नाही

Submitted by देवा on 20 October, 2008 - 08:27

काळजाला भेदणारी गाज नाही
सागरा रुचला तुझा अंदाज नाही

लाख कंठांनी सदा आक्रंदणार्‍या
बघ तुलाही लाभला आवाज नाही

दोष का द्यावे उगा त्या सावकारा?
रक्तही उरले इथे निर्व्याज नाही

का अवेळी ओघळावे आसवाने?
का मनाला एवढीही लाज नाही?

हे तुझे अन हे असे माझे सख्या रे
वाटणीचा पाडलास रिवाज, नाही?

द्यायचा तो जन्म फिरूनी माणसाचा
एवढा माझ्यावरी नाराज नाही

मानले नाही तुला, ना देवळाला
तो क्षणाचा राग होता, माज नाही

गुलमोहर: 

मक्ता काय मस्तय रे!
मानले नाही तुला, तुझ्या देवळाला
क्षणाचा राग होता माज नाही>>> वाह..

शैलजा आणि श्यामलि धन्यवाद.. Happy
मक्ता टंकतांना चूक झाली होती.. ती दुरुस्त केली आहे.

गझल ठीक आहे.

पाडलास रिवाज >> इथे स आणि रि चा एक गुरू करताना लय गडबडते आहे.

एवढा माझ्यावरी तो नाराज नाही >> इथे वृत्त भंगले आहे.

पु. ले. शु.
~ नचिकेत

>>एवढा माझ्यावरी तो नाराज नाही >> इथे वृत्त भंगले आहे.
खरंच की माझ्या कसं लक्षात आलं नाही.. बदल केला आहे.. धन्यवाद...:)

देवा, पुन्हा एकदा 'नाही'? Happy
रक्त, आसवे आणि शेवटचा जमलेत!

मक्ता एकदम सही रे देवा Happy

मस्त गझल!!!!!:)

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************