"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>मग दोन हजारची नोट का काढली?<<<<

दोन हजाराची नोट का काढली, पाचशेची नोट लगेच का काढली नाही ह्या दोन्हीची कारणे वेगवेगळी आहेत व त्यात निव्वळ अंमलबजावणी पूअर असणे इतकाच भाग नाही तर पॉलिसीसुद्धा आहे.

पेशवा ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

बाकी भाजीवाल्याला टॅक का बसू नये हे तुमचं लॉजिक मला समजलेलं नाही. >>> साथीजी, तुम्ही नेमके कुठल्या भाषेत वाचता हो? मी अस कुठे लिहिलेय ते दाखवा बघू.
ते तुमचे झाडू खराटे पण असेच करतात.
मी म्हटले गुजरातेत सर्वत्र इंटरनेट आहे.
ही साहेब ते वाक्य जसेच्या तसे कॉपी करून विचारतात की कुठेय फुकट इंटरनेट?

ते अंगावर धावून येतात, त्यांना जरा म्हणून उत्तर दिले की तुम्ही धावून येता. काळजी वाटत असेल म्हणा! दोघांचा एकाच वेळी सेम प्रॉब्लेम आहे का? लवकर चांगल्या डॉक्टरला दाखवा हो.

चहा हवा का? ठेवते 2 कप, की एकच कप पुरे तुम्हा दोघांत? SwiftKey

>>>दोन हजाराची नोट का काढली, पाचशेची नोट लगेच का काढली नाही ह्या दोन्हीची कारणे वेगवेगळी आहेत व त्यात निव्वळ अंमलबजावणी पूअर असणे इतकाच भाग नाही तर पॉलिसीसुद्धा आहे

तीच सांगावी. माझ्या मते २००० ची नोट लवकरच बाद करण्यात येणार आहे. पण सरकार ला १०० च्या नोटा छापायला २० पटीने जास्त वेळ लागला असता म्हणून हा तात्पुरता शॉर्टकट आहे.

२००० ची नोट आणि नवी ५०० ची नोट anyway approve होती Rajan च्या tenure मध्येच बहुतेक. ती फक्त चलनात आणायची होती. नवीन नोट चलनात आणताना जुन्या नोटा बाद करणे गुप्ततेच्या दृष्टीने सोपे गेले असावे. Hopefully ह्यावरून लोकं धडा घेऊन larger denominations चे cash व्यवहार करणार नाहीत. कदाचित बँकेचे महत्त्व तळागळातल्यांना वाटेल, निदान बँकेची पायरी तरी चढतील. त्यामुळे सावकारी कमी होईल, मदत होईल.

पॉलिसीसुद्धा आहे, तीच सांगावी. ---- पॉलिसी काय असणार आहे! Same ओल्ड, same old. सचोटीने व्यवसाय/व्यवहार करा, कर बुडवेपणा करू नका, employees ना पगार खात्यात द्या, सगळे व्यवहार कागदोपत्री करा, Make a better citizen, gem of a person out of each Indian इ.बहुतेक

पीएम बोले- नोटबंदी का फैसला पहले लागू हुआ होता तो देश आज बर्बाद नहीं होता

म्हणजे आता लागू केल्यानंतर देश बर्बाद झाला अशी अप्रत्यक्ष कबुली मोदींनी दिली ? Uhoh Happy

पेशवा ,

एक भारतीय म्हणून आणि एक सी ए म्हणून, मी आपल्या खालील वाक्याचा निषेध करतोय.

भारतातला प्रत्येक नागरिक काळा बाजर करतो. प्रत्येक सीए त्याला करायला मदत करतो.

दिनेश दा. अमेरिकेत गेल्यावर सगळे धुतल्या तांदळासारखे होतात. जसे काँग्रेसपक्ष आणि इतर पक्षातून भ्रष्टाचारी / भ्रष्टाचाराचे आरोप असलेला भाजपात गेल्यावर स्वच्छ बनतो.

लोड घेऊ नका.

कॅशलेस इकॉनॉमी कशी असावी आणि त्यात त्या सिस्टीमवर विश्वास किती असावा, याचे एक परदेशातील उदाहरण.
( बहुतेक आधी लिहिले होते )

मी बसची वाट बघत होतो. त्या बसमधे कार्डने पैसे द्यायची सोय होती, तशीच नाणी टाकायची पण. बस समोरच ऊभी होती. फक्त अर्धा मिनिट उशीरा स्टॉपवर आली. माझ्या पुढच्या प्रवाश्याने कार्ड स्वाईप केले ते चालले नाही. त्याने माझ्याकडे नाणी नाहीत असे सांगितले व आत गेला. मी नाणी टाकायला गेलो, तर ड्रायव्हरने त्या मशीनवर
हात ठेवून, ग्रातीस ( फुकट ) असे म्हणाला. मी आत गेलो

मला राहवले नाही, शेवटच्या स्टॉपवर मी ड्रायव्हरला विचारलेच. तर तो म्हणाला. कार्ड मशीन बिघडले
होते. दुरुस्त झालेही असते पण मग बस लेट झाली असती. ज्यांच्याकडे फक्त कार्डच आहे, त्यांना फुकट नेणे भाग
होते, आणि त्यांना फुकट नेणे व ज्यांच्याकडे नाणी आहेत, त्यांच्याकडून पैसे घेणे, हे अन्यायाचे झाले असते. म्हणून
अर्ध्या मिनिटात हा निर्णय घेण्यात आला !

दुसरे उदाहरणही परदेशातलेच. त्या देशात एम आर पी वगैरे नाही. मी त्या देशात असताना (जवळच्या देशात ) युद्धाला सुरवात झाली. त्याबरोबर पहिल्याच दिवशी तिथल्या सरकारने, . कुठल्याही दुकानदाराला या दिवसात
किमती वाढवता येणार नाहीत, अशी सक्त ताकिद दिली. आणि त्या वाढल्याही नाहीत.

हा निर्णय जर एवढ्या झटपटीने घ्यायचा होताच, तर असेही नियम काढता आले असते ना, कि कार्ड स्वाईप
करण्यासाठी कुणालाही जास्त चार्जेस लावता येणार नाही. आधार कार्ड वा पॅन कार्डवर सरकारी दुकानात किंवा

इतर दुकानातही, अमूक इतका माल उधारीवर मिळेल. चेक सर्वाना स्वीकारावेच लागतील .. फार अपेक्षा करतोय का मी ?

इथे.. नुसती ट्रेन काही तास बंद केली तर रिक्शा टॅक्सी वाले स्वतःचे भाडे अव्वाच्या सव्वा करतात. त्यांना सरकार रोखू शकत नाही.

सई, तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. २००० ची नोट लवकरच बंद होवो.

दुसरा विषय म्हणजे इतक्या ५०० व १००० च्या नोटा बॅकेतुन जमा झाल्या पण त्यात खोट्या नोटा का आढळल्या नाहीत?

१. त्या ओळखताच आल्या नाहीत
२. त्या नगण्य स्वरुपात होत्या (म्हणाजे इंडीअन स्टेटिस्टिकल इन्स्टिट्युटचे अंदाज चुक होते?)

दोन्ही शक्यता चिंताजनक आहेत ..

९०% च्या आसपास ५०० व १००० च्या नकली नोटांची अ‍ॅक्युरसी होती असे वाचण्यात आले. >> तुमची वाचण्यात काहीतरी चूक झालेली दिसते. सरासरी १० लाख नोटांमध्ये २५० नोटा नकली, हा त्या इन्स्टिट्युटचा अंदाज होता.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/recovery-of-fake...

रेफरन्स ह्या लिंकवर वाचायला मिळेल.

९०% च्या आसपास ५०० व १००० च्या नकली नोटांची अ‍ॅक्युरसी होती असे वाचण्यात आले >>> मशीन मधे नकली नोटा लगेच कळुन येतात. तसेच हाताने बघितल्यावर सुध्दा प्लॅस्टीकचा धागा बाहेर आलेला सहज दिसून येणारा होता.

