Submitted by कौतुक शिरोडकर on 19 November, 2008 - 02:29
"दादा, दोन लाकडं दे की,
बघ, मुठभर तांदूळ शिजवायचं हाय.
लेकरू लय कावलय भुकेनं. चुल पेटवायची हाय"
माय हात पसरून उभी.
दादा जरा पाणावला अन बोलला,
"माय, तुझी नड कळतेय.
पण ही सरकारी लाकडं आहेत.
हिशोब द्यावा लागतोय."
माय खचली. पण नजर तरीही भिरभिरली. थबकली.
"ती घेऊ का दादा ?"
त्यानं तिच्या हाताच्या दिशेने नजर भिरकावली. चपापला.
खंगलेल्या लेकराकडे बघता-बघता त्याने चहु़कडे नजर फिरवली.
त्याची मान डोलताच माय हसली अन धावली.
दोनाच्या एवजी तिने चार लाकडं खेचली.
'प' पोटातला पुढे सरला अन विझल्या सरणात
तिला सर'प'ण मिळालं.
गुलमोहर:
शेअर करा
कटु असलं
कटु असलं तरी हेच सत्य आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
सर्(प)ण ...
सर्(प)ण ... हम्म्म. कधी कधी वाटतं, गोष्टीतल्या राजासारखं सगळीकडे गुप्तसंचार करता आला असता तर जे काय काय बघायला मिळेल ते झेलायची ताकदच आपल्यात नसेल.
घटा घटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्या विना हे कोणा न कळे .....
आज मिळाली
आज मिळाली लाकडे
उद्या परत फाकडे
-हरीश