" निशा इकडे ये ग. "
" काय दिदी ? "
" तुला एक खेळ सांगते, जमेल का तुला खेळायला ? "
" पण काय आहे खेळ ? "
" मी तुला एक वस्तू शोधायला सांगणार आहे आणि ती जर तू शोधून आणली तर तू जिंकलीस. "
" ठिक आहे दिदी मी प्रयत्न करेन . "
" ठीक आहे, तर मग ऐक इथुन सरळ रेषेत पुढे जायचं . मग तिथे कळकाच बेट शोधायच. त्याला एक फेरी मारायची आणि मग ज्या दिशेला पाण्याची टाकी दिसेल तिकडे जायच. पाण्याच्या टाकीपासून पूर्वेला २० पावलं जायचं . तिथे एक आंब्याचं झाड शोधायचं . मग तिथून दिसणा-या घरामधील तिस-या घरात जायचं तिथ दरवाज्या शेजारी खुर्चीवर एक लाल रंगाचा बाँक्स ठेवला असेल तो घेऊन यायचा . जमेल का तुला ? "
" हो दिदी जमेल मला. "
" चल मग जा बघू . पाहू किती कमी वेळात तू माघारी येते ते ."
निशाच्या तल्लख डोक्यात या गोष्टी ठेवण तस फार अवघड नव्हते .
तिने सुरूवात केली सरळ रेषेत . हे आल कळकाच बेट . याला एक राऊंड मारला . आता पाहू पाण्याची टाकी . ती तिकडे आहे .आता तिकडे जाऊया . ठीक आहे आता पोहोचले मी इथं , पाण्याच्या टाकीपाशी . आता इथून पूर्वेला जायचं आहे . पूर्व दिशा कोणती ? हो , ही आहे आपली सावली . मग ही आहे पूर्व दिशा . चला इकडे . ठिक आहे , हे आले मी आंब्याच्या झाडापाशी . चला आता तिसरं घर . पण हे काय हा कुत्रा कुणाचा ? फारच डेंजर दिसतो आहे . राहु दे आपण त्याच्याकडे पहायचं नाही .
पण तेव्हढ्यात कुत्रा थेट तिच्या अंगावर धाऊन आला . मग निशा रस्ता दिसेल तिकडे पळू लागली . ती पुढे आणि कुत्रा मागे अस बराच वेळ चालल होतं . निशाचा वेग कुत्र्यापेक्षा फार नव्हता पण बहुतेक कुत्र्याला तिला चावण्यात काही विशेष रस नसावा . म्हणून फक्त तो तिला पळवत होता . तिने पळण्याचा वेग थोडा कमी केला की तो थोड भुंकून तिला परत वेग वाढवायला भाग पाडत होता . अस बराच वेळ चालल होत . मग ती वेग कमी न करता शक्य तितक्या वेगात पळतच राहिली .
थोड्या वेळानंतर तिला कुत्र्याच भुंकण कमी-कमी होत बंद झालेल जाणवलं . तिने वळून पाहिलं कुत्रा कुठे दिसत नव्हता .आता कुठे तिच्या जिवात जीव आला होता .थोडा वेळ श्वास पुर्ववत झाल्यावर तिच्या लक्षात आल आपण शेतामधे पोहोचलो आहोत व हा भाग काही आपल्या माहितीचा नाही . आणि परत माघारी जाताना तो कुत्रा सापडला तर अशी भितीही होती सोबतीला .
ती थोडा वेळ तशीच थांबली . कोणी जवळपास दिसते आहे का हे तिनं पाहिलं . तिला एक मुलगा तिथं शेतात काम असलेला दिसला . ती त्याच्याकडे गेली आणि झालेली हकिकत तिने त्याला सांगितली . आणि आपल्या घराचा पत्ता सांगुन आपल्याला तिथं सोड असं तिने त्याला सांगितलं . त्या मुलाने तिला स्वतःच काम झाल्यावर घरी सोडून येण्याच मान्य केल .
तिला तहान लागली होती म्हणून तिला थोड पाणी देऊन तो मुलगा त्याच काम करु लागला . बराच वेळ त्याच काम चालल होत .तिला कंटाळा आला होता . पण काय करणार इतर कोणी दिसत नव्हते आणि आता तर तिला आपण एकटीने गेलो तर चुकू अस वाटत होत म्हणून ती थांबली .
