नि षेध! त्रिवार निषेध!!
"देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटलेला नाही, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटला आहे. एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे...
"इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्यूँ? ये देश मेरा है। क्या मुझे कहीं भी रहने का हक नहीं?'
असा तेजतर्रार, बाणेदार, हृदयाचा ठाव घेणारा जळजळीत डायलॉग आतापर्यंत ऐकला होता कधी? "जब तक बैठने के लिए न कहा जाए, शराफत से खडे रहो...ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं' किंवा "ये ढाई किलो का हाथ किसीपे पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है,' म्हणणारे तुमचे अँग्री यंग किंवा ओल्ड मॅन पाचोळ्यासारखे उडून जातील या संवादफेकीपुढे! तरुणाईचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा धगधगता अंगार आपल्या संवादांतून, देहबोलीतून ओकणाऱ्या या नव्या अभिनयसम्राटाचं नाव कमाल खान!
हा कमाल खान कोण बुवा, असा कुत्सित, बाष्कळ प्रश्न तुम्ही विचारणार असाल, तर तुमच्या अकलेची, सारासार विवेकबुद्धीची आणि सामान्यज्ञानाची कीवच करायला हवी. "देशद्रोही' नावाचा राष्ट्रभक्तीचा ज्वलंत हुंकार गेला महिनाभर विविध वाहिन्यांवरील जाहिरातींच्या माध्यमातून देश पेटवतो आहे. (ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!)
"देशद्रोही'चा नायक-निर्माता (आणि कदाचित कथा-पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शकही!) कमाल खान याच्या तोंडून हा डायलॉग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडतो आणि तमाम प्रस्थापित अभिनयसम्राटांच्या छाताडावर थयथया नाचतो! बहुधा, या प्रस्थापित अभिनयसम्राटांना या नव्या उद्रेकाचे हादरे जाणवू लागले होते, म्हणून जुलमी, निष्ठुर व्यवस्थेशी संगनमत करून त्यांनी चित्रपटावर बंदी घातली. कमाल खान या उमलत्या कळीची (किंवा कळ्याची म्हणा हवं तर!) फुलण्याची स्वप्नंच खुडून टाकली.
एक वास्तव पडद्यावर साकार होण्याआधीच पडद्याआड गेलं.
आता कायदेशीर लढाई लढली जाईल. तमाम अन्यायग्रस्तांचे वाली, दीनदुबळ्यांचे आशास्थान आणि सर्व न-अभिनेत्यांचे प्रेरणास्थान मा. महेश भट यांची साथ असल्यामुळे कुठल्या कुठल्या परिसंवादांतून, मुलाखतींतून या अन्यायाला तोंड फोडलं जाईल. न्याय मिळेल...न मिळेल. कदाचित, कमाल खान वेगळ्या नावानं, पण हीच "श्टोरी' वापरून हाच चित्रपट पुन्हा काढेल. पण तरीही, "देशद्रोही'वरील बंदी उठली नाही, तर त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेला, अभिनयाला प्रेक्षक नक्कीच मुकतील.
अवांतर : महेश भट यांच्या आगामी चित्रपटाचा विषय "देशद्रोही'वरील बंदीनाट्य हाच आहे म्हणे!
आयला !
आयला ! कमालच झाली !
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI
बघताय ना फारेंड,श्र माता.
हा वरचा
हा वरचा व्हिडिओ भीषण विनोदी आहे... हा पाहिल्यावर लेख पुन्हा वाचला... जवळजवळ सगळ्या वाक्यांवर हसलो...
सही आहे.
ह्यात
ह्यात ग्रेसी सिंग आहे नायिका आणि अजून एक 'ग्रेसी' टाइपच नायिका आहे ,
काय बरं नाव तिचं ??
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभि...
अभि...

जबरदस्त लिहीलंय. तो कमाल खान राजकुमारची नक्कल करतो... ~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
आणि अजून
आणि अजून एक 'ग्रेसी' टाइपच नायिका आहे >>>>>

ह्रिषिता नाव आहे बहुतेक. हि असोका मध्ये होती. शारुक ची बायको झालेली.
खात्री करण्यासाठी श्रद्धाला विचार. तिचा डाटाबेस जास्त अचुक आहे.
बाय द वे, ट्रेलर बघुन लयी मजा आली.
परवाच ह्याच चित्रपटातील एक गाण पहायला मिळाल. वाह!!!!! क्या डान्स हय केआरके (हे एसआरके सारखच) भय्या का.
आम्ही पण
आम्ही पण प्रोमोज चे डायलॉग ऐकुन फार हसलो

भन्नाट आहे अभि चा अभिनय सम्राट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
उरलो फक्त चहापुरता .....
ए हा मात्र
ए हा मात्र अन्याय होतोय हा एका उमलत्या सुपरस्टारवर !
काय ती सहिष्णुता काय म्हणतात ती आहे का नाही राव....?
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
हे अतिशय
हे अतिशय अन्यायकारक आहे. देश आज आणखी एका खानाला मुकला आहे. त्यामुळे एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.......
त्याचे ट्रेलर बधुन मला तर नविन दिलिप कुमार भेटल्याची खात्री पटली होती.
मेहेश भट्ट साहेबांना चघळायला आणि प्रकाश झोतात रहायला एक नविन विषय मिळेल .
'... भय्या हात पाय पसरी' वर बंदी येणार म्हणे??
यायलाच
यायलाच पाहिजे, महाराष्ट्रात राहुन भय्यावर टिका करता काय?
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
कमाल खान
कमाल खान ची कमाल आहे, इतकं कसं कळत नाही त्याला की त्याची जागा बॉलिवूड मध्ये नसून हॉलिवूड मध्ये अहे ते...
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
छान
छान लिहिलय... मी ट्रेलार आधी पहिलेल नव्हत. ते बघितल्यावर मजा आली...
मी ट्रेलार पूर्ण बघू शाकलो नही... पिक्चर कोण बघणार?
बंदी घातली म्हणून प्रसिद्ध झाला.
होय,
होय, हीरॉइन म्हणून ह्रिषिता भटच (अतर्क्य आणि मूर्ख गोष्टी करणारी- शेवटी तीही भटच)


अफलातून प्रोमो आहेत त्याचे. त्याला 'नाचताना' पाहिलं?
फारेंडा, तू 'तो' व्हिडीयो पेस्ट केला होतास बघ, त्याच्या तोडीचा आहे की नाही हा?
-------------------------------
सुचलं की लिहीन..
आय.एम.डी.बी.
आय.एम.डी.बी. वर ह्या चित्रपटावरचे युजर कॉमेन्ट्स बघा..
Movie Talks about unity of India, 16 November 2008
Stars: 8/10
Author: samirindya143 from India
This movie talks about unity of India, this is what our Country needs. This movie is about politics, corruption and a common man. after watching this movie I am very happy that Kamal Khan has made this type of movie which can open our minds and makes us think why we are fighting and hating each other. An unemployed RAJA(KK) comes of Mumbai in search of a job. Staying in Mumbai for RAJA is not easy and he soon realizes that being a North Indian is even tougher. The main highlights of this film is its powerful dialogues. Movies like this should always be appreciated. Watch this good movie to know how Raja and Sonia teach lessons to the criminals?
Was the above comment useful to you?
0 out of 3 people found the following comment useful :-
out and out patriotic, 25 October 2008
Stars: 10/10
Author: khushal from India
This is one of those great old movies that is worth a repeat viewing every now and again in a person's life.Be that as it may, the story that is told here is every bit as important and thought provoking.Throughout the film there is a spot-on wisdom about man and his endless quest for justice.
I came away from this movie feeling secure in my belief that in life you just can't have it all, but a true patriot can.Since this movie was largely about "North Indians (literally speaking Yadavs, it must have made quite an impression on audiences back who share the same last name and hail from the north India).I'm sure more than a few viewers still have painful memories of catastrophic losses caused by the recent feuds and the aftermath that followed.
That's why I think this movie qualifies for repeat viewings, because just think how appropriate this wisdom is for our current generation of people "Fortunes come and go, gold is often times nothing but dust in the wind, but life goes on and so man must go on. That's what this movie says to me whenever I see it."
रुनी,
रुनी, डोळ्यातून पाणी काढलंस बघ!
(No subject)
बरं झालं
बरं झालं रुनीने लिंक दिली नाहीतरं वरच्या लेखाची गांभिर्यता लक्षात घेऊन मी खरच हा चित्रपट पाहिला असता
हे वाचा.
हे वाचा.
स्वाती, "हे"
स्वाती, "हे" म्हणजे काय वाचा ते कळायला थोडा वेळ लागला. अशा एकाक्षरी लिन्क्स पटकन कळत नाहीत
मस्त आहे तो रिव्यू. तो greatbong असाच मस्त लिहीतो, त्याच्या ब्लॉग ची लिन्क आज चालत नाही.
स्वाती,
स्वाती, एकदम सही लिहीलय त्या ब्लॉगरने.
नाहीतरं वरच्या लेखाची गांभिर्यता लक्षात घेऊन मी खरच हा चित्रपट पाहिला असता >>> सही है बी
रूनी तुला
रूनी तुला ४-५ दिवस थांबता आले नाही?
(No subject)
आहाहा,अरे
आहाहा,अरे इतके दिवस हा लेख वाचायचा कसा राहुन गेला,
प्लीज कुणीतरी या महान सिनेमाचे पुर्ण'रसग्रहण' कराल काय?
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल