"सेनापती"ने सह्यमेळाव्याची साद दिली आणि भटक्यांच्या "रोमा" "रोमा"त उत्साह संचारला…
"स्वच्छंदी" मनांमध्ये "इंद्रधनुष्य" अवतरलं अन "कोकण्या" त उतरायचा बेत ठरला…
अवघी "इनमिन तीन" असणारी भटक्यांची संख्या बघता बघता वीसवर पोचली
एरवी अनोळखी असणा-या "जिप्सीं" ची निसर्गसभा मढे घाटात अचानकच ठरली …
केळदच्या एरवी "सुन्या सुन्या" असणा-या शाळेत एक अनामिक ओढ दाटली होती…
धमाल करणा-या पण "विनयी" मित्रांची काही क्षण काळजी वाटली होती…
वेळ सरली… ओळख पटली…आतुरता ओसरली आणि मैफिल जमली…
रात्र जागवण्याचे वायदे हरले अन कष्टलेली गात्र मध्यरात्रीच दमली…
प्रभातीचे "दिप" उजळून पूर्व दिशेला तांबडं फुटलं …
भटक्यांच्या मेळाव्यामध्ये पदार्थांचंही संमेलन भरलं…
रामप्रहराची वाट न बघता "लक्ष्मणा" ची संगत धरली…
"गिरी" चे मस्तकी धबधब्यांची जत्रा पाहून डोळ्यांनीही धन्यता मानली…
वाट हरवली… पुन्हा गवसली…"पवन" ही मध्येच अदृश्य झाला…
खळाळत्या जलौघांनी मात्र परतीचा मार्ग सुकर केला…
सह्याद्रीचे कडे आज जरा जास्तच बहरले होते….
माबोच्या "चॅंप" लोक्सकडे बघून त्यांचेही हास्य खुलले होते…
निरोपाची वेळ आली अन डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या…
काही तासांच्या सुखद आठवणी तिथे मात्र क्षणभर विसावल्या…
वाटा वेगळ्या झाल्या पण मनं मात्र जुळली होती…
"Discover" केलेल्या "सह्याद्री" ची धुंदी पुरेपूर चढली होती…
का कुणास ठाऊक पण नकळत "यो"ग जुळून आला…
सह्याद्रीच्याही मनाचा कोपरा भन्नाट आठवणींनी भरून गेला…
पुन्हा भेटण्याच्या आशा घेऊन नव्या दिवसाचं पान उघडलं…
मैत्रीच्या अतूट बंधनांचं आज दिलखुलास "दर्शन" झालं…
भटक्यांचा सह्यमेळावा…कवितेच्या रुपात….
Submitted by सह्याद्रीमित्र on 15 July, 2013 - 13:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है, ओंकार!!! एक
क्या बात है, ओंकार!!! एक नंबर
अ प्र ति म!!!
अ प्र ति म !! मस्तच जमलिये !!
अ प्र ति म !! मस्तच जमलिये !! सॉल्लिड आहेस तू नि तुझी चोख स्मरणशक्ती पाहता पुढील सातजन्मात तू ही नावे विसरणार नाही हे नक्की..
जबरीच...मस्त जमलीये
जबरीच...मस्त जमलीये
ओंकार, केवळ अ फ ला तू
ओंकार,
केवळ अ फ ला तू न!!!!
लय म्हणजे लयंचं भारी...
वाटा वेगळ्या झाल्या पण मनं मात्र जुळली होती…>> +१००००
व्वा मस्तच मित्रा....
व्वा मस्तच मित्रा....
मस्तच !! >> चोख स्मरणशक्ती
मस्तच !!
>> चोख स्मरणशक्ती <<< अमानवीय प्रकार अाहे हा ओंकार !
भारी. नशीब तु तिथे कविता
भारी.
नशीब तु तिथे कविता ऐकवली नाहीस. 
अरे व्वा! मस्त जमलीय.. प्रचि
अरे व्वा! मस्त जमलीय.. प्रचि वृत्तांत कधी?
खुपच सुन्दर ..मस्त
खुपच सुन्दर ..मस्त
व्वा! आयडी ओवून केलेली कविता
व्वा! आयडी ओवून केलेली कविता छानच झालेय
प्रचि वृत्तांत कधी?>>>>>>>>>+१
आयडीभटक कविता छानच जमली
आयडीभटक कविता छानच जमली आहे.
>> चोख स्मरणशक्ती <<< अमानवीय प्रकार अाहे हा ओंकार ! > +१
जबराट सुंदर जमलीय कविता.
जबराट सुंदर जमलीय कविता.
अ प्र ति म!!! अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!! अ प्र ति म!!! अ प्र ति म!!! अ प्र ति म!!! अ प्र ति म!!! square, cube...
मस्त
मस्त
कडक...
कडक...
छान आइडींची माळ ओवलीस
छान आइडींची माळ ओवलीस सह्याद्रीमित्रा .'यो'पण त्याच्या शैलीत रॉक करणार का ?एखादा तरी मढे घाटातला सोज्वळ ग्रूप फोटो ?
मस्तच!!!!
मस्तच!!!!
जबरी
जबरी

मस्त जमलीये कविता! 'आयड्या'ची
मस्त जमलीये कविता! 'आयड्या'ची कल्पनाही मस्त आहे.
जियो यार... सगळ्यांना मस्त
जियो यार...
सगळ्यांना मस्त गुंफलं आहेस
जियो !!!!!!!!!!!!!!१ अ प्र
जियो !!!!!!!!!!!!!!१
अ प्र ति म !!!!!!!!!!!