म्हणे ९०% अ‍ॅक्युरसी. Biggrin

अमेरिकेत बसून कधी खोटी नोट हातात तरी घेऊन बघितली का?

आचार्य अ‍ॅक्युरसी ... % ओफ रेअल नोटा नव्हे... अक्युरसी गणित चुकिचे आहे.. आऊट ओफ १४ मर्कर्सवेरेबरोबर होते फक्त चार चुकिचे वा नसावेत. म्हणजे ७० % अ‍ॅक्युरेट?

अस्सो..

त्या नगण्य स्वरुपात होत्या (म्हणाजे इंडीअन स्टेटिस्टिकल इन्स्टिट्युटचे अंदाज चुक होते?) >> मग तुम्ही कंसातील अनुमान कसे काढले, ते कळले नाही. वरील अंदाजानुसार १० लाखांमध्ये २५० म्हणजे नगण्यच आहेत.

आजच्या संध्याकाळची नवी डेवलपमेंट.

३० डीसेंबरपर्यंत यांनी बाजारात आहे असा हिशोब केला होता, (म्हणजे १४ की १५ लाख कोटी) त्यापेक्षा जास्त किमतीच्या नोटा परत येणे प्रोजेक्टेड आहे म्हणे Rofl

अन सगळ्या फियास्कोची जबाबदारी बँकांच्या गळ्यात मारण्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.

अमेरिकेत बसुन बरेच काही अनुभवता येते.

आणि अमेरिकेतली उंटावरून शे़ळ्या हाकणारी सुध्दा इथे बरीच बघत आहोत.

तर बाळांनो, आपण जेव्हा बँकेत कॅश भरायला घेऊन जातो तेव्हा बँका काही त्यातली एखादी नोट खोटी निघाली की आपल्याला पोलिसांत देत नाहीत.

एकाच ट्रान्सेक्शनमध्ये जर चारपेक्षा जास्त नोटा खोट्या निघाल्या तरच पोलिस कंप्लेंट होते.
बर्‍याचदा (आणि आर बी आय ने वारंवार सूचना देऊनही) बँका सरळ या नोटा खोट्या आहेत किंवा चालणार नाहीत असे सांगून परत करतात.
काऊंटरफिटचा स्टँप मारत नाहीतच पण एका विहीत नमुन्यात नोटेचा सिरीयल नंबर लिहून कॅशियर आणि पैसे भरणार्याची सही घेऊन तो आपल्याला देणे अपेक्षित असतानाही तो देत नाहीत.

पूर्वी हे सगळ्या प्रकारच्या म्हणजे को ऑप्/नॅशनलाइन्ड्/कार्पोरेट बँकात सगळीकडे अनुभवलंय.

पण आता खास खोट्या नोटा पकडण्यासाठी नोट्बंदी केलीय तर आत्ता तरी नोंद ठेवली जाईल आणि बँका खोट्या नोटा जमा करून आपल्यालडे साठवून आर बी आय ला परत करतील असे वाटले होते तसेही झालेले नाही.

जेव्हाही एखादी सस्पिशियस नोट छोट्या बँकेत भरते ती खरी असल्याबद्दल शंका असल्यास बँक कर्मचारी नोटेच्या पाठी नाव आणि नंबर लिहून घेतात.
मोठ्या बँकेत ती नोट चालली तर ठिक नाही तर फोन करून बोलावून परत देतात.
आणि बदल्यात फिट नोट घेतात.

(ता क - माझा खोट्या नोटा छापण्याचा धंदा नाही पण लोकांकडून सतत बर्‍याच नोटा घ्याव्या लागतात आणि प्रत्येकवेळी काऊंटरवरच्या माणसाला खरी /खोटी नोट ओळखता येतेच असे नाही.)

