Submitted by Aseem Bhagwat on 16 February, 2014 - 13:25
पिक्चर झेपला नाही. जे समोर दिसतंय तेव्हढंच ते नाही हे जाणवतं, पण काय ते कळत नाही. अन्याय, अत्याचार असेल असं वाटलं. पण तसं काहीच नाही. फक्त पिक्चर संपल्यावर पुढे काय झालं असेल या विचाराने छळ होत राहतो. कुणीतरी रिव्ह्यु लिहील असं वाटलं होतं. कॅमेरा बिमेरा काहि कळत नाहि. किशोर कदमची अॅक्टींग भारी आहे. बाकि कुणीच ओळखीचं नाही.
त्या वकिलांच्या ल्ल ल्ल ला, ल ल ला ला वाल्या सिरीयल मधला तो अतिशहाणा वेटर इथं सलूनवाला दाखवलाय, तो एक ओळखू आला. बाकि सगळंच वेगळं आणि नवीन आहे. सूचक कवितेसारखं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नागराज मंजुळेने दिग्दर्शित
नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे , सिनेमातले ( बाल) हिरो हिरोईन हे कसलीही अभिनय पार्श्वभुमी नसलेले नवीन कलाकार आहेत .खरं कसब नागराजचं आहे अशा कलाकारांकडुन अभिनय करुन घ्यायचं.
मला जर जमलं तर मी नक्कीच हा सिनेमा पाहीन.
लोकसत्ता मध्ये आलेला रिव्ह्यु
लोकसत्ता मध्ये आलेला रिव्ह्यु वाचा असीमजी.
जे तुम्हाला जाणवलय पण लख्खपणे कळालं नाहिये ते कळेल.
अप्रतिम चित्रपट.. सुन्न करुन
अप्रतिम चित्रपट.. सुन्न करुन टाकणारा.. विचार करायला लावणारा.. काहिहि न बोलता खुप काहि बोलुन गेलाय नागराज...
प्रेमकथेच्या रॅपर मध्ये एक विचार रॅप करुन दिलाय...
काल पाहिला. खेड्यातली कथा.
काल पाहिला. खेड्यातली कथा. उत्तम कॅमेरा. समाजाविषयी विचार करायला लावणारी कथा. नील ला+१.
सगळेच कलाकार नवीन पण उत्तम अभिनय. पटला...
शुक्रवारी पाहिला. अतीशय छान
शुक्रवारी पाहिला. अतीशय छान कलाकृती.
ज्यांनी अजुन पाहायचा आहे त्यांच्यासाठी एक विशेष सुचना: कृपया चित्रपटाची एकही फ्रेम चुकवु नका. ह्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न फ्रेम काही ना काही क्ल्यु (कथेला पुरक) किंवा संदेश देऊन जाते.
लव्हस्टोरीच्या रॅपरमध्ये इतकं कडू सत्य गुंडाळणं केवळ मंजुळेच करु जाणोत.
हॅट्स ऑफ !!!
(खुप काही लिहावंसं वाटतं आहे पण चुकुन स्पॉयलर देऊन जाईल अशी भिती वाटते. प्रत्येकाने एकदातरी पाहावा असा फँड्री).
फक्त एक तांत्रिक बाबः चित्रपटाच्या सुरुवातीला आवाज (व्हॉल्युम) फार कमी आहे असे वाटले. हा लो व्हॉल्युम खरंच चित्रपटात आहे कि मी जिथे सिनेमा बघायला गेले त्या थेटरचा दोष हे मला माहित नाही. थोड्या वेळाने आवाज व्यवस्थीत होता.
चित्रपट (किंवा काहीही) नाय
चित्रपट (किंवा काहीही) नाय कळला तर नाय कळला पण लगेच नावे ठेवायची अहमिका लागते जिकडे तिकडे त्यापेक्षा हे पटलं.
असीम, इतकं प्रामाणिकही लिहत नाही कुणी त्याबद्दल अभिनंदन.
बघायला पाय्जे पिक्चर लवकरच.
अनघा पोळ ह्या माझ्या
अनघा पोळ ह्या माझ्या मैत्रिणीने हा एक लेख लिहिला आहे 'फँड्री'बाबत -
https://www.facebook.com/anaggha.pol/posts/10203105208370544?stream_ref=10
रसप, 'कंटेंट अनअॅव्हेलेबल'
रसप, 'कंटेंट अनअॅव्हेलेबल' असं दिसतं आहे. लेख काढला असेल किंवा फ्रेंड लिस्ट पुरताच मर्यादित असेल.
चित्रपट (किंवा काहीही) नाय कळला तर नाय कळला पण लगेच नावे ठेवायची अहमिका लागते जिकडे तिकडे त्यापेक्षा हे पटलं. >> अनुमोदन.
पोस्ट तर आहे तशीच. फ्रेन्ड
पोस्ट तर आहे तशीच. फ्रेन्ड लिस्टपुरती मर्यादित असणार.
मी पाहिला आणि नि:शब्द झाले.
मी पाहिला आणि नि:शब्द झाले. नागनाथ मंजुळे ग्रेट. चित्रपटात एकही पात्र निरर्थक नाही प्रत्येकाचा सिग्निफिकन्स चोख राखलेला आहे. प्रत्येकाला वेगवेगळा उमगेल असा सिनेमा.
प्रोमोज अतिशय कमर्शियल असल्याने बरेचसे प्रेक्षक पुन्हा एक टिनएज प्रेमकहाणी पहायला मिळणार म्हणून आले होते, पण शेवटी हाती काही लागले नाही म्हणून 'वड पाचची' म्हणत घरी गेले. त्यांची मनोमन किवच केली (निदान मी तरी) प्रत्येक चित्रपटात मनोरंजन मूल्य शोधणारे प्रेक्षक फँड्री पाहून नक्कीच थोडे तरी निराश होतील. एक आर्ट फिल्म सारखा प्रत्येकाला वेगवेगळा उमगणारा सिनेमा आहे.
भारतासारख्या विकसनशिल देशात आत आतल्या खेड्यात लोक अजूनही फक्त भौतिक विकास किंवा सो कॉल्ड इक्विप्ड मॉडर्नायझेशन मध्ये फसलेले आहेत. चित्रपटात लोक फेसबूकवर चित्रं अपलोड करताना, आय पी एक बद्दल चर्चा करताना दिसतात, पण बौद्धिक विकासाच्या नावाने अजूनही आनंद आहे हेच दिसते. त्यामूळे जेब्याने शेवटी कॅमेर्यावर भिरकावलेला दगड हा सामाजातल्या जातियवादाला एक चपराक आहे.
कथा कोणत्याही एका वळणाने जात नाही, त्यात बरेचसे पैलू आहे. चित्रपटातलं प्रत्येक पात्रं मग त्याच्या ओठी संवाद असोत अथवा नसोत, अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. थोडी अंधश्रद्धा, जगण्याची धडपड, पौगंडावस्थेतल्या मूलाचं मूक प्रेम, जातियवाद, स्वप्नं आणि अजूनही मागसलेल्या जनतेला पुढे न येऊ देणारा पाटिल सारखा जनसमूह... ज्याचं त्याचं विश्व, ज्याची त्याची तगमग. आणि ज्याची त्याची बौद्धिक आणि सामाजिक मर्यादा.
अत्यंत अप्रतिम सिनेमा आहे. अंतर्मुख होऊन विचार करण्याजोगा. जरूर पहा.
subtle या शब्दाचं मूर्त
subtle या शब्दाचं मूर्त स्वरूप म्हणजे फॅन्ड्री हा सिनेमा.
अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत, पण त्या अस्तित्वात असतात. जातीयवाद 'लीगली' नष्ट झालेला आहे. पण समाजमनात खोल कुठेतरी रुजलेला आहेच. आणि तो या ना त्या मार्गाने व्यक्त होत असतो. त्यातून सुटायची इच्छा तर असते, पण योग्य मार्ग सापडत नाही. त्यालाही अनेक कारणं असतात. शेवटी अनेकदा असहायता आणि तडफड इतकंच हाती लागतं. त्याचं हे चित्रण.
सोमनाथ या हीरोला बघून मी स्तब्ध झाले. त्याचा चेहरा काय बोलका आहे!
सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, संवाद सगळंच उच्च! थियेटरवरच बघावा असा चित्रपट.
