कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो.
इतर वेळी आयुष्यात फार काही होत नाही , होत नाही म्हणता म्हणता किती काही घडलय गेल्या काही दिवसांमधे . अथांग समुद्र दूरपर्यंत पाहील तिथपर्यंत अगदी क्षितीजापर्यंत . काय आहे क्षितीज ? फक्त एक आभास.... कधी आकाश आणि समुद्र किंवा आकाश आणि जमीन भेटतात का ? फक्त आभास . आणि आकाश म्हणजे तरी काय नुसता दृष्टीचा भ्रम . या भ्रमातच होतो आजपर्यत आणि आयुष्यभर तसाच राहीलो असतो पण तस झाल नाही .....
=======================================
" अग अस काय करतेस डॉक्टर बोलल्या ना या सगळ्या उपचारांनंतर सगळ होईल ठीक . "
" पण मला हे सगळ करायचच नाही ना . "
" अग अस कस म्हणतेस , हे नाही केल तर आयुष्यात पुढे कस जाऊ शकतो आपण ? आताच प्रयत्न केले तर पुढच्या काही महिन्यात किंवा अगदीच नाही तर एखाद्या वर्षात आपण हा आनंद परत उपभोगू शकतो . "
" कसला आनंद ? तुला होत असेल आनंद , मिळत असेल सुख पण मला त्रास होतो , फार त्रास होतो आणि मला या मार्गाने जायचच नाही . "
" अग तुला होणा-या त्रासातून तुझी मुक्तता व्हावी यासाठी हे सगळ चालल आहे . "
" मला होणा-या त्रासासाठी की तुला हव्या असलेल्या सुखासाठी . "
" अग तू आणि मी वेगळे आहोत का ? हे आपल्या सुखासाठी चालल आहे . "
" आपल नाही फक्त तुझ . मला कधीही यात इंटरेस्ट नव्हता . "
" काय बोलते आहेस तू ? तुला कधीच इंटरेस्ट नव्हता ? अगदी लग्न झाल्यापासून ? "
" हो कधीच नव्हता . "
" तू स्वतःहून पुढाकार घ्यायची . "
" मला कधीही इंटरेस्ट नव्हता , तो फक्त बलात्कार होता जो तू माझ्यावर करत होता . "
डोक्यात एखादा स्फोट झाल्यासारख वाटल . आजवरच सगळ प्रेम सगळा शृंगार आता फक्त बलात्कार ठरला होता.... Marital Rape ... माझ्या सगळ्या भावभावनाच संपल्या होत्या . तिच्या डोळ्यात दिसणारी आसक्ती ते तृप्ती या भावना फक्त माझा भ्रम होता का ? तिचे ते अस्पष्ट हंकार फक्त होणा-या त्रासाचेच होते का ? सगळ वैवाहिक आयुष्य झरझर डोक्यापुढून जात होत आणि त्यात दिसणारे प्रेमाचे प्रणयाचे सगळे क्षण बेगडी वाटू लागले होते . माझ सगळ आयुष्यच निरर्थक वाटू लागल होत . अपराधीपणाची जाणीव होऊ लागली होती . तिच्याकडे पाहण्याची हिम्मत होत नव्हती आणि काही बोलण्याचा विचारही करता येत नव्हता . अस कस झाल ? मला तिच्या डोळ्यातली कोणतीही भावना कळलीच नाही का ? अशा एक ना अनेक विचारांच काहूर माजल होत डोक्यात . या विचारांमधे रात्री की पहाटे कधी झोप लागली समजलही नाही . सकाळी कधीतरी जाग आली तेव्हा सोफ्यावर होतो आणि पुरेशी झोप नाही झाली हे सांगायला चुरचुराने डोळे जड होणार डोक आणि झाकणा-या पापण्या पुरेशा होत्या . मंजू समोर आली तर तिच्याशी कस आणि काय बोलायच या प्रश्नाच उत्तर शोधत असतानाच ती समोर आली आणि तिला माहेरी सोडण्याबद्दल सांगून निघूनही गेली . मीही लगेच निघायची तयारी सुरू केली . आज ऑफिसमधे यायला जमणार नाही अस सांगून टाकल . इतरवेळी हेच किती अवघड वाटत होत आणि आता ..
