वळीव

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 November, 2008 - 06:26

माज्या मायनं मया
सकाय सकाय सांगटलेलं
जात्याव बसल्याबसल्या
आविष्याचं कोडं उकिलल्यालं
जगणं..त्यात सगरंच समाईक...

कंदी नशीबात सुक
त कंदी भारंभार दुक
काळजातलं
रडगाणं मातुर
सगर्‍यांचच समाईक....

कुटं भुक मानसाला मारतिया
कुटं मानुसच
मानुसकी खातुया
कंदीकंदी भुकच खावुन
सुकाची ढेकर देतुया....

नायतर आमच्यावानी
उंद्याची वाट पगत जगतुया
सा मैन्यातुन येणार्‍या
वळवासाटनं..
आविष्यभर वाट पगतुया....

विशाल.

गुलमोहर: 

छान

छान कविता!!!
<<कुटं भुक मानसाला मारतिया
कुटं मानुसच
मानुसकी खातुया
कंदीकंदी भुकच खावुन
सुकाची ढेकर देतुया...>>

अगदी पटलं!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

छान . बहीणाबाइंची आठवण काढ्लीस .

-हरीश

मित्रा, ही मातृभाषा की पितृभाषा की मित्रभाषा ???
कुठच्या कुठे गेलात राव ???

सारा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत......."
त्यात सगळेच येतात की राव....

हि " भ्रातृभाषा" आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.