सरकार, व्याज आणी शेअर मार्केट

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

शेअर मार्केट मधे महागाई ( Infletion ) खूप मोठा रोल प्ले करत असते. व्याज दर आणी P/E ( multipale for earnings ) हे एकमेका सोबत कसे बांधले गेले आहेत ते बघूया.

२००२ च्या सुमारास भारतीय सरकारने व्याजदरात कपात केली. घरा साठी कर्ज ८ टक्क्याने मिळायला सुरुवात झाली. बरेच लोक घरासाठी कर्ज धेउ लागले. २००३ मध्ये परत RBI ने व्याजदरात कपात केली. मी तेव्हां ७ टक्क्याने कर्ज घेतले. मोठ्या शहरात घर विकत घेन्याची लाट आली. ( boom ) सर्वजन अचानक घर धेउ लागले. पुण्यनगरीत तर घराचे भाव आकाशाला जाउन पोचले. २००० ते २००३ मधे ज्यांनी धर धेतले ते आता १०० + टक्के नफ्यात आहेत. या काळात घरांच्या किमती दुप्पट झाल्या. २००५ च्या मध्यात व २००६ च्या सुरुवातीला व्याजदर वाढायला सूरु झाली आता तो ८.५ ते ९ टक्यात आहे. कदाचीत तो आणखी वाढुन १० पर्यंत जाईल.
आता थोडे शेअर मार्केट कडे वळुया. हे सर्व कसे related आहे ते बघुयात. २००२ मध्ये सेंसेक्स ४००० च्या आसपास होता. ( व्याजदरात कपात), २००४ मधे ६००० च्या आसपास ( व्याजदरात आणखी कपात), २००५ मध्यात व्याजदरात वाढ ( सप्टेबर मधे सेंसेक्स १००० ने पडला) पण सर्व मोठ्या कंपन्यानी सहामाही नफ्यात वाढ दाखवील्या मूळे परत सेंसेक्स वाढला (१००००), सहामाही नफ्यामुळे मार्केट ने ठरवले की वार्षीक नफ्यात पण वाढ होइल ( Rally continued) परत एप्रील मध्ये सर्व मोठ्या कंपन्यानी खुप मोठा नफा दाखवीला (सेंसेक्स १२०००+) आता परत व्याजदरात वाढ झाली. सर्व कपंन्याचे वार्षीक ताळेबंद जाहीर झाले आहेत ( market hass seen growth) आता थोडे cool down होईल.

तर P/e ईथे कूठे आले. मागच्या लेखात मी एक equation माडंले होते. P = M X E . INFY, TCS, WIPRO हे ३५ टाईम्स ने ट्रेड करत आहेत. जेव्हा व्याजदर कमी असतो तेव्हा लोक स्टॉक्स विकत घेन्यासाठी जास्त multipale द्यायला तयार असतात कारन बाजारत मार्जीन मनी खुप स्वस्त दराने उपलब्ध असते व growth is expected from companies . जेव्हा व्याजदर वाढतो तेव्हा margin money becomes costly and pepole are not ready to take costly money for Bets . हो मी bets हा शब्द वापरत आहे. तुमच्या माझ्यासारखे छोटे गुंतवनुकदार मार्केट घडवत किंवा बिघडवत नसतात तर मोठे players जसे की hedge funds, Mutual funds etc हे मार्केट ची दिशा ठरवतात. व्याजदर कमी झाला की you want to pay high multipale (p/e) for that stock but its reverse when interest rates goes high, you want to shift to bonds / FDs instead of stocks

उदाहरण.
सद्याचा फिक्स डिपॉझीट चा व्याजदर समजा ६ टक्के आहे. १०० रु वर एका वर्षाने १०६ रु मिळतील. दुसर्‍या भाषेत म्हणायचे झाले तर पुढच्या वर्षी आताच्या १०० रु ची किमंत १०६ असेल. ह्याला Present Value म्हनतात. आता माझ्या सारखा माणूस काय करेल. तर मी Stock Market कडे पाहील, एक दोन्-पाच कंपन्याचे विश्लेषन केल्यावर मला असे दिसले की ह्या कंपन्या १०-१५% दर वर्षी वाढत आहेत. मी विचार करेल की FD मधे पैसे गुंतवन्या पेक्षा मी शेअर धेईल जो किमान १० टक्के ग्रोथ देईल. ( market cares about growth) मग मी व माझ्या सारखे अनेकजन stock market कडे वळतील. stocks हे demand and supply वर वाढत किंवा कमी होत असतात. अनेक जन आले की price वाढते. price वाढली की p/e पण वाढतो हे सर्व चालु राहते. सरकार एखाद्या-दोन वर्षाने interest rate वाढवते, बरेच लोक शेअर मार्केट मधुन पैसे काढुन धेतात. ( FD / Bond मध्ये टाकायला) आणी p/e परत कमी होतो.
हे सायकल नेहेमीच चालु असते. कुठले sector कधी play करायचे हे कळाले तर whether its bull or bear market you need not worry because there is always bull market in some stocks. गेल्या ३-४ महीन्यांत Metel Sector मधे फार वाढ झाली. मेटल स्टॉक्स हे economy growth rate बरोवर कमी किंवा जास्त होतात. जेव्हा Predicted GDP growth rate जास्त होतो तेव्हा metal stock prises वाढतात. सध्या भारताचा growth rate ८.१ आहे त्यामुळे metel stocks मधे वाढ दिसत आहे.
Economy सोबत Stocks कसे रिलेट करायचे ते मी पुधे कधीतरी लिहील.

प्रकार: