पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.
जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.
वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.
मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.
पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.
कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.
एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.
नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नादी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.
कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.
शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.
सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.
सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.
असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्शा अपुर्ण ठेवणारी होती.
कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.
Chan lihile
Chan lihile aahe.
Chitrapatachya pratikshet.
मी पण आतुरतेने वाट बघतोय
मी पण आतुरतेने वाट बघतोय चित्रपटाची. मी मूळ संचातले आणि चंद्रकांत लिमये यांचेही प्रयोग बघितले आहेत.
सचिनला आवाज राहुल देशपांडेंचा
सचिनला आवाज राहुल देशपांडेंचा आहे.
कविराज : पुष्कर श्रोत्री ?.
कविराज : पुष्कर श्रोत्री ?. पंडित वसंतखॉं देशपांडेंची गाणी कानामनात इतकी ठसलीत की दुसरं काही ऐकवणार नाही. महागुरूंवर चित्रित झालेलं एक गाणं पाहिलं. कंठसंगीताऐवजी करसंगीत , शारीरसंगीत वाटलं.महागुरूंना गाण्याप्रमाणेच संवादांनाही डबिंग असेल तर बरं होईल.त्यांच्या आवाजात खॉंसाहबांची कल्पना करता येत नाही.अर्थात राहुलचा आवाजही तरुणच आहे.
खासाहेबांची गाणी राहुलच्याच्
खासाहेबांची गाणी राहुलच्याच् आवाजात हवी. वसंतरावांच्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पना करणे त्रासदायक असले तरी इलाज नाहिये, निदान आवाज तरी मूळ असुदे.
चित्रपट नक्कीच पाहणार.
आताच दिल की तपीश ऐकले. आवाज
आताच दिल की तपीश ऐकले. आवाज आवडला. राहूलचा आवाज बरोबर बसतो आहे आणि गाणे ऐकायला सुंदर आहे.
सिनेमाची आतुरतेने वाट बघतो आहे.
माझ्यात हिंमत नाही
माझ्यात हिंमत नाही बॉ.
मयेकरांना अनुमोदन. सचिन पिळगावकर बघवत नाही अजिबात.
सूर निरागस हो पाहून खालील प्रश्न पडले.
तो कालखंड नक्की कुठला आहे
तो कालखंड नक्की कुठला आहे म्हणे ? दरबारी गायक पदरी बाळगण्याचा कालखंड आणि त्यात मधुनच नाचणार्या त्या फिल्मी बायका, चकचकाट, लोकांचे पोशाख.. कशाचा कशाला पत्ता नाय. असो.
म्हणजे तु अजुन बाजीराव मस्तानी चे प्रोमोज आणि गाणी पाहिली नाहीस अजुन.
सचिनने त्या तपिश गाण्यात
सचिनने त्या तपिश गाण्यात फारच बालिश अभिनय केलाय
कट्यार मधल्या एक से एक पदांनी
कट्यार मधल्या एक से एक पदांनी काय घोडं मारलं होतं >> तीदेखील आहेत. धीर धरा हो!!!!
सचिन बघवत नाही, पण राहुल "ऐकवतो" त्यामुळे त्याच्यासाठी का होइन पिक्चर बघणार.
राहुल देशपांडे यांचा आवाज
राहुल देशपांडे यांचा आवाज उत्तम आहे पण ते सुर बाहेर येताना फेशीयल एक्स्प्रेशन बहुदा बिघडते. नाटकात त्यांचा चेहेरा ताणलेला वाटतो. कदाचित सुबोध भांवेंना ते खासाहेब म्हणुन हवे असावेत पण स्क्रिन टेस्ट इतकी प्रभावी झाली नसावी. नाटकात पार्श्वसंगीत नसते त्यामुळे राहुल देशपांडे खासाहेब चालवुन घ्यावे लागत असावेत.
( ही माझी मते राहुल देशपांडे यांची गायकीचा आदर राखुन लिहलेली आहेत )
नंदिनीजी,
कट्यार मधली मुळ कथेशी विसंगत असलेली पदे गाळुन काही नवी पदे जोडली जातील बहुतेक. नाटक तीन तास चालावे म्हणुन जी जे फिलर्स टाकले जातात ते ही गाळले जातील. मुळ कथेत बारा वेळा खासाहेब पंडितजींशी दसर्याला सामना करुन राजगायकाचे पद मिळवण्याचा संघर्ष करतात त्या पैकी एक " तपीश" मधुन आला आहे.
मला आशा आहे या दोघांच्या जुगलबंदीची.
खाँसाहेबांच्या पत्नीचे पात्र
खाँसाहेबांच्या पत्नीचे पात्र नाटकात नाही, ते चित्रपटात आहे. त्याचे प्रयोजन काय आहे ते बघावे लागेल.
