अमर आपटे येतोय.... लवकरच, बावन्नपानी या मायबोली माध्यम प्रायोजकांनी प्रसिद्ध केलेल्या बाफ मुळे 'पुणे ५२' या चित्रपटा विषयी बरच कुतुहल निर्माण झालं होत. 'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध' आणि 'काय बदललं?' या स्पर्धां मधे सहभागी झाल्यावर या चित्रपटात गुंतणे सहाजिकच होत. शुभारंभाचा खेळ मुंबईत होणार असल्याचे शुभवर्तमान कळल्यावर चिन्मयला मेल करुन टिकीट बुक केलं.
गुरवार १७, मुंबईतल्या धावत्या गर्दीतून वाट काढत लोअर परळच्या PVRला पोहचलो. मुंबईकर रोहित एक मावळा, मामी, संदिप आहेर, योगिता सहकुटुंब, जिस्पी, निंबुडा सहकुटुंब आणि सामी अशी मायबोली करांची टिम जमल्यावर PVRच्या Screen 5 कडे निघालो.
PVRच्या तिसर्या मजल्या वरिल सितार्यांच्या मांदियाळीत आम्ही स्वत:ला हरवून बसलो. प्रत्येकच्या चेहर्या वरुन उत्साह ओसंडून वाहत होता. निरनिराळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी कलाकारांचे बाईट्स मिळवण्यात गुंतले होते. मायबोलीकरांचा कंपू या वातावरणाला सरावलेला नसल्याने रोमात होता. जिप्सी आपली कामगीरी चोख बजावत होता. थोडी भीड चेपल्यावर मी ही जिप्सीच्या पाऊलावर कॅमेरा ठेवून दोन-चार फ्लॅश उडवू लागलो.
आनंद इंगळे
डावी कडे सुहास पळशिकर
उमेश कुलकर्णी, निखिल महाजन, श्रीरंग गोडबोले
गिरिश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर
सितार्यांना फोटोची विनंती करताच क्षणाचाही विलंब न लावता एक से एक झलक देत होते.
गिरिजा ओक
अमृता सुभाष
सचिन खेडेकर
साधारण आठच्या सुमारास चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी आपल्या चमूची ओळख करुन दिली.
Costume Designer
१९९२च्या पार्श्वभूमीवर साकारलेला या चित्रपटात गोपी काका, किरण करमरकर, भारती आचरेकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी या आघाडीच्या कलाकारांनी काम केले आहे.
सगळ्यां कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला संस्पेन्स-५२ बघण्याची संधी दिल्या बद्दल मी मायबोली माध्यम प्रायोजकांचा आभारी आहे.
धन्यवाद
छान वृत्तांत!! बघणेबल आहे का
छान वृत्तांत!!
बघणेबल आहे का पण पुणे ५२?
बापरे येवढ्यात लिहिलत
बापरे येवढ्यात लिहिलत सुध्धा.... व्हेरी गुड.... मला पण विपु आली होती.... पण जमलेच नाही....
किरण करमरकर केवढा म्हातारा दिसतोय !!! ( माझा कॉलेज मधला मित्र)... पण एक चांगले आहे की त्याने परत आपला मोर्चा मराठी कडे वळवला.... हिंदी सीरीयल मधे तो अडकला होता....
सिनेमाचा रीव्हु येउ दे आता !!!!
जिप्सीचे फोटो कुठे आहेत...?
छान लिहिले आहेस.... फोटो पण
छान लिहिले आहेस....
फोटो पण सुंदर आले आहेत सगळ्यांचे....
थोडीशी कथा पण चालली असती ....
मस्तच रे. सइचे फोटु जास्त
मस्तच रे.
सइचे फोटु जास्त आवडले.
सगळ्याजणींचे चेहरे कसले
सगळ्याजणींचे चेहरे कसले चकचकीत दिसताहेत!
...
...
