Submitted by मी अभिजीत on 18 November, 2008 - 22:21
दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे.
करतात मग कशाला भलताच तर्क येथे..!
लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले.
अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे..!
निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले.
छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे..!
फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे..!
अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे..!
– अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
शेवटचा सही
शेवटचा सही !
***
comfortably numb
'वर्ख'
'वर्ख' आवडला!
शेवटचे दोन
शेवटचे दोन एकदमच छान...
अभिजित, छान
अभिजित,
छान गझल!
फक्त एक सुचवणी
दृष्टीस हिमनगाच्या वरचाच बर्फ़ येथे.
करतात तेवढ्यावर भलताच तर्क येथे..!...कसे वाटते?
अर्थाचा शेर आणखी स्पष्ट होऊ शकतो?
जयन्ता५२
तुझ्या
तुझ्या गझलेची स्तुती करावी तेवधी थोदीच