शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

Submitted by Rajesh Kulkarni on 29 December, 2015 - 08:40

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक माहिती.
माझे एक काका गुप्ती बाळगायचे. परवाना की नो परवाना पता नही. पण त्यामुळे त्यांचा दरारा होता. जो मलाही कामात यायचा. कारण माझ्याशी पंगा म्हणजे लगेच याचे काका गुप्ती घेऊन येतील असे पोरांना वाटायचे.

अमेरीकेत खुले आम शस्त्र वापरायला दिलेली मुभा काढुन घ्यायचा प्रस्ताव आला आहे. तिकडे तर गन ठेवतात आणि बेछुट गोळीबार ही करतात.

पिस्तुले लागतात कुणाला ? जे अवैध धंदे करतात किंवा राजकीय वैमनस्य पत्करतात. चोरांना भिती दाखवायला खेळण्यातली / नुसता आवाज करणारी पिस्तुले पुरेशी आहेत.

हा लेख खूप आवडला.
'आपण पिस्तुल ठेवावे' असं उगीचच्या उगीच धोका नसताना ग्लॅमर म्हणून मध्ये मध्ये वाटत असतं पण त्याचा परवाना लागतो यापलिकडे सामान्य माणसाला काहीही माहिती नसते.

माझ्या एका मित्राचे काका मिसाईल बाळगून आहेत. त्यामुळे आम्हाला सगळेच घाबरून असतात. पण आम्ही त्यातून फुले, भाजी, पत्रे पठवतो. कधी कधी हिमेश रेशमियाच शो असेल तर टमाटर पाठवाल का अशी विचारणा होते पण काका नाही म्हणतात. मिसाईल साठी परवाना घेतला का असे विचारायला पोलीस आले होते तेव्हां काका म्हणाले की मिसाईल हे शस्त्र असल्याचे सिद्ध करा. आता हा वाद कोर्टात चालू आहे.

माझ घर शेतात आहे आणि माझ्याकडे शस्त्र परवाना (शस्त्रासहीत) आहे. तुम्ही जी माहिती सांगितली आहे ती साफ खोटी आहे.

तेव्हां काका म्हणाले की मिसाईल हे शस्त्र असल्याचे सिद्ध करा.
>>>

रोचक मुद्द्दा
कायद्यानुसार शस्त्र कशाला म्हणावे?
बोकड कापायची सुरी किंवा म्हावर्‍याचा कोयता बाळगल्यास त्याला शस्त्र म्हणता येईल का? याने आपण माणूस मारू शकतो. नव्हे मारली जातात.

कायद्यानुसार शस्त्र कशाला म्हणावे? >>

माझ्या दुस-या एका मित्राच्या काकांनी तर अणुभट्ट्या लावल्यात. आम्ही मुलं त्या भट्ट्यात खेळायला गेलो की थोडे थोडे अणू काढून त्याचे बाँब बनवतो.

@ kapoche : हसुन हसुन पुरेवाट झाली... Happy Happy (दात काढुन हसण्यासाठीची अथावा लोट्पोट हसण्याची स्माइली कुठे आहे कोणी सांगु शकेल का..?......... मी नताशा : तुम्ही सांगाल का प्लीज..??)

@ मी नताशा : तुमच्या पोस्टीतील स्माइली कॉपी करुन पेस्टली तर हे "हाहा हाहा हाहा" असे येतेय Sad

शस्त्र परवाना संबंधी माहिती,
१) शस्त्र परवाना साठी कोणीही अर्ज करू शकतो.
२) गावा साठी आणि शहरा साठी नियम वेगवेगळे आहेत.
३) शस्त्र परवाना द्यायचा की नाही हा निर्णय शेवटी जिल्हा आयुक्त (district collector) घेतात. तुम्हाला त्यांन पटवुन द्यावे लागते की तुम्हाला शस्त्राची गरज का आहे.
४) नक्षलग्रस्त, शहर, संवेदनशील भागात शस्त्र परवाना मिळत नाही.
५) दर ३ वर्षांनी शस्त्र परवाना renew करावा लागतो. त्यासाठी एक fitness test पण असते.
६) निवडणूक असेल तर पोलिस तुमच्या घरी येतात आणि शस्त्राची नोंदणी करुन ते घेउन जातात. निवडणूक झली कि परत आणुन देतात. आज पर्यंत ह्या कामासाठी एक ही रुपया मी दिलेला नाही.

माझ्या सासरी बंदुका विकायचा धंदाच होता. बाकायदा रायफली आणि इतर. पण त्याची फार कटकट आहे म्हणून चुलत सासर्‍यांनी लायसन्स सरेंडर केले. अप्रतिम जुन्या परदेशी बनावटीच्या बंदुका घरात रॅकवर असत. एका पिढी मागे परेन्त ते शिकारही करत असत. आजे साबांकडे एक पिस्तूलही होते. पेपर वर्क फार आहे विकायचे. व विकत घेतानाचे ही.

हैद्राबादेत काही अशी दुकाने पाहिलेली आहेत पण बाहेरूनच.

मस्त विषय राकु. Proud
मला ही एकादे ब्रम्होस आंतरदेशीय मिसाईल घ्यायची फारच ईच्छा होऊन राहलेय, त्यासाठी लागणार्‍या परवान्याची भानगड कुठे करायची हे तुमच्या त्या मित्राला विचारुन सांगा ना.