आरती अंकलीकर लहान असताना ( माझी कॉलेजभगिनी ) तिने फैयाज सोबत लागी करेजवा कटार, दूरदर्शनवर सादर केले होते. अभिषेकीबुवां पेक्षा थोडे वेगळे होते ते. आशा खाडीलकरनेही एकदा, सुरत पिया कि सादर केले होते आणि त्याला जोडून एक तराणाही गायला होता ( नाटकात नाही तो )
ह्या मंडळीनी प्रेक्षकांच्या
ह्या मंडळीनी प्रेक्षकांच्या काळजात कट्यार भोसकली नाही म्हणजे मिळवली ....
रॉबिनहुडजी, प्रेक्षक डॉन,
रॉबिनहुडजी,
प्रेक्षक डॉन, देवदास, याच रिमेकींग एक प्रयोग या सदरात पाहु शकतात. आपण पण कट्यारचे वेगळे रुप म्हणुन स्विकारायला हवे. नाटकाच जर तसच्या तस रुपांतर सिनेमात केल तर ती व्हीडीओ झाली असती.
सिनेमाच्या भव्यतेचा उपयोग करुन हा नवा प्रयोग कसा दिसतो ते पाहु या.
ह्याचीही कमला झाली नाही
ह्याचीही कमला झाली नाही म्हणजे मिळवली. महागुरुचे नाव ऐकल्यापासून चिडचिड वाढली आहे.
>>नाटक तीन तास चालावे म्हणुन
>>नाटक तीन तास चालावे म्हणुन जी जे फिलर्स टाकले जातात ते ही गाळले जातील. <<
रात्री ९ वाजता सुरु झालेलं "कट्यार..." पहाटे १-२ वाजेपर्यंत चालत असे ते मुळात त्यातल्या नाट्यसंगीतामुळे - गायकांच्या ताना, हरकती आणि त्यावर मिळालेली उत्स्फुर्त प्रेक्षका़ची दाद. यालाच तुम्ही "फिलर्स" म्हणत असाल; सिनेमात वेळेअभावी तो ऐवज नसण्याची शक्यता असेल तर तो एक मोठा रसभंग ठरु शकेल...
प्रेक्षक डॉन, देवदास, याच
प्रेक्षक डॉन, देवदास, याच रिमेकींग एक प्रयोग या सदरात पाहु शकतात.
>>
कुठे पाहू शकले? हे रिमेक फसलेलेच आहेत. मूळ ची सर तर सोडाच पण किमान दर्जाही गाठू शकले नाहीत हे रिमेक. मूळ डॉन ही तत्कालीन भिकारपटच होता केवळ अमिताभमुळे चाललेला. बालगंधर्वचा आघात पचवताहेत प्रेक्शक अजूनही !
रात्री ९ वाजता सुरु झालेलं
रात्री ९ वाजता सुरु झालेलं "कट्यार..." पहाटे १-२ वाजेपर्यंत चालत असे ते मुळात त्यातल्या नाट्यसंगीतामुळे - गायकांच्या ताना, हरकती आणि त्यावर मिळालेली उत्स्फुर्त प्रेक्षका़ची दाद.
मी किमान पाच वेळा हे नाटक पाहिल. मला तरी तीन तासांपेक्षा जास्त वेळ नाटक चालल्याच दिसल नाही. असो.
बाकेबिहारी सकाळ पासुन रात्रीच्या रागांचे वर्णन करतात हा प्रवेश मुळ कथेशी किती सुसंगत होता ? पण १२ वेळा सामना झाला याचा एक ही प्रवेश नसावा ?
मेधा व्ही,
कमला बाबत सहमत.
नितिनचंद्र, तूम्ही कुठल्या
नितिनचंद्र,
तूम्ही कुठल्या संचातले बघितले ? मी बघितलेला प्रयोग ५ तासांचा होता. तरी वसंतरावांच्या प्रयोगात, छोट्या सदानंदाच्या शिकवणीचा प्रवेशच नव्हता. फक्त भार्गवराम आचरेकरांचे दिन गेले भजनावीण हेच एक पद होते.
नाटकाची सुरवातच, बहुदा खाँसाहेब मैफिल जिंकून आल्यानंतर होते.
तूम्ही म्हणता तो रागमालेच्या प्रवेशात, प्रसाद सावकार गद्य म्हणत असत आणि फैयाझ, जान्हवी पणशीकर आणि प्रकाश घांग्रेकर ते राग गात असत. ( मूळ कथेशी सुंसगत नसला तरी मला तो प्रवेश खुप आवडला होता ! )
मान्य नाटकाबरोबर तुलना होणारच
मान्य नाटकाबरोबर तुलना होणारच पण नितिनचंद्र म्हणतात त्याप्रमाणे चित्रपट हे एक वेगळे माध्यम आहे आणि आताच्या नविन पिढीला ती कथा ओळख घडवण्याकरता अत्यंत उपयोगी ठरेल असे वाटते. त्यातुनच कदाचीत शास्त्रीय संगीत ऐकणारे नविन कानसेनही निर्माण होतील.
ट्रेलर आवडले.
https://www.youtube.com/watch?v=1iTazEogwiY
मी बघोतलेले नाटक दोन अडीच
मी बघोतलेले नाटक दोन अडीच तासाचेच होते.. लहान सदाशिव व पंडितजी ही दोन्ही पात्रेच नव्हती. त्याशिवायच नाटक होते.