मात्र सिनेमाचे प्रोमोज साफ चुकलेत
प्रोमोजमध्ये लोकांना आकर्षित करण्याहेतू बहुधा फक्त त्यातल्या लव्ह स्टोरीचे भाग दाखवलेत. त्यामुळे सिनेमा 'शाळा' किंवा 'टीपी' प्रकारचा आहे असा लोकांचा समज होतोय बहुतेक. आम्ही सिनेमा पाहिला तेव्हा थेटरमध्ये टवाळ ग्रूप होते आणि त्यांच्या चीप कमेन्ट्स चालू होत्या 
एक आर्ट फिल्म सारखा
एक आर्ट फिल्म सारखा प्रत्येकाला वेगवेगळा उमगणारा सिनेमा आहे. >> फँड्री सो-कॉल्ड-आर्ट-फिल्म नाही. एका उत्तम कमर्शियल सिनेम्यासारखं ओपनिंग त्याला मिळालं आहे- पुण्यात ४६ शोज प्रतिदिन. आजही तितकेच आहेत. सुपर्हिट झालेल्या 'टाईमपास'चेही इतकेच शोज होते. दुनियादारीचे पहिल्या दिवशी १५-२० च शोज लागले होते. नंतर ते ६०-६५ पर्यंत वाढवावे लागले.
'आर्ट फिल्म' किंवा ' प्रत्येकाला वेगवेगळा उमगणारा सिनेमा' याला बरेच प्रेक्षक बिचकून असतात, म्हणून हे सांगावसं वाटलं.
चित्रपट पहिलेला नाही, लावकरच
चित्रपट पहिलेला नाही, लावकरच पाहीन असेही नाही. पण एक निरीक्षण म्हणूनः
फॅन्ड्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधी कित्येक मराठी लेखक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, आणि चित्रपटसृष्टीशी सम्बंधित व्यक्ती या चित्रपटाचे विविध सोशल मीडीयावर मनापासून कौतुक करत होते. लोकांनी हा चित्रपट बघावा म्हणून सांगत होते. ते वाचायलासुद्धा फार चांगलं वाटत होतं.
साजिरा तुझं बरोबर आहे, पण ते
साजिरा तुझं बरोबर आहे, पण ते टेक्निकल आस्पेक्ट्स झाले सिनेमाचे, मी फक्त उमगण्याबाबत लिहिले आहे.
हो दक्षिणा बरोबर. मी लिहिलंच
हो दक्षिणा बरोबर. मी लिहिलंच की- ' 'आर्ट फिल्म' किंवा ' प्रत्येकाला वेगवेगळा उमगणारा सिनेमा' याला बरेच प्रेक्षक बिचकून असतात, म्हणून हे सांगावसं वाटलं.'
चित्रपटात आवडलेल्या काही ठळक
चित्रपटात आवडलेल्या काही ठळक गोष्टी
जेब्याचं हस्ताक्षर, त्याचं घर आणि त्याचं हलगी वाजवणं.
त्याचा मित्र पिर्या.
सायकल चिरडून निघून गेलेला ट्रक आणि त्यानंतर मोडकी सायकल दुसर्या सायकल वरून आणण्याचा प्रसंग निव्वळ हेलावून टाकतो.
किशोर कदम यांचा अभिनय.(??) छे खरंखुरंच वाटला त्यांचा पडद्यावरचा वावर.
चंक्याने जत्रेत हलगी देण्याचा पाळलेला शब्द.
आणि जेब्याला उद्धेशून 'तुझा विश्वास आहे ना? मग नक्की होईल" हे वाक्य.
जेब्याचं हस्ताक्षर, त्याचं घर
जेब्याचं हस्ताक्षर, त्याचं घर आणि त्याचं हलगी वाजवणं. >> काल स्टार माझा वर जब्याची छोटीशी मुलाखत होती, त्यात त्याने सागितल कि तो आधी हलगी वाजवणा होता म जब्या झाला नि आता हिरो :)..
प्रोमोजमध्ये लोकांना आकर्षित
प्रोमोजमध्ये लोकांना आकर्षित करण्याहेतू बहुधा फक्त त्यातल्या लव्ह स्टोरीचे भाग दाखवलेत. त्यामुळे सिनेमा 'शाळा' किंवा 'टीपी' प्रकारचा आहे असा लोकांचा समज होतोय बहुतेक.>>> +१
मी सिनेमा पाहिलेला नाही अजून. पण प्रोमोज बघून माझा असाच समज झालेला होता.
