्रतिक्रिया लिहित नाही. जर त्यात मला काही सुधारणा सांगावीशी वाटली तर मी जरुर लिहितो.
निखिलराव ने लिहिलेल्या साहित्याशी सहमत असणे किंवा नसणे/त्याचे साहित्य आवडणे किंवा न आवडणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे पण त्यावरुन त्याने आधी लिहिलेल्या कुठल्यातरी लेखाशी त्याच्या इतर साहित्याचा संबंध जोडणे हे कितपत योग्य आहे?

तो नवीन लेखक दिसतोय आणि चुकीने त्याने काहिच्या काही कविता या सदराऐवजी दुसर्‍या सदरात ही कविता टाकली असणे शक्य आहे. ते न सांगता त्याच्यावर हल्ला करणार्‍या किंवा त्याची टर उडवणारी अशी बरीच posts मला दिसत आहेत. काहीनी तर त्याच्या पोस्ट वर स्वतःच्या कविता लिहुन ते hijack करण्याचाही प्रयत्न दिसत आहे. अशाने नवे लेखक हिरमुसले होतील असे तुम्हाला वाटत नाही का?
काही जण जन्मजात प्रतिभा घेउन जन्माला येतात काही जण आपल्या चुकामधुन शिकतात आणि त्यांची प्रगती होत जाते. त्याच्या चुका सौम्य शब्दात त्याला सांगता आल्या नसत्या का?

धन्यवाद.

Pages