एक भारतीय म्हणून आणि एक सी ए म्हणून, मी आपल्या खालील वाक्याचा निषेध करतोय.

भारतातला प्रत्येक नागरिक काळा बाजर करतो. प्रत्येक सीए त्याला करायला मदत करतो.>>>>>

Dinesh, तुम्ही निषेध केल्याने परिस्थिती बदलत नाही. प्रत्येक सीए हा शब्द चुकीचा असेल पण प्रत्येक नागरिक हा शब्द बरोबर आहे.

<बाकीच्या रिकामटेकड्या ड्युआयड्यांचे जाउद्यात पण दिनेशदा you too?>
हे वाचल्याची नोंद घ्यायची राहिली होती. Wink

<<९०% च्या आसपास ५०० व १००० च्या नकली नोटांची अ‍ॅक्युरसी होती असे वाचण्यात आले.

- ५०० व १००० च्या नोटा चलनी इकोनोमिच्या ८६% किम्मत बाळगुन होत्या.

- लोक कॅश गाद्यातुन/कपाटातुन/पर्सेस मधुन बाळगुन असल्याने व रोख व्यवहारचे रेकोर्ड्स नसल्याने
ह्या ८६% किमतीच्या इकोनोमिवर अन्कुश असा नव्हताच

- खोट्या नोटां मुळे होणारा चलन फुगवटा हा क्ष वर्शा नंतरच्या नोटा बाद करून कसा जाईल? ह्याचा परिणाम महागाईवर होणार व होतच रहाणार

-साधा पास्वर्ड हॅक झाला तर लगेच आपण बदलतो. इथे ८६% कॅश इकोनोमिचा पासवर्ड कोणाच्या दुसर्याच्या हातात (रेफ ९०% अ‍ॅक्युरेट नकली नोटा ) आहे तर तुम्ही काहीच पाऊल उचलणार नाही का?

जर ही पाउले उचलणॅ शक्य होते तर भारतातला सर्वोत्तम अर्थतज्ञ पंतप्रधान १० वर्षे भांग पीऊन बसला होता का?>>

या प्रतिसादाचं आता काय करणं अपेक्षित आहे? तो भांग पीऊन लिहिला होता असं समजलं तर चालेल का?

<सगळे लेख हे ह्या निर्णायाची सोशल कोस्ट काय हेच बोलत आहेत पण तेव्हडीच व्याप्ती आहे का? > इकॉनॉमिक कॉस्टही आहे की. येतेय समोर.

< प्रत्येक सीए हा शब्द चुकीचा असेल पण प्रत्येक नागरिक हा शब्द बरोबर आहे.>

ज्याने त्याने स्वतःबद्दल बोलावं. उगाच सरसकटीकरण करू नये.

प्रत्येक सीए हा शब्द चुकीचा असेल पण प्रत्येक नागरिक हा शब्द बरोबर आहे.

अग्गोबै ! त्या नागरिकात सी ए ही येईलच ना ? की सेअ‍ॅ ए नागरीक नसतात ?

Proud

सरसकटीकरण केल्यास सगळी मागची पुढची भाजप्यांची टीम सुध्दा सामिल होते. आणि राहूल गांधींनी लावलेले मोदी वरचे आरोप सुध्दा खरे होतात. Happy

अहो सातीझाडूतैकाका
झे प्रतिसाद तोडून मोडून विचारलेल्या तुमच्या प्रश्नांचं निराकरण करून टाकूयात ना ?
मी टॅक्स नको असं कुठे वाचले म्हणे तुम्ही ?
आनि त्या काकांनी गुजरातेत इंटरनेट फुकट आहे हा शोध माझ्या प्रतिसादात कुठे लावला म्हणे ?

किमान एकसामायिक प्रॉब्लेम तरी सांगा दोघांचा काय आहे ते. मी चांगला डॉक्टर रेकमेण्ड करू शकते. तुम्हीच दोघांनी एकमेकांची काळजी घ्यावी असे काहीनाही हो. आम्ही आहोत ना !

Pages