रंगभुमी

Submitted by कौतुक शिरोडकर on 18 November, 2008 - 05:35

आयुष्य, एक एकांकिका
काही क्षणांची, सेकंदाची, मिनिटांची
बरेचसे अर्थ थोडक्यात मांडणारी
आयुष्य, एक प्रायोगिक नाट्य
कल्पनेच्या पलिकडे, भुत भविष्याच्या कैचीत
कधी स्थिर.. कधी धावणारं ..वेड्यागत..
क्षणाक्षणाला वेदनांनी तडफडणारं
आयुष्य, एक सामाजिक नाट्य
प्रश्नोत्तरांच्या फैरीत... भावनांचा गुंता...
सुटलेल्या गोळीनंतर बंदुकीतून धुर यावा तसा
निश्वास टाकणारं
आयुष्य, एक फार्स
झुलत राहणारं... येण्यापासून जाण्यापर्यंत
अतिशोयोक्तीच्या अस्तित्वाला जपणारं
आयुष्य, एक वगनाट्य
बिनमांडणीचं.... भुतकाळाच्या आसावर वर्तमानाला
भविष्याच्या फेर्‍यात फिरवणारं
आयुष्य, एक पथनाट्य
चर्चा रंगवणारं...ओसरलेल्या बैठकीत टरफलासम
तत्वाना व थोटकासम धुमसणार्‍या प्रश्नांना भिरकावणारं
आयुष्य, एक नाटक
एकमेकांशी निगडीत.. मुखवटे आणि चेहरे...
रंगलेले.... रंगवलेले....
या जगाच्या रंगभुमीवर
प्रवेश व प्रस्थानाच्या दरम्यान.

गुलमोहर: 

आयुष्य, एकमेव मार्ग, मृत्युची अपरिहार्यता आणि महत्व पटवुन देणारा..

नाही ....?

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

आयुष्य, एक नाटक
एकमेकांशी निगडीत.. मुखवटे आणि चेहरे...
रंगलेले.... रंगवलेले....

मस्त, छान.

तुम्ही मराठी रंगभूमीशी जोडलेले आहात काय?

वर्षा

अगदी खरंय मित्रा...मस्त जमलीय कविता...:)
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

आयुष्य एक नशा
हळूवार चढणारी

जास्त झाली तर अंगावर येणारी
कमी झाली तर हुरहूर लावणारी !

वर्षा, कधी काळी होतो. दुरावलोय पण दूर झालेलो नाही. जमल्यास पुन्हा करीन म्हणतोय. ही कविता त्या मंतरलेल्या काळातली.

कौतुक,

शाळेत असताना मी पण एकदा "आंब्याचं झाड" झालो होतो.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

नाटकातला एक परिश्छेद वाचतोय अस वाटल... हे कोन बोलतोय याची एक छोटी प्रस्थावना असायला हवी होती.. अजुन मजा आली असती...