सोहम

Submitted by वर्षा.नायर on 17 November, 2008 - 10:56

आता रोजच यावसं वाटतं तूझ्याकडे,
तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला,
पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते,
माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तूझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस
एरवी तूझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस्
तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे
तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली.
तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे
पण तरिही वेडं मनं तूला माणसात शोधायला जाते
तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते
आणि धावून धावून थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते
तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तूझी शितल छाया आणि अथांग प्रेम देतोस
आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?"
खरंच, मी आहे मन.. अतूप्त, आसक्त, तूषार्त
आणि तू आहेस माझा आत्मा... अमुर्त, निराकार तरिही शाश्वत, सच्चा.

*****************************************
वर्षा म्हसकर - नायर
nair.varsha@gmail.com

गुलमोहर: 

धन्यवाद कविता वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल

वर्षा

पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते,
माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तूझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस

एरवी तूझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस्
तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे
तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली.
तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे

हे विशेष छान आहे. Happy

नजरेतून निसटली होती.. Sad

>>आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?"
खरंच, मी आहे मन.. अतूप्त, आसक्त, तूषार्त
आणि तू आहेस माझा आत्मा... अमुर्त, निराकार तरिही शाश्वत, सच्चा. >> खूप आवडलं.... Happy