आमच्या गावी हे (नाट्क)२५ ता.
आमच्या गावी हे (नाट्क)२५ ता. ला होणार आहे. अर्थातच आम्ही जाणारच आहोत. पण स्टारकास्ट माहिती नाही.
या नाटकात ११ पात्रे गाणारी
या नाटकात ११ पात्रे गाणारी आहेत त्यामुळे एखाद दुसरे दुय्यम पात्र आले नाही तर ते प्रवेश गाळून अॅडजस्टमेन्ट करीत असावेत. मला तर खांसाहेबांचे शागीर्द रियाजाला दांड्या मारणारे पुतणे आवडायचे. चंद्रकांत कोळी एक होते त्यात. अर्थात ते दोघेही पट्टीचे गायक होतेच. वसंतरावाना घेई छंद मध्ये संगत करत.
मी वसंतरावांचे (भार्गवराम, प्रकाश इनामदार.घांग्रेकर, फैयाज) आणि चंद्रकांत लिमयांचे पाहिलेय. आफळ्यांचे आणि रादेंचे पहायची हिम्मत होत नाही.
नवरोबांनी वरिजिनल
नवरोबांनी वरिजिनल पाहिलंय....वसंतरावांचं. मी हेच पहिल्यांदा पहाणार.
मीहि मूळच पाहिलेय. चित्रपटात
मीहि मूळच पाहिलेय. चित्रपटात सगळे नाटकासारखे असणे कसे शक्य आहे? बदल असणारच ना!
बालगंधर्व त्याच्या लिमिटेशन्स सकट चांगला होता. आणि चांगला चालला.
कट्यार काळजात घुसली सिनेमाचे
कट्यार काळजात घुसली सिनेमाचे नुसते ट्रेलर जरी सुरु झाले तरी काळजात कालवाकालव होतेय. मी लहानपणी पाहिलेय हे नाटक ओरिजिनल संचातले, आणि चंद्रकांत चंद्रकांत लिमयेंचे तर अनेकदा. त्यामुळे खासाहेब -पिळगांवकर व संगीत- शंकर एहसान लॉय वगैरे असं सगळं ऐकायलाही कसं तरी होतंय...कोणीतरी शनिवारवाडा पाडून त्या जागी मॉल बांधणार आहे असं तरी वाटतेय...किंवा पणजीच्या लग्नातली तिची पैठणी फाडून शिवलेली डिझायनर कुर्ती बघायला लागेल अशी काहीशी भावना झाली आहे. नव्या गोष्टीची नवलाई न वाटता परंपरा बदलण्याची भिती वाटणं ..... आपलं वय झालंय असं समजावं का?
मेधाव्ही सर्व पोष्ट पटली. आणि
मेधाव्ही सर्व पोष्ट पटली. आणि कालवाकालव अगदी काळजापर्यन्त पोचली.
फक्त शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नाही देता येत! :स्मितः
>>त्याप्रमाणे चित्रपट हे एक
>>त्याप्रमाणे चित्रपट हे एक वेगळे माध्यम आहे<<
बरोबर, आणि ते नाटकापेक्षा अत्यंत प्रभावी आहे यावर दुमत नसावं. मुळ नाटकाच्या कथेला/संगिताला योग्य तो न्याय दिला गेला तर ४-५ तासांचा सिनेमा पहायला रसिक नक्किच येतील...
>>या नाटकात ११ पात्रे गाणारी आहेत<<
गाणारी ११ कि सगळी मिळुन ११?
तुमची पोस्ट थोड्याफार
तुमची पोस्ट थोड्याफार प्रमाणात पटतीये पण मग नव्या गोष्टीचे स्वागत "शनिवारवाडा पाडून त्या जागी मॉल बांधणार" असं करण्याऐवजी "शनिवारवाडा पुन्हा बांधून त्याचे वैभव या काळाला पण दाखवून देणार" असे पॉझिटीव्ह अॅटिट्युड नी करावे असे वाटते.
या धाग्यावर अवांतरः बाजीराव
या धाग्यावर अवांतरः
बाजीराव मस्तानीचा प्रोमो बघीतला. हे असे आणि एवढे संगमरवरी बांधकाम होते का शनिवारवाड्यात?
आरसे आणि पायाला हात लावण्याचे दृश्य "प्यार किया तो..." च्या कॉपी पेस्ट चा प्रयत्न आहेत.
मराठीतले गाव आणि राव ईंग्रजीत गाओ / राओ कसे होतात? 'raav' लिहायला काय जाते?
आमच्या कॉलेज ने माझ्या कागदपत्रांवर वर gaon लिहून दिले आहे. दक्षीण भारतीय बाईंची कृपा.
बाकी, ते बाजीरावांच्य पत्नीचे चित्रपटातील पात्र जरा अतीच हसत होते असे वाटले. आपल्या जान्हवी सारखे!
Pages