इतका वाईट प्रवास आजवर कधी झाला नव्हता , दोघे सोबत होतोही आणि नव्हतोही . रेल्वेचे दोन रूळ एकमेकांना समांतर प्रवास करतात तसच काहीस कायम सोबत प्रवास पण अंतर राखून . सास-यांशी मोघम बोलून आणि सासूबाईंना खोट-खोट हसून उत्तर देतानाही अवघडल्यासारख झाल होत . माघारी येताना कसलीच ओढ नव्हती आणि गडबडही . ऑफिसच काय याचा विचारही नव्हता , म्हणून समुद्रमार्गे यायच ठरवल आणि बोटीवर चढलो ..
=======================================
बोट पाण्यावर हेलकावे खात निघाली होती तशाच मनातही अनेक भावभावना आठवणी हेलकावे खात होत्या .
सकाळी उठून यंत्रवत आवरत ऑफिसला जात होतो , येत होतो . काय चालल आहे काय नाही कशाचही भान नव्हत .
" अरे काय चालल आहे ? कुठ लक्ष आहे तुझ ? कोणत्या दुनियेत असतोस ? काही प्रॉब्लेम आहे का लाईफमधे ? " चक्क बॉस विचारत होता .
" काही नाही सर काही नाही . "
" अरे मुड ऑफ वाटतोय तुझा . काही असल तर सांग . काही त्रास असेल तर आराम कर थोडा . थोडी सुट्टी घे . "
" नाही सर फार काही नाही तुम्ही विचारल हेच खूप झाल माझ्यासाठी सुट्टीची काही गरज नाही . "
" काळजी घे आणि काय असेल तर सांग . हेल्थ फस्ट ."
चक्क चक्क बॉसने आपल्या तब्येतीची चौकशी केली . आपण याच्याबद्दल काय मत बनवल होत . बॉस असला तरी शेवटी तोही एक माणूसच आहे . छे आपण गेले काही दिवस अतीच केल , अस सर्वांसमोर दुःख उगाळण्यात काय हाशिल आहे .
= = = = = = = =
आजचा दिवस थोडा उत्साहातच सुरू झाला . काय माहीत का पण आज जरा छानच वाटत होत . नविन दिवस नविन आशा घेऊन येतो तसच काहीतरी असाव . छे गेल्या काही दिवसांमधे मी स्वतःचा अगदी अवतार करून घेतला आहे . दाढीही केली नाही इतके दिवस . कस वाटतय ते ? बर ज्याला दाढी व्यवस्थित येते त्याच ठीक पण माझ्यासारख्या ज्याला ती व्यवस्थित येत नाही , कुठे येते कुठे नाही त्याला सदैव क्लिन शेव्हच रहाव लागत . जे इतके दिवस मी करत होतोच पण गेल्या काही दिवसात .. असो . पण इतक्या दिवसात मंजूचा एकदाही फोन आला नाही . आणि मला स्वतःला इच्छा असूनही फोन करण्याच धाडस होत नव्हत . काय बोलणार होतो ? दाढी करण्यासाठी सगळ साहित्य घेतल होत आणि आता या विचारांनी परत ते कॅन्सल करणार होतो पण विचार केला आता हे दुःखाच प्रदर्शन बास .
....क्रमशः
भाग १ www.maayboli.com/node/55229
भाग २ www.maayboli.com/node/55239
भाग ३ www.maayboli.com/node/55264
भाग ४ www.maayboli.com/node/55293
भाग ५ www.maayboli.com/node/55354
भाग ६ www.maayboli.com/node/55545
भाग ७ www.maayboli.com/node/55591
भाग ८ www.maayboli.com/node/58057
इतक्या दिवसानंतर पुढचा
इतक्या दिवसानंतर पुढचा भाग
..
आता सलग येउद्या भाग. चांगले लिहिताय…
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद . पुढिल भाग लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न असेल .
अरेरे वाटले अगदी.. चांगले
अरेरे वाटले अगदी.. चांगले लिहीताय.
>>अरेरे वाटले अगदी.. चांगले
>>अरेरे वाटले अगदी.. चांगले लिहीताय.>> +१
आभारी आहे
आभारी आहे
खूप चांगली लिहीताय ही गोष्ट,
खूप चांगली लिहीताय ही गोष्ट, संसारातले बरेच बारकावे नीट मांडताय कोणा एका जेंडर ची बाजू न घेता.
शेवट गोड कराच
मस्त चाललीये शृंगारकथा.
मस्त चाललीये शृंगारकथा.
अनू आणि श्री आभारी आहे
अनू आणि श्री आभारी आहे
...
...