गणपती बाप्पा मोरया!
कुठेतरी व्यक्त होणे ही खरेतर सगळ्यांचीच गरज! मायबोलीने मायबोलीकरांना 'कोणाशी तरी बोलायचंय' हे सदर देऊन काही प्रमाणात त्या गरजेची पूर्तता करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला आणि आपण इथे व्यक्त होऊ लागलो.
चालत्या-बोलत्या माणसांना, पशू-पक्षांनाही व्यक्त होण्याची शक्ती निसर्गाने दिली आहेच, अशांचं ठीक आहे हो! पण जी व्यक्ती, पात्रे अस्तित्वातच नाहीत आणि तरीही आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेली आहेत त्यांचे काय? त्यांच्याही काही व्यथा असतीलच की. त्यांना देखील कुठेतरी व्यक्त होण्याची गरज असू शकते. त्यांनाही कोणाशी तरी बोलायचं असू शकतं! त्यासाठीच 'मायबोली गणेशोत्सव २०१४' मध्ये आपण घेत आहोत एक अनोखी स्पर्धा!
तुम्हाला अशाच 'प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या' पात्रांसाठी 'कोतबो' सदरात प्रवेशिका द्यायची आहे. सिनेमा, कादंबरी, मालिका अशा विविध माध्यमांतून आपल्याला भेटणार्या पात्रांना इथे बोलायला लावायचंय. पण या स्पर्धेतला थोडासा ट्विस्ट असा की हे "कोतबो" विनोदी असावे.
नियमावली:
१) ज्या पात्राच्या नावाने प्रवेशिका आहे ते पात्र खर्या आयुष्यात कधीही अस्तित्वात असायला नको. तुम्ही कादंबरी, चित्रपट किंवा मालिकांमधले कोणतेही पात्र निवडू शकता, फक्त ते काल्पनिक पात्र हवे. (उदा. 'आय डेअर' पुस्तकातल्या 'किरण बेदी' किंवा 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातले मिल्खाजी किंवा राऊ मालिकेतले 'बाजीराव पेशवे' ह्या व्यक्तिरेखा चालणार नाहीत. 'गारंबीचा बापू' मधला 'बापू', झपाटलेला चित्रपटातला 'तात्या विंचू' किंवा 'होणार सून मी ह्या घरची' मधली 'जान्हवी' ह्या व्यक्तीरेखा चालतील.)
२) लिहिणारी व्यक्ती स्वतः कोणाशी तरी बोलत आहे असे दाखवून प्रथमपुरुषी एकवचनात लिखाण असावे.
३) लेखन विनोदी हवे.
४) शब्दमर्यादा किमान ५०० ते कमाल ७०० शब्द इतकीच असावी.
५) प्रत्येक आयडीला एकच प्रवेशिका देता येईल.
वाटतेय ना मजेशीर? तर मग घ्या पाहू लिहायला तुमची प्रवेशिका!
स्पर्धेत भाग कसा घ्याल?
"मलाही कोतबो" स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून (२९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (८ सप्टेंबर २०१४, अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) प्रदर्शित करायच्या आहेत. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २९ ऑगस्टला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१४' पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपचे सदस्य झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ग्रूप मधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
"मायबोली आयडी - मलाही कोतबो : तुम्ही निवडलेल्या पात्राचे नाव".
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये "मलाही कोतबो" आणि "मायबोली गणेशोत्सव २०१४" हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Save ची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. लक्षात घ्या, हा धागा मायबोलीवर आधीच असलेल्या "कोणाशी तरी बोलायचंय" या ग्रूपमध्ये उघडायचा नाही.
९. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंत चतुर्दशीनंतर उघडण्यात येईल व विजेत्याला ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
हे हे हे. इथे मजा येणार.
हे हे हे. इथे मजा येणार. मस्त आयडिया संयोजक.
मस्त आयडिया!
मस्त आयडिया!
Bharat dada I am expecting
Bharat dada I am expecting your entry
धमाल येणारे ह्या एंट्रीज
धमाल येणारे ह्या एंट्रीज वाचायला! मस्त आयड्याची कल्पना!
मजेदार!
भारी कल्पना. पात्र काल्पनिक
भारी कल्पना. पात्र काल्पनिक आयुष्यात (कथा इ. ) अस्तित्वात हवं का? आणि मनुष्य प्राणी हवं का?
एकदम मस्त कल्पना.. very
एकदम मस्त कल्पना.. very creative..
लय भारी आयडिया संयोजक. मजा
लय भारी आयडिया संयोजक. मजा येईल वाचायला.
भारी आहे हे इथल्या प्रवेशिका
भारी आहे हे
इथल्या प्रवेशिका मी सर्वात आधी वाचणार!
भारी आहे स्पर्धा
भारी आहे स्पर्धा
धमाल आयडिया.. स्वप्ना वाचत
धमाल आयडिया..
स्वप्ना वाचत असशील तर नक्की लिही ईथे.. तुझ्या एंट्रीची वाट बघतेय..
अमितव, पात्र काल्पनिक
अमितव,
पात्र काल्पनिक आयुष्यात (कथा इ. ) अस्तित्वात हवं का?
>>>
हो.
आणि मनुष्य प्राणी हवं का?
>>>
अशी काही अट नाही. फक्त वस्तू नको. (उदाहरणार्थ, तुम्ही टॉम अँड जेरी मधल्या टॉमच्या नावाने 'कोतबो' लिहू शकता.)
भारी आहे हे इथल्या प्रवेशिका
भारी आहे हे
इथल्या प्रवेशिका मी सर्वात
आधी वाचणार! >>>> लले नुसता वाचनमात्र सहभाग नकोय . लेखणी पण उचल
सहीये!
सहीये!
स्वप्ना वाचत असशील तर नक्की
स्वप्ना वाचत असशील तर नक्की लिही ईथे.. तुझ्या एंट्रीची वाट बघतेय..>>> येस्स... +१
मायबोलीच्या
मायबोलीच्या प्रताधिकाराविषयीच्या धोरणांचा आदर राखून चित्रे बदलत आहोत.
तसदीबद्दल क्षमस्व!
भारी आयडिया संयोजक. मजा येईल
भारी आयडिया संयोजक. मजा येईल वाचायला.
मस्त आयडीया.
मस्त आयडीया.
मज्जा!!!
मज्जा!!!
मस्त मजेशीर
मस्त मजेशीर इंट्रेस्टींग
विनोदी च असावे हि अट बेस्ट
वा बेस्ट आहे. संयोजक,
वा बेस्ट आहे. संयोजक, कल्पना सुपर्ब. मजा येणारे वाचायला.
धम्माल आहे ! म्हणजे ही
धम्माल आहे ! म्हणजे ही काल्पनिक व्यक्ती कोणाशी तरी बोलत आहे असं का की निवेदक/ निवेदिका त्या व्यक्तीशी बोलत आहे असं तेवढं एक कळलं नाही..
सहिये हि देखील कल्पना,
सहिये हि देखील कल्पना, यावेळचे दिवाळी-गणपती फुल्ल रंगणार आहेत
<. नवीन लेखनाचा धागा उघडला
<. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
"मायबोली आयडी - मलाही कोतबो : तुम्ही निवडलेल्या पात्राचे नाव".
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये "मलाही कोतबो" आणि "मायबोली गणेशोत्सव २०१४" हे शब्द लिहा.>
या दोन्हीच्या मध्ये, शीर्षकाच्या खाली 'विषय; आहे आणि त्यासाठी ड्रॉप डाउन मेन्यु आहे. तिथे काय निवडायचं? लवकर सांगा.
मी उपक्रम आणि मायबोली हे
मी उपक्रम आणि मायबोली हे निवडले.
बरोबर भरत मयेकर.
बरोबर भरत मयेकर.
या स्पर्धेसाठी प्रवेशिका
या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारणे आता बंद करत आहोत.
आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिका खालील प्रमाणे -
१) सारिका चितळे - मलाही कोतबो - सौ. शशीकला सहस्त्रबुद्धे - http://www.maayboli.com/node/50652
२) अगो - मलाही कोतबो : टफी - http://www.maayboli.com/node/50650
३) वेदिका - मलाही कोतबो- शेल्डन कूपर - http://www.maayboli.com/node/50657
४) स्पार्टाकस - मलाही कोतबो : शेरलॉक होम्स - http://www.maayboli.com/node/50658
५) तुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते - http://www.maayboli.com/node/50594
६) धूम फेम अली - गण्या - मलाही कोतबो - http://www.maayboli.com/node/50578
७) जिगीषा : मलाही कोतबो: अदिती - http://www.maayboli.com/node/50641
८) कविता१९७८ - मलाही कोतबो - सुरेश कुडाळकर - http://www.maayboli.com/node/50618
९) केदार१२३ मलाही कोतबो मी एक झाड - http://www.maayboli.com/node/50612
१०) फारएण्ड - मलाही कोतबो - एक साईड व्हिलन - http://www.maayboli.com/node/50599
११) आशिका: मलाही कोतबो: खानदानी बडी बहू - http://www.maayboli.com/node/50605
१२) प्रदीपा मलाही कोतबो - गणपती बाप्पा - http://www.maayboli.com/node/50640
१३) बेफिकीर - मलाही कोतबो - आदित्य देसाई - http://www.maayboli.com/node/50609
१४) "मी अनन्या - मलाही कोतबो : डोरेमॉन". - http://www.maayboli.com/node/50635
१५) माँ - सीमंतिनी - मलाही कोतबो - http://www.maayboli.com/node/50587
१६) निर्मल - मलाही कोतबो: भागीरथी गोखले - http://www.maayboli.com/node/50674
१७) manee - मलाही कोतबो : संता सिंग - http://www.maayboli.com/node/50688
१८) MallinathK -मलाही कोतबो : Adm!n. - http://www.maayboli.com/node/50718
नजरचुकीने एखादी प्रवेशिका राहुन गेली असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे.
मतदान सुरु !
मतदान सुरु !
आपल्या आवडत्या प्रवेशिकेला मत द्या .
आता कशाला शिजायची बात
http://www.maayboli.com/node/50769
मलाही कोतबो
http://www.maayboli.com/node/50768
संयोजक, अरुंधती कुलकर्णी
संयोजक, अरुंधती कुलकर्णी यांनी लिहिलेला कोतबो मी एक डु आय डी दिसत नाहिये, इथेही व मतदानाच्या धाग्यावरही.
जरा बघाल का प्लीज?
Pages