जवळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 18 November, 2008 - 04:18

तुझे जवळ असणे
शीत शशी किरणे
रातराणीचे हासणे... गंध वार्‍यातूनी
तुझे जवळ असणे
सप्तसूरांचे गाणे
कोकीळ तराणे.... आम्रवनातूनी
तुझे जवळ असणे
इंद्र्धनू देखणे
निसर्गाचे देणे...... नभ मेघातूनी
तुझे जवळ असणे
स्वप्नातले चांदणे
संगमरवरी ताज लेणे... धुंद पाण्यातूनी
तुझे जवळ असणे
नक्षत्र तोरणे
डोळ्यांचे पारणे.... फिटे मनातूनी

गुलमोहर: 

मस्त आहे कविता!!!
<<तुझे जवळ असणे
नक्षत्र तोरणे
डोळ्यांची पारणे.... फिटे मनातूनी>>
ईथे डोळ्यां "चे "पारणे हवंय का?
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

छान!

गुरू..............लगे रहो !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

सुमेधा, आभार.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
भावेबाई बर्‍याच दिवसांनी आलात. मला वाटल शिष्याला विसरलात की काय ???