Submitted by माणक्या on 20 November, 2008 - 00:31
तसेही जे व्हायचे होते, नेमके तेच तेच झाले
नव्हत्याचे नव्हते तर होत्याचेही नव्हतेच झाले
स्वत:ला आवरणे तसे शक्य झाले नाही तूला
तोल गेला तेंव्हा सावरणेसुद्धा कसेबसेच झाले
हट्टाला पेटणेही नेहमीचेच तर होते की तुझे
आणि आता मात्र हे गप्प राहणेही पेच झाले
नजरेतल्या शंका पून्हा नजर ठेवू लागल्या
सहजच हालचालींचेही सहज डावपेच झाले
तेंव्हा तरी तुझा विश्वास होता कुठे, आजही
माझ्यावरी नियमितपणे आरोप भलतेच झाले
मी आजच्याच कथा सांगत होतो ना तूला
तरी तू स्पष्ट केले ते निरूपण कालचेच झाले
कसेतरी आटोपतो आजकाल मी बोलणेही
संवादातला वाद कळला हे ही चांगलेच झाले !
गुलमोहर:
शेअर करा
<<हट्टाला
<<हट्टाला पेटणेही नेहमीचेच तर होते की तुझे
आणि आता मात्र हे गप्प राहणेही पेच झाले>>
पटलं राव, छान आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
मंक्या,
मंक्या, मस्त लिहिलीय.
छान...
छान...
लयी झकास !
लयी झकास !
मस्त
मस्त