संदेश

Submitted by हेमंत पुराणिक on 18 November, 2008 - 05:50

माणसाने प्रत्येक पाऊल जपुन उचलावे
उचललेले प्रत्येक पाऊल जपून टाकावे
पश्चात्तापा पेक्षा पूर्व ताप चांगला आसतो
आयुष्यात करण्या सारखे खुप काही आहे
करण्याची इच्छा मनापासुन असावी लागते
आष्यातले प्रत्येक कर्म आपल्याला घडवतं
माणुस चांगला नी वाईट अनुभवातुन घडतो
वाईट अनूभवही चांगले असतात
वाईट अनुभवातुनही आपण शिकत असतो प्रत्येक वळणावर एकदा तरी मागे बघावे
आपल्या आयुष्यातले खड्डे दिसतील
आयुष्यातला मार्ग सरळच असतो
तो वर्तमानातली चाल घडवत असते
वर्तमानात भूतकाळही बरोबरच असतो
वर्तमानात भविष्य घडत असत
आईचा गर्भ उद्याच भविष्य असत
तिच्याशी प्रतारणा करु नका
आपण कुणाशीही खोटे बोलतो
तेव्हा ते प्रथम आपण आपल्याशीच खोटे बोलतो
रात्रीच्या अंधारात उद्याचा प्रकाश असतो
त्यालाही उषःकाल यावाच लागतो
काळ्या मेघातही पाऊस असतो
तो बरसल्यावरच वसंत मोहरतो
तसाच तो ओसरतोही
त्यामुळे उर्वरीत आयुष्य चांगल्या संगतीत जाईल याची काळजी आपणच नको का घ्यायला.

गुलमोहर: 

हेमंत,
संदेश छान आहे, खूप आवडला.. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

हेमंत॑ आवडलं खुप
--------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......