प्रेम

Submitted by गणेश भुते on 20 November, 2008 - 07:58

मन मोरपिसापरी
हलके हलके व्हावे
इंद्रधनुच्या भोवती
मेघांना बिलगावे

उन्हात फिरताना
ओठी हसू असावे
प्रितरुपी चांदण्यात
काव्यकमळ फुलावे

प्रतिक्षेच्या हुरहुरी
मन अधिर झुलावे
मोगर्‍याच्या सुंगंधाने
क्षण संधेचे खुलावे

भेटितल्या गुलाबात
रंग प्रेमाचे सजावे
शब्दाविन एकमेका
मनातले उमजावे

नभी चांदण्या बघत
रात्री एकाकी जागावे
प्रियतमाच्या सुखाचे
दान देवाला मागावे

प्रेम होऊनी संचिती
कुणी कधितरी यावे
प्रेमात असताना
काव्य-स्वप्निल जगावे

--गणेश भुते

गुलमोहर: 

सुंदर कविता!!!

काव्य कमळ मस्तच Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

सुंदर, एकदम romantic कविता आहे

भाउ, बर्‍याच दिवसानंतर, आणि एकदम षटकार...

लगे रहो...

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

गणेशराव, एवढे दिवस तळ्याकाठी काव्य कमळ फुलण्याची वाट पहात होता काय ? एकचं फुललयं की तळ भरून गेलयं ??

उत्तम , किती कमी शब्द वापरुन मोठा अर्थ भरलाय.

हरीश

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार

गणेश,
मला कवितेतलं शून्य कळतं. पण तुमची कविता खूप हळूवार वाटली.
उगिच शब्दबंबाळ नाहीए. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~