संध्याकाळ होऊ लागली होती ..
......................................
इकडे निशा इतका वेळ कुठं गेली आहे याचा विचार करुन सायली रजनीला म्हणाली अग तिला कशाला सांगत बसली आणि तुला काय वाटलं ती जाऊन घेऊन येणार आहे . ती बसली असेल खेळत . चल आपणच जाऊया घेऊया . या मुलीच्या नादात उगाचच आपला बराच वेळ वाया गेला . मग त्या दोघीं सायलीच्या घरी गेल्या . त्यांनी तो बाँक्स घेतला आणि त्या दोघी निघाल्या . आज त्यांची मैत्रीण पूर्वीचा वाढदिवस होता . त्यामुळे त्या लगबगीने तिच्या घरी निघाल्या .
" निशा " ए " निशा " कुठ गेली ही मुलगी सुट्टी असली म्हणजे एक मिनिटही पाय घरात टिकत नाही हीचा . निशा जवळपास कुठे सापडली नाही म्हणून मंजूने सुरभीच्या घरी जाऊन चौकशी केली . तेव्हा सुरभीन सांगितलं की दुपारपासुन निशा तिला भेटलीच नाही . मग मात्र मंजूला भिती वाटू लागली . तिने सुरभी आणि तिच्या आईला घेऊन निशाच्या सर्व मैत्रीणींच्या घरी चौकशी केली . परंतु कुठेच काही पत्ता लागला नाही . आता मात्र मंजूचा धीर सुटला आणि ती रडू लागली . सुरभीची आई तिला धीर देत होती व निशा असेल इथेच कुठेतरी ती येईलच अस सांगत होती . पण मंजूला काही बर वाटत नव्हत .
शेजारी-पाजारी जमले होते आणि ज्याला जमेल तसे ते निशाचा शोध घेत होते . पण निशाचा काहीही पत्ता लागत नव्हता . दुपारपासुन कुणीच निशाला पाहिलं नव्हत . आता काय कराव हे सुचत नसल्यामुळे मंजू सारखी रडत होती .
" अग मस्त झाला ना वाढदिवस पूर्वीचा " सायली म्हणाली . रजनीही मग तिला टाळी देत म्हणाली " मस्त झाला गं . पण हे काय दुपारीच वाढदिवस साजरा करायचा ."
" अग असू दे तेच बर आहे . म्हणून मला येता तरी आल नाहीतर आमचं घर आड बाजूला असल्यामुळे मला कोणी येऊ दिल नसत ."
" अग हे तुमच्या इकडे काय चालल आहे . त्या काकू का रडत बसल्या आहेत आणि किती लोक जमा झाले आहेत . नक्कीच काहीतरी झाल असणार . चल आपण जाऊन पाहूया . "
" अहो कुठ काय इथ घरापाशीच तर खेळत होती . मी थोडी कामात होते . माझं काम आटोपून बाहेर आले तर कुठच नाही सापडली . सगळीकडे चौकशी करून झाली ."
" काय झालं काकू " - रजनी
" अग निशा दुपारपासुन सापडत नाही . " सुरभिच्या आईनं सांगितलं .
" अहो काकू मी तिला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायला सांगितलं होतं पण ती परत आली नाही तेव्हा मला वाटल ती खेळत बसली असेल म्हणून आम्ही दोघी स्वतःच घरी जाऊन आलो . "
" चल बघु जाऊया तिकडे . बघु तिकडे सापडते का . " - मंजू
सगळे सायलीच्या घरी पोहोचले . तिथं चौकशी केल्यावर सायलीच्या आईनी निशा आलीच नसल्याच सांगितलं . तिथं जवळपास चौकशी केल्यावर काही लहान मुलांनी एका मुलीच्या अंगावर कुत्रा धाऊन गेला म्हणून ती पळत सुटल्याच पाहिल असल्याच सांगितलं . त्यांनी सांगितलेल्या दिशेने सर्वांनी जायला सुरूवात केली .
दिवस आता मावळू लागला होता त्या धुसर उजेडात समोरून काहीतरी अस्पष्ट आकृती येताना दिसली साक्षात यमच . आपल्याला असे भास का होत आहेत अस मंजूला वाटत असतानाच कोणीतरी कारट ओरडलं " संभा दादा आला . मंजूने नीट पाहिलं रेड्यावर बसून कोणीतरी येत होत . तो रेडा जवळ येत होता . तो पुरेसा जवळ आल्यावर त्याच्यावर बसलेला मुलगा आहे आणि आणि काय... पुढे निशा . मंजूने धावत जाऊन निशाला उतरवून घेतलं . तिला कवटाळून ती बराच वेळ रडत होती . लोक काय बोलत आहेत ते तिला काही ऐकू येत नव्हतं .
निशाचं जेवण झाल्यावर मंजूला जरा बरं वाटलं . " काय हे निशा अस करत का कोणी . " - मंजू
" अग आई तो कुत्रा मागे लागला मग मी पळत सुटले इथुन सुरू करून दुपारपासुन आतापर्यंतचा संपूर्ण वृत्तांत सांगून होईपर्यंत मंजूला कधी नाही ते रजनी तो कुत्रा आणि तो रेडा यांच्यासाठी चार दोन शिव्या जिभेवरून तरंगून गेल्या , त्या फक्त तोंडातून बाहेर आल्या नाहीत एव्हढच .
तिच सांगून झाल्यानंतर शक्य तेवढया सोज्वळपणे मंजूने रजनी , तो कुत्रा आणि तो रेडा यांच्यावरचा आपला राग बोलून दाखविला .
" अग आई पण ती म्हैस होती आणि तिनं
कुठं काय केल ? तिनं तर मला इथपर्यंत आणून सोडलं ."
" हो ती म्हैस तिनं तो बॉक्स आणायला सांगितला आणि तो रेडा जो तुला इकडं आणायच सोडून काम करत बसला शेतात ."
" अच्छा त्याला होय मला वाटलं मी बसून आले त्या म्हैशीला तू बोलली ."
" आणि काय गं दोघ दोघ काय बसला होता त्या म्हशीवर . तिला झेपणार होतं का हे ?"
" अग आई तू माझ्या बाजूने आहेस का म्हशीच्या ? "
" अग तिला ओझं झालं तर ती काय तोंडाने सांगू शकते का की बाई खूप ओझं होत आहे कुणीतरी उतरा .
तिने नकारात मान हलवली असती नुसती आणि शिंग बिंग लागलं असतना तुला . तुचं बसली होतीस ना पुढे . "
" हो पण मजा आली ."
" कशाची म्हैशीवर बसण्याची . काय तर बाई म्हणे मजा . कुणाचं काय तर कुणाचं काय तो यम बसतो रेड्यावर आणि तु बैस म्हशीवर आणि आमच्या गळ्यात टाका फास . बाई बाई बाई ... "
" हे बघ आता अस करायचं नाही कुठही अनोळखी ठिकाणी एकटीने जायचं नाही आणि कुत्रा अंगावर आला धाऊन तर पळायचं नाही . आपण त्याच्यापेक्षा जास्त वेगाने नाही पळू शकत आणि .. "
" झोपते मी मला झोप आली आहे . उद्या सांग बाकीचं . "
" ठीक आहे झोपा . "
बर झालं अजून जास्त काही बोलले नाही आहे . तितकच फार झालं तिला . आणखी काही झाल्याचं सांगितलं असत तर .....
..... क्रमशः
भाग १
भाग ३
भाग ४
रहस्यमय दिसते कथा. थोडे
रहस्यमय दिसते कथा.
थोडे लौकर भाग टाकायचे बघा ना. कारण ना खूप दिवस झाले ना की आधीची कथा विसरायला होते. धन्यवाद. 
नक्कीच प्रयत्न करेन पुढील भाग
नक्कीच प्रयत्न करेन पुढील भाग लवकर घेऊन येण्याचा
अनघा. +++++11111
अनघा. +++++11111
पुढील भाग लवकर टाका
पुढील भाग लवकर टाका
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
भाग ३ post केला आहे . पुढील
भाग ३ post केला आहे . पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन