विचार

Submitted by सुमेधा आदवडे on 20 November, 2008 - 05:25

ह्या विचारांचं काही विचारू नका..
कधी अगदी झोकात येतात,
सारखे डोक्यात फिरत राहतात
तर कधी अजीबात माझ्या
जवळही फिरकत नाही
तसं थोडा वेळ शांत रहायला
माझीही हरकत नाही.
पण नंतर ह्या शांततेची नखं
मनाची कोवळी पाने खुडून जातात...
आणी मग ते पक्षांसारखे दूर
घरट्यामधुन उडून जातात...
आकाशात ऊंच गेल्यावर मग
पुन्हा पाहतात घरट्याकडे
जिव्हाळा आहे ना माझा त्यांना
म्हणुन परततात माझ्याकडे!
चला, येतीलच इतक्यात ते
त्यांच्या भुकेची सोय केली पाहीजे
शेवटी किती म्हटलं तरी
ते माझे आपलेच आहेत ना!!

गुलमोहर: 

सुमेधा,

hats off !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

धन्यवाद मंडळी !!!!:)

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

आवडली गं .. छान लिहिलीस.

पल्लवी
*******************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

Thanks पल्लवी!!!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

ओहो! सुमेधा, क्या बात है!
पण नंतर ह्या शांततेची नखं
मनाची कोवळी पाने खुडून जातात...
बहोत खूब!

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

मस्त...
त्यांच्या भुकेची सोय केली पाहीजे
शेवटी किती म्हटलं तरी
ते माझे आपलेच आहेत ना!!

दाद आणी सत्यजीत..धन्स!!!:)

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************