आता नक्की बघणार.
मात्र सिनेमाचे प्रोमोज साफ
मात्र सिनेमाचे प्रोमोज साफ चुकलेत अरेरे प्रोमोजमध्ये लोकांना आकर्षित करण्याहेतू बहुधा फक्त त्यातल्या लव्ह स्टोरीचे भाग दाखवलेत. त्यामुळे सिनेमा 'शाळा' किंवा 'टीपी' प्रकारचा आहे असा लोकांचा समज होतोय बहुतेक. >> प्रोमोज बघून माझा असाच समज झालेला होता. +1
जेब्याचं हस्ताक्षर > खरोखरीच
जेब्याचं हस्ताक्षर > खरोखरीच सुंदर
माझाही आणि माझ्या आईचाही....
माझाही आणि माझ्या आईचाही.... तेंव्हा तीने नकोच बघायला म्हणून ठरलेला बेत रद्द केला काल
प्रोमोज बघून माझा असाच समज
प्रोमोज बघून माझा असाच समज झालेला होता. +1
अरे तो झी टॉकीजने प्रदर्शीत
अरे तो झी टॉकीजने प्रदर्शीत केलेला चित्रपट आहे.
त्यांच्या मार्केटीन्ग पॉलिसीनुसार ते तसे प्रोमोज करत असतील.
खरंतर प्रोमोज अगदी ठार
खरंतर प्रोमोज अगदी ठार चुकलेतच असं नाही वाटत मला, कारण जेब्या सिनेमाचा हिरो आहे आणि त्याचं मन आणि विश्व या प्रेमातच बुडालेलं आहे सिनेमात.
असे खुप से सीन आहेत.. पण
असे खुप से सीन आहेत.. पण लिहिता येत नाहिये इथे...
ज्यांनी पाहिला नाहिये त्यांच्यासाठी बरं नाहि ते...
मी नक्कि परत पाहाणार...
पिर्या तर जबरदस्त आहे...
जे दिसतंय तेवढंच नाहीये
जे दिसतंय तेवढंच नाहीये त्यापलीकडे आहे तो खरा सिनेमा 'read between the line' असतं तसं काहीसं
संवाद सुद्धा कमी, फार भेदकपणे दाखवलेलं दुख-दारिद्र्य नाही, कसलंच अतिरंजन नाही. मुद्दाम कॅमेरात यावी म्हणून साधी आवर सावर सुद्धा नाही मग ओढून ताणून आणून दाखवलेले निसर्ग सौंदर्य किंवा इतर कृत्रिमता तर नाहीच नाही.
रोजचंच साधं जगण, साधंच नेहेमीचं वागणं … पण ते आपलं नाही 'त्यांच'.....
आपण न पाहिलेलं न अनुभवलेलं. थोडं आपल्या कल्पने पलीकडचंच ….
काहीतरी होतंय मनात अस्पष्टसं जे स्पष्ट कळतंय …. हेच हेच अगदी ते फिलिंग आहे जे पाहतांना जाणवत असतं पण कळत नसतं.
एका नव्या निर्मात्याला एकदम अश्या सिनेमाला हाथ घालावा का वाटला असेल बुवा. वाटला तर वाटला सार्थकी करू घातला …. त्यांच्या हिमतीची दाद तर द्यायलाच हवी …. नाही ?
'फॅन्ड्री' वेगळीच भावना देऊन गेला … __/\__
येत्या रविवारी बहुधा बघणे
येत्या रविवारी बहुधा बघणे होईल, आतापर्यत जे ऐकलेय वाचलेय या फँड्रीबद्दल जर हा चित्रपट मला कळला वा झेपला नाही तर खरेच स्वताबद्दलच वाईट वाटेल.. आशा करतो असे होऊ नये, पण आपल्या या प्रामाणिक मतामुळे आता याच्यासाठीही तयार आहे
सिनेमाचं तंत्र, कॅमेरा या
सिनेमाचं तंत्र, कॅमेरा या सर्व गोष्टी समजणा-यांचा हेवा वाटतो.