(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वा नव्या भागाबद्द्ल सगळयांचचं
वा नव्या भागाबद्द्ल सगळयांचचं अभिनंदन !!!
शशांकजी, सुंदर मनोगत.
वाह.. नवीन वर्षाची नवीन , गोड
वाह.. नवीन वर्षाची नवीन , गोड सुरुवात
सर्वांचे अभिनंदन..
(No subject)
व्वा जागू!२५व्या धाग्याबद्दल
व्वा जागू!२५व्या धाग्याबद्दल विशेष अभिनंदन!
शशांकजी,प्रस्तावना सहज,ओघवत्या भाषेत अगदी अप्रतिम!
सुरेख फोटो, सुरेख
सुरेख फोटो, सुरेख प्रस्तावना!
नवीनवर्षाच्या शुभेच्छा!
हा गप्पांचा गुलमोहोर सदा बहरत राहो!
सुंदर प्रस्तावना व प्रचिही !
सुंदर प्रस्तावना व प्रचिही ! नुतनावर्षाभिनंदन!
अ ति श य सुरेख प्रस्तावना.. न
अ ति श य सुरेख प्रस्तावना..

न विन भागाच्या, न विन व र्षाच्या खुप शुभे च्छा..
नैसर्गीक गुढी खुप आ व डली
नैसर्गीक गुढी खुप आ व डली शशांकजी...
अगदी सुयोग्य शब्दातली
अगदी सुयोग्य शब्दातली प्रस्तावना अन रंगोत्फुल्ल मनमोहक नैसर्गिक गुढी … नववर्षाची प्रसन्न सुरुवात...
'रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं.">>> किती सुन्दर लिहीलय .हे पुस्तक वाचलच पाहिजे.
आज मी एक सुन्दर झाडान्ची
आज मी एक सुन्दर झाडान्ची कविता काव्य विभागात टाकली आहे सर्व निगप्रेमीनी ती वाचावी अशी विनन्ती
निसर्गप्रेमीना नवर्षाच्या पालवत्या शुभेच्छा...
http://www.maayboli.com/node/53188
जागू, शशांक आणि सायली,
जागू, शशांक आणि सायली, तिघांच्याही वेगवेगळ्या रुपातल्या गुढ्या आवडल्या.
सर्वांचे अभिनंदन. आज
सर्वांचे अभिनंदन.
आज नगरजवळच्या करंजी (खायची नव्हे) काही पॉलीहाउसेस आणि शेती पहाण्याचा योग आला. अहाहा.
वेळ मिळाला की लिवते आन फुटू बी ड्कवते.
वा वा, अभिनंदन नवीन
वा वा, अभिनंदन नवीन भागाचे.
प्रस्तावना सुंदर शशांकजी.
सर्वांचे अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन.
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार ....
सध्या पुढील अंगणात (कुंडीतला) मोगरा टपोरलाय अन मागील दारी चक्क रातराणी (ही देखील कुंडीतलीच) बहरलीये ... फोटो यथावकाश टाकेन ...
आय बी एन वर ताम्हिणी जंगल
आय बी एन वर ताम्हिणी जंगल बघतेय, मस्त झाडे, पक्षी (गरुड),फुले.
शशांकजी, नशीबवान आहात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/53217
सुदुपार निगकर्स. हे वाचाल का?
२५ वा भाग हि एक केवळ संख्या
२५ वा भाग हि एक केवळ संख्या झाली.. जागूसकट सगळ्यांचा उत्साह, आणि या गप्पांचा ताजेपणा पहिल्या भागा इतकाच आहे आणि तो तसाच राहणारही आहे.
जरी आपण सगळे शहरी असलो तरी
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे. >>>> वा शशांकजी अगदी उमलत्या फुलासारखी सुंदर प्रस्तावना,___/\__ मस्त.
( गो.नि.दांच्या लेखनाचा मी पंखा आहे)
निसर्गाच्या सर्व लेकरांचे अभिनंदन
२५ वा भाग हि एक केवळ संख्या
२५ वा भाग हि एक केवळ संख्या झाली.. जागूसकट सगळ्यांचा उत्साह, आणि या गप्पांचा ताजेपणा पहिल्या भागा इतकाच आहे आणि तो तसाच राहणारही आहे. >>>>> अग्दी अग्दी ...
निसर्गाच्या सर्व लेकरांचे अभिनंदन >>>>> निसर्गाची लेकरे हे अतिशय, अतिशय आवडले ...
आमच्या बागेत सध्या फुललेली
आमच्या बागेत सध्या फुललेली काही .....
आत्ता कंपनीच्या बागेत एका
आत्ता कंपनीच्या बागेत एका कोपर्यात हे झाड बहरलेले दिसले ....
शशांक बाग मस्तय. आणि हे पिवळ
शशांक बाग मस्तय. आणि हे पिवळ फूल भेंडीचं?
हे पिवळ फूल भेंडीचं? >>>>
हे पिवळ फूल भेंडीचं? >>>> नाही.... पानं बघ ना नीट ...
कांचन का आपटा हा?
कांचन का आपटा हा?
कांचन
कांचन
हे पिवळ फूल >>>> Bauhinia
हे पिवळ फूल >>>> Bauhinia tomentosa
नि.ग.चा नवीन भाग आला
नि.ग.चा नवीन भाग आला पण...:)
प्रस्तावना फारच सुंदर .
कुंची फार आवडली.
ओह...म्हणजे आपट्याचं का? आणि
ओह...म्हणजे आपट्याचं का?
आणि हो शशांक सांगायचं राहिलं...तुझी प्रस्तावना आणि गुढी दोन्ही मस्तच.
मानुषी, आपटा नाही. आपट्याला
मानुषी, आपटा नाही. आपट्याला फुले येतात पण अगदीच लहान असतात.
Pages