माझ्या दुस-या एका मित्राच्या काकांनी तर अणुभट्ट्या लावल्यात. आम्ही मुलं त्या भट्ट्यात खेळायला गेलो की थोडे थोडे अणू काढून त्याचे बाँब बनवतो.
>>>

अहो कापोचे तुमच्या या येथील पोस्टमुळे त्या विनोदाच्या धाग्यावर माझी गुप्तीची सत्य पोस्ट सुद्धा फेकू म्हणून गणली जात आहे Proud

कमॉन, इथेही तेच लिहितो. गुप्ती म्हणजे एक साधेसेच हत्यार आहे. फक्त लहान वयात भारी वाटायचे ईतकेच.. Happy

एका पिढी मागे परेन्त ते शिकारही करत असत.
>>>
छर्याच्या बंदुकांनी जंगली सश्या डुकराच्या शिकार सर्रास होतात. मी सुद्धा एक अटेंड केली होती. ते देखील मस्त जीपच्या टपावर बसून मोठा फोकस धरायचे काम करत. नंतर त्या सश्याचे मटणही खाल्ले. त्याचे कान हातात धरून बंदूकीसोबत स्वताचा फोटोही काढलेला.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की ती छर्र्याची बंदूक परवाना शस्त्रात मोडते का?

ऋन्मेष,

डुकराची शिकार हा एक मोठा कार्यक्रम असतो. डुक्कर मरता मरत नाही. माझ्या एका वर्गमित्राचे आजोबा त्याला डुकराच्या शिकारीला घेऊन जायचे त्याने सांगितले. तो म्हणाला की उलट डुक्करच काही वेळा हल्ला करते जखमी झाल्यावर. मात्र तो हेही म्हणाला की डुकराच्या शरीरात इतकी चरबी असते की त्याचे मटण बनवताना वेगळे तेल, तूप वापरण्याची गरजही कमी असते. (ही सगळी माहिती त्याने पुरवलेली आहे)

अवांतराबद्दल क्षमस्व!

माझ्या परिचयातील एका व्हीआयपी माणसाला चार वर्षांपूर्वी एका पिस्तुलाचा परवाना मिळाला. ते पिस्तुल बरेच मोठे व जड होते. काहीतरी अडीच तीन लाखाचे होते म्हणे! त्या माणसाचा दावा असा की त्या वर्षात महाराष्ट्र शासनाकडून दिला गेलेला तो एकमेव पिस्तुल परवाना होता. खखोदेजा! पण पिस्तुल मोठे आकर्षक दिसत होते त्या बॉक्समध्ये!

@ ऋन्मेऽऽष : जंगली प्राण्यांची शिकार करणे गुन्हा आहे... उगीच एखादा पोलिस लॉगीन झाला असेल तर आय.पी. अ‍ॅड्रेस वरुन तुमचा माग काढुन लॉकर मधे टाकेल.. Proud Proud

डुक्कर मरता मरत नाही हे बरोबर आहे.

परवा गाडीखाली डुक्कर आले. कूलण्ट लीक झाले. कंपनीवाल्यांनी फक्त शोरूमला सर्विसिंग होईल म्हणून सांगत गाडी टो करून नाशिकला नेली आहे. कितीचा बांबू बसेल ठाऊक नाही.

दरम्यान, डुक्कर उठून पळून गेले.

सश्याची शिकार करणे गुन्हा कधीपासून झालेय, Uhoh हा आजच्या घडीला शेतीला त्रासदायक ठरणार्‍या डुकरांच्या शिकारीला वनखात्याची परवानगी लागते आणि शिकार केल्यावर वनखाते मेलेले डुक्कर जमिनीत पुरुन टाकते.

@ ऋन्मेऽऽष : जंगली प्राण्यांची शिकार करणे गुन्हा आहे... उगीच एखादा पोलिस लॉगीन झाला असेल तर आय.पी. अ‍ॅड्रेस वरुन तुमचा माग काढुन लॉकर मधे टाकेल.
>>>>
मी पण आधी हाच विचार केला पण मग विचार केला आधी तो अणूभट्टी वाल्याला आत टाकेल ना Proud

दीमा, बेफिकीर,
हो छर्र्याने डुकराची शिकार होत नसावी .. त्यावेळी फक्त सश्याचीच शिकार केलेली, उल्लेख केलाय ना तसा..
पण तेव्हा एक डुक्करही दिसलेला.. डुकराच्या मागे एक धीट गावकरी बंदूक घेऊन धावलेला.. जखमी तर करूया आणि मग पकडूया असा प्लान चालला होता.. बाकीचे त्याच्या धाडसाला नंतर शिव्याच घालत होते.. एवढे वेळ मी आणि माझा मित्र फोकस पकडून होतो पण त्या घडामोडीत अनुभवी लोकांनी फोकस घेतलेला.. पण डुक्कर निसटला ..

अवांतर - त्याच सफरीत वाघ की बिबळ्या कोणीतरी दिसलेला. लांबवर दिसलेला. फोटो काढायचा प्रयत्न केला होता पण काळोखच आला. रोड सोडून आत त्याच्या जवळ गाडी घुसवलेली. पण आम्ही टपावर बसलेल्या मुंबईच्या पोरांची फाटली आणि आम्ही दंगा घालायला सुरुवात केली. मग लांबूनच दर्शन घेत निसटलो..

डुकराची शिकार एकदा मामाच्या गावी अनुभवलीय, पण पाहिली नाही.
खाद्यपदार्थात बॉम्ब ठेवून डुकराचे तोंड उडवलेले बहुधा. त्या काळात जिथे बॉम्ब ठेवलाय तिथे डुकराच्या ऐवजी ईतर पाळीव प्राणी गायबैल जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते.
असो, त्यानंतर त्या डुकराचे मटणही चापलेले. अख्ख्या वाडीने त्या डुक्कराचा आस्वाद घेतलेला.

Pages