देवापाशी मागणे (अभंग)

Submitted by harish_dangat on 18 November, 2008 - 22:37

देवा तुजपाशी । एकची मागणे ।
माझे हे वागणे । सरळ ठेवा ।।

देवा तुजपाशी । मागतो मी भिक ।
राहु दे ना ठिक । सर्वकाही ।।

देवा माझा एक । पुरवावा लाड ।
आनंदाचे झाड । माझ्या दारी ।।

देवा माझे आता। पुरवावे कोड ।
नको मज खोड । वाईटाची ।।

देवा एक माझा । आहे अट्टाहास ।
नको हा आकस । कोणाचाही ।।

देवा द्यावा मज । एकची वर ।
नको मज डर । कशाचाही ।।

देवा मजलागी । आहे एक आस ।
सदा घ्यावा ध्यास । तुज चरणांचा ।।

मज आंधळयास। द्यावी एक काठी ।
सदा माझ्या पाठी । हात तुझा ।।

मज गरीबास । द्यावे काही ऋण ।
तुझी आठवण । रात्रंदिन ।।

देवा मजलागी । द्यावी एक भेट ।
जाउ दे ना थेट । गाडा जिवनाचा ।।

हरीश दांगट

गुलमोहर: 

हरिश, लहान मुलांसाठी खूप छान आहे. मला ते "देवा तुझे किती सुंदर आकाश..." आठवले.

खुप छान साधी, सरळ , सोपी तरीही अर्थपूर्ण. खुप सुन्दर

देवा या हरिशा | भेटू दे शारदा |
घेऊनी प्रसादा | त्याच्यालागी ||

तथास्तु !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.