पहारे

Submitted by जयन्ता५२ on 10 November, 2008 - 10:33

होते किती पहारे
पण पोचले इशारे!

ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!

तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे

ते स्पर्श,चांदण्याच्या
वर्खातले निखारे!

काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे!

दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे!

(जयन्ता५२)

गुलमोहर: 

दंश प्रिय होता, वा! काया मयूर झाली.., कालचे शहारे.. सुंदर! छोट्या बहरातली सुंदर गझल..

क्या ब्बात है Happy मस्त गझल सगळेच शेर जबरी आहेत. आणि त्यात परत छोटा बहर व्वा वा!

दोषी ऋतू बिचारे...छानच.

छान आहे गझल. छोट्या बहरातली अन् खुप परिणामकारक..

छान! दंश आणि दोषी हे शेर आवडले!

जबरदस्त गझल...
इतक्याश्या छोट्या मीटरमध्येही एव्हढी परिणामकारक गझल होऊ शकते हे कळालं..
हॅट्स ऑफ्फ.. !
मला अगदी सगळेच शेर जसेच्या तसे आवडले.. फक्त ते 'प्रिय' बदलून 'प्रीय' करावे लागेल.

दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे! >>>>> जियो !

खासच !

परागकण

दोषी ऋतू बिचारे!

जातील नाहक बळी
कुणाकुणाचे खरेखुरे?

मस्त! आवडली गझल.

आफताब

'प्र' हे जोडाक्षर (२ मात्रा -'गा') आहे.
चू. भू. द्या. घ्या.
जयन्ता५२

जयंतराव, थोडा गोंधळ होतो आहे "प्र" बद्दल.
जोडाक्षर असले तरी त्यामुळे ते गुरू होतेच असे नसते. "प्रिये पहा" हे "लगा लगा" होते. रुद्र, चंद्र, पत्र हे "गाल" असतात. वास्तुशास्त्र हे "गालगाल" असते.
दंशप्रिय हे "गागालल" होते.
आफताबचा तो मुद्दा योग्य वाटतोय.
चु.भू.दे.घे.

पुलस्ति,आफताब
माझ्या मते 'दंशप्रिय' हे "गागालल" होते जर दंशप्रिय एक शब्द असला तर. 'दंश प्रिय' हे दोन वेगळे शब्द असल्याने व त्यांच्या उच्चारणात मध्ये अंतर असल्याने प्रि चा आघात श वर होत नाही. (म्हणून पहा) रुद्र, चंद्र, पत्र हे सर्व एकच शब्द असल्याने व उच्चारणात पाठोपाठ सलग येत असल्याने द्र,त्र चा आघात आधीच्या अक्षरावर होत असल्याने 'गाल' होतात.
चु.भू.दे.घे. अजून चर्चा व्हावी.

जयन्ता५२

जयंता............एकदम "मार डाला " गझल लिहिलीत हो.......!!

ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!
.......... क्या बात है !!

काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे!
हाय हाय......!!

दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचा़रे !
खरंच बिचारे ऋतू........!!

सुंदर गझल.. फारच सुंदर, फार थोड्या शब्दात बरच काही .. वाह!!!

आवडली. दंश, शहारे आणि ऋतू मस्त.

    ***
    comfortably numb

    बहोत खूब, जनाब! एक एक शेर असा टिपलाय की...सुभानअल्ला!!!

    भलतिच 'आय हाय'! छोटा बहर भारी कठिण, भाई.
    जयंत, बहोत खूब!
    (दंश प्रिय साठी आफताब आणि पुलस्ति शी सहमत)
    -----------------------------------------------------
    दम लिया था न कयामत ने हनूज
    फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

    जयंतराव व्वा क्या बात हैं.. छोटा बहर आणि केलात कहर...
    सर्वच मस्त आहेत पण त्यातही शहारे, आणि दोषी मस्तच

      ================
      जरी आंधळा तरी जगाची
      नेत्रपल्लवी कळू लागली

        सर्वांना धन्यवाद!
        जयन्ता५२