विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.
आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.
बर्याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.
मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.
नारळाच्या झाडावर चढलेले हे उत्सवमुर्ती. ह्याच फोटोत डाव्या बाजूला साळुंखी पक्षी वार करण्यासाठी आलेली दिसते.
१)
नंतर धामण झाडाच्या झावळ्यांच्या खोपच्यात लपली तेंव्हा तिला शोधण्याची एकेकाची धडपड आणि चेहर्यावरचे हावभाव पहा.
२) हा दयाळ त्या नारळाच्या झाडाखालच्या तारेवर.
हा राड्याच्या प्लान संध्याकाळी चालू होता. बराच वेळ ती धामण बाहेर येण्याची मी टेरेस वरून वाट पहात होते. पण ती काही येत नव्हती. मग मला एका कामानिमित्ताने बाहेर जावे लागले त्यामुळे हे नाट्य कधी संपुष्टात आले ते कळले नाही. पुढच्यावेळी पूर्ण टिपण्याचा प्रयत्न करेन.
हाहाहा सही आहे हे. असा राडा
हाहाहा सही आहे हे.
असा राडा मध्यंतरी आमच्या घरामागे एक शिक्रा आला तेव्हा झाला होता. दोन खंड्यापक्षी आलटुन पालटुन वार करत होते.
फुल्ल जमलाय की राडा. फोटु पण
फुल्ल जमलाय की राडा. फोटु पण भारीयेत.
व्वा ,मस्त टिपलाय राडा
व्वा ,मस्त टिपलाय राडा
वा, नाव वाचुनच वाचावेसे
वा, नाव वाचुनच वाचावेसे वाटले. सही आहे हा राडा .
फोटो मस्त आले आहेत. राडा
फोटो मस्त आले आहेत. राडा घडताना बघायला अजून मजा आली असती.
भारी!
भारी!
वाह!!! खुप सुंदर आहे!!!
वाह!!! खुप सुंदर आहे!!!
शेवटचा फोटो जास्त आवडला.
शेवटचा फोटो जास्त आवडला.
मस्तच.. डिस्कवरी वाल्यांसारखा
मस्तच.. डिस्कवरी वाल्यांसारखा कॅमेरा लावून ठेवायला हवा, पूर्ण शो बघायला
भारी!
भारी!
भारी आहे की राडा.
भारी आहे की राडा.

काय मस्त टिपले आहेस ! जागू
काय मस्त टिपले आहेस ! जागू कॅमेरात व्हीडीओ मोड असेल तर सरळ क्लीपच काढ. यू ट्यूबवर अपलोड करणे सोपे आहे.
मस्त आहे गं राडा. पक्षी पण
मस्त आहे गं राडा. पक्षी पण किती जागरुक असतात ना.. वेळप्रसंगी एकमेका साह्य करु ह्या मोडात अगदी चटकन जातात.
खारू ताईंचे हावभाव पहा.>>>
खारू ताईंचे हावभाव पहा.>>> खरच जबरी भाव आहेत तोंडावर.
बाकी राडा भारीच आहे.
सहीये!!! त्या प्राण्यांचे भाव
सहीये!!! त्या प्राण्यांचे भाव कसले अफलातून आले आहेत.
दयाल आणि खारूताई सीआयडी मधलेच
दयाल आणि खारूताई सीआयडी मधलेच वाटताहेत
राडा भारीच!!
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव चमकून जाऊन परत परत २-३ वेळा वाचलं

कसलं मस्तय हे
आणि स्पेशली सगळे पक्षी एकमेकांना मदत करायला सरसावलेत. त्यात माझी फेवरेट खारूतै!
इकडे बघायला धम्माल येतेय पण अशी धामण वगैरे रोज घरापाशी फिरणं म्हणजे
राडा अगदि जमलाय, मस्त!
राडा अगदि जमलाय,
मस्त!
रिया सर्पमित्राने एकदा धामण
रिया
सर्पमित्राने एकदा धामण पकडली होती पण तो परत सोडू का विचारत होता. तो म्हणत होता ही उलट तुमच्या फायद्याची आहे. काही करत नाही आणि उंदीर खाते आजूबाजूचे.
विजय धन्यवाद.
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव चमकून जाऊन परत परत २-३ वेळा वाचलं >> +१
सहीए हा राडा! खारुतैचे हावभाव मस्त!
सहीये!!! त्या प्राण्यांचे भाव
सहीये!!! त्या प्राण्यांचे भाव कसले अफलातून आले आहेत. >>>> +१००
राडानाट्यात कॅमेरा घेउन सामिल
राडानाट्यात कॅमेरा घेउन सामिल झालेली जागु पण हवी होती.....
चनस, शशांक, धन्यवाद. निसर्ग
चनस, शशांक, धन्यवाद.
निसर्ग चक्र माझे फोटो काढायला कॅमेरा धामण च्या हातात द्यायला लागला असता
खारूताई भा री धामणी फिरल्या
खारूताई भा री
धामणी फिरल्या घराच्या आसपास तर काही एवढे डेंजर नाही, नसावे, (सर्पमित्र बोल्ला ना)
पण खारूताई एवढ्या सहज ऊंदडताना बघायला मिळणे सही आहे..
विडिओ क्लिप नक्की काढा .. खार आणि धामण डेडली कॉम्बिनेशन.. विडिओ हिट होईल
मी कैतरी स्पेशल सामिश खादाडी
मी कैतरी स्पेशल सामिश खादाडी असेल म्हणून उघडल हे
तू भारी आहेस जागु! मस्त टिपलयस.
असा राडा पाहायला जाम मजा
असा राडा पाहायला जाम मजा येईल. वर्णन भन्नाट आहे.
प्रची ६
जबरी.
जबरी.
भारी! वर्णन आणि फोटो दोन्ही.
भारी! वर्णन आणि फोटो दोन्ही.
जागू मस्त टिपलायस राडा. महान
जागू मस्त टिपलायस राडा. महान आहेस.
Pages