दुष्काळ

Submitted by harish_dangat on 20 November, 2008 - 00:52

गेली संपून ही सुगी , आला कडक ऊन्हाळा
खाली झाली आढी , आता उरल्या कोयाळा

खाली झाले तळे , देठ सुकतो कमळा
गेली मरून मासळी , तप सोडीतो बगळा

गेली आटुन सरीता , खाली उरे खडकळा
खाली झाले कूप , गाळ उरलासे तळा

झाल्या रिकाम्या कणग्या , पोटामध्ये येई गोळा
उरे रिकामेच ताट , घरा आली अवकळा

गेली जळून हिरवळ , आता उडतो धुरळा
जाइ मरून गोधन , गिधाडा लागला डोहळा

झोप येईना भुकेने , श्वान करीती कोल्हाळा
पिंडदाने झाली खुप , आता थकला कावळा

हरीश दांगट

----------------
निवडक शब्दांचे अर्थ
---------------
आढी - आंबे पिकवीण्याची जागा
कोयाळा - आंब्यांच्या कोयी, कोयी वाळल्यावर भाजुन मधला भाग खाता येतो,
दुष्काळात काही लोक हे खाउन दिवस काढतात

खडकळा - खदकाळ
कणग्या - धान्य साठविन्यातयार केलेले लाकडी पिंप
कोल्हाळा - कोल्हेकूइ, कोल्हे किंवा कुत्री रात्री उठवतात तो गोंगाट
-----------------

गुलमोहर: 

हरिशजी,

विषय छान, मांडणीही छान...पण काही शब्द खटकताहेत...उदा. कोयाळा, खडकळा, डोहळा, कोल्हाळा

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

छान आहे. कोयाळा म्हणजे काय?

मला वाटतं इथे आढीचा उल्लेख आहे, आढी शक्यतो आंब्याची असते, तुम्हाला असे म्हणायचे आहे कि आंबे सगळे संपुन गेले, कोयी तेवढ्या शिल्लक राहिल्या.

हरिशजी अर्थासाठी धन्यवाद..काही नविन शब्द जमा झाले संग्रहात. (पेटंट नसेल तर कधी तरी वापरीन म्हणतो, गोड वाटताहेत ऐकायला...:) Happy :स्मित::) Happy :स्मित:)

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.