"होउ दे जरासा उशीर" कोणी
"होउ दे जरासा उशीर" कोणी बघणार आहे का? परिक्षण टाका नक्की. ऑस्कर ला गेलाय तो का ते कळेल
बघणेबल आहे का पण पुणे
बघणेबल आहे का पण पुणे ५२?....... सई आहे ना बघणेबल.....
ईन्द्रा लेका नुसतेच फोटो टाकले आहेस... चित्रपटाविषयी काहिच लिहिले नाहि आहेस......... का बर???????????
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
फोटो छान. वृत्तांत कुठाय????
फोटो छान. वृत्तांत कुठाय????
पुणे-५२ परीक्षण पुणे-५२ - एक
पुणे-५२ परीक्षण
पुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा
किरण करमरकर केवढा म्हातारा
किरण करमरकर केवढा म्हातारा दिसतोय>>>>> +१११
खूपच वेगळा दिसतोय. पूर्वी टीव्हीवर मराठी सिरिअल्स मधे किती देखणा दिसायचा.
सई थोडी जाड वाटतीये
किरण करमरकर ओळखूच आला नाही.
किरण करमरकर ओळखूच आला नाही. लोकांच्या प्रतिसादावरुन परत फोटो पाहिले आणि तो दिसला
अॅक्चुअली, ४-५ ओळखीचे चेहेरे दिसले, बाकी कोणी ओळखू आले नाही.
इंद्रा, फोटो एकदम झक्कास
इंद्रा, फोटो एकदम झक्कास आलेत.
इंद्रा मस्तच रे झब्बू देऊ
इंद्रा मस्तच रे
झब्बू देऊ का?
इन्द्रा - यातील बरेच चेहरे
इन्द्रा - यातील बरेच चेहरे माहीत नाहीत. जरा नावे देतोस का?
गो. पु. देशपांड्यांच्या
गो. पु. देशपांड्यांच्या फोटोच्या वरचा त्या तीन मुलींचा फोटो सोडून बहुतेक सगळे ओळखले.
छान आहे फोटो वृतान्त पहिल्या
छान आहे फोटो वृतान्त
पहिल्या तीन फोटोन मधले श्रीरंग गोडबोले आणि आनंद इंगळे ओळखले,. सचिन खेडेकरच्या खालच्या फोटोत कोण आहे ? बरेचसे ओळखले
आनंद इंगळे / गिरीजा ओंक -गोडबोले /सुरुध गोडबोले/ श्रीरंग गोडबोले/सचिन खेडेकर/ भारती आचरेकर/सोनाली कुलकर्णी /गिरीश कुलकर्णी / सई ताम्हणकर / अमृता सुभाष /किरण करमरकर इं इं आहेत. मधल्या फोटोतल्या तीन मुलि नाही ओळखता आल्या
त्या तीन मुली इंडियन मॅजिक
त्या तीन मुली इंडियन मॅजिक आयच्या टीमपैकी असाव्यात.
आरे वा ! आता लवकरच जाउन
आरे वा ! आता लवकरच जाउन पाहायला हवा नाहीतर नेहमी प्रमाणे सस्पेन्स जायचा

धन्यवाद इंद्रधनुष्य ! प्र.ची.छान आलेत , सो.कु. अन सचीन खेडेकर अनुक्रमे सुंदर मस्त , र.च्या. क. ने सचीन चा शर्ट जाम आवडला....
छान आहे फोटो वृतान्त
छान आहे फोटो वृतान्त
मस्त रे इंद्रा
मस्त रे इंद्रा
हे वाचुन कळल की मी काय miss
हे वाचुन कळल की मी काय miss केल.
पण चित्रकोड्याची उत्तर कुठे post केलीत, ते pls कळवा.
इंद्रा मस्तच
इंद्रा मस्तच
एकही फोटू दिसत नाही असो.
एकही फोटू दिसत नाही
असो.
इंद्रा फोटो मस्तच. सोनाली,
इंद्रा फोटो मस्तच.
सोनाली, गिरीजा ओक व सचिन खेडेकरचा मस्तच.