कोल्हापूर जिल्ह्यात 'खिद्रापूर' या ठिकाणाबद्दल ऐकले होते. ऐतिहासिक लेणी आणि महादेवाचे मंदिर 'श्री कोपेश्वर' असलेले हे ठिकाण पर्यटन विभागाच्या नकाशावर नुकतेच आले. अगदी लहानपणापासून जायचे जायचे असं ठरवत या वर्षी मुहूर्त आला.
खिद्रापूरला जाण्यासाठी एक रस्ता कोल्हापूरमधून जातो, तो मला माहिती नाही आम्ही नरसोबाची वाडी-कुरुंदवाड-सैनिक टाकळी मार्गे गेलो होतो. वाडीपासून ३२ कि.मी. आहे. नुकतेच MTDC ने दिशाफलक लावल्यामुळे रस्ता सापडतो. गावात गेल्यावर हे मंदिर असे लगेच दिसत नाही. अनोळखी माणसे २-३ चकरा मारल्यावरच सरळ स्थानिकांना विचारण्याचा सोपा मार्ग अवलंबवतात. ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळच हे मंदिर आहे आणि कसलीही भव्यता अथवा उठून दिसेल असे काही नसल्यामुळे प्रवेशदारापाशी निराशा झाली. पण एकदा का आत प्रवेश केला की मग किती वेळ आत घालवला जातो हे कळतच नाही. अतिशय सुंदर आणि मोहक कलाकुसर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे
असे मानण्यात येते की इ.स. ११०९-११७८ दरम्यान गांधारादित्य. विक्रमादित्य व भोज-२ या शिलाहार राजांच्या कारकिर्दित हे मंदिर बांधण्यात आले. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान. 'कोपेश्वर' या नावामागची पौराणिक कथा रंजक आहे. शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही आणि म्हणून एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी महादेवास या ठिकाणी आणले गेले. 'कोप्'+'इश्वर' अर्थात महादेव
भग्नावस्थेत असले तरी मंदिर बर्यापैकी टिकून आहे, हत्ती, नक्षीदार खांब व रामायण, महाभारतातील प्रसंग, बारा राशींची चिन्हे, निसर्ग यांच्या कलाकुसरतेने अक्षरशः मढले आहे. प्रवेशद्वारातच वर्तुळाकार मोकळे छत आहे आणि त्याला आधाराला असलेल्या खांबांवर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नंतर सभामंडप, गाभारा लागतो जो अंधुक आहे आणि शिवलिंगाचे दर्शन होइल इतपतच प्रकाशमय आहे.
असं म्हणतात की मोगलांच्या नासधुसीमुळे मंदिराला अशी अवस्था आली आहे. ही अवस्था बघून वाईट वाटतं तसेच पर्यटन विभागाच्या कारभाराचा राग येतो.
काही प्रचि
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
तळटीप : वॉटरमार्क कसेही पडलेत, तेव्हढं सांभाळून घ्या ही विनंती
मस्त
मस्त
सहीच....
सहीच....
खासम खास फोटोज.. !
खासम खास फोटोज.. !
कसले भन्नाट आहे हे प्रकरण.
कसले भन्नाट आहे हे प्रकरण.
मस्त !
मस्त !
मस्त आहेत सगळेच फोटो
मस्त आहेत सगळेच फोटो
तिथले जे कुणी विश्वस्त वै
तिथले जे कुणी विश्वस्त वै असतील त्यांचे दगडावर भगवा किंवा इतर ऑईलपेंट न मारल्याबद्दल अभिनंदन.
सुंदर प्रचि. आम्ही कधी स्वनेत्रे पाहू की नाही ठाऊक नाही, दाखविल्याबद्दल धन्यवाद!
हा फटू सगळ्यात कातिल, अन त्याहून कातिल ती दगड कातण्याची कला. ग्रेटच!
>>तिथले जे कुणी विश्वस्त वै
>>तिथले जे कुणी विश्वस्त वै असतील त्यांचे दगडावर भगवा किंवा इतर ऑईलपेंट न मारल्याबद्दल अभिनंदन. >>> अगदी अगदी...
सुंदर प्रचि. आम्ही कधी स्वनेत्रे पाहू की नाही ठाऊक नाही, दाखविल्याबद्दल धन्यवाद!>>>>>+१
जबरदस्त. धन्यवाद रंगासेठ!!
जबरदस्त. धन्यवाद रंगासेठ!!
अशक्य भारी कोरीवकाम! फारसे
अशक्य भारी कोरीवकाम! फारसे प्रसिध्द नसलेल्या या खिद्रापूरबद्दल माहिती व प्रचित्रे इथे टाकल्याबद्दल कोटी कोटी आभार...
अजूनही अशा काही वेगळ्या देवळांबद्दल माहीती असेल तर बघायला / वाचायला नक्कीच आवडेल...
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्तच एकदम. पुढच्या वेळी
मस्तच एकदम. पुढच्या वेळी कोल्हापुरजवळ जाताना नक्कीच भेट द्यायला आवडेल. कोल्हापुरच्या देवळाप्रमाणेच इथेही सगळ्या मुर्तींचे हात पाय शीर तोडलेले दिसत आहे.
निव्वळ अप्रतिम!!!! जितकं
निव्वळ अप्रतिम!!!!
जितकं सुंदर मंदिर तितकीच देखणी फोटोग्राफी!!!!
मस्त मस्त मस्तच
धन्यवाद नक्की भेट द्या. मी
धन्यवाद नक्की भेट द्या. मी भर उन्हाळ्यात गेलो होतो. त्यामुळे रखरखाट जाणवत होता. पण आत्ता मस्त असेल वातावरण.
बाकीच्या अशासारख्या कमी परिचित स्थानांबद्दल तर भटके लोकच जास्त माहिती देतील (जिप्सी / यो रॉक्स ). पुण्याजवळपण नगर रोडवर 'निघोज' , सोलापूर रोडवरील 'भुलेश्वर मंदिर' पण सुरेख आहेत. आणि जिप्सीच्या कर्नाटक दौर्यातपण अशीच सुंदर मंदिरे पाहायला मिळाली.
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम फोटो हे मंदिर म्हणजे
अप्रतिम फोटो
हे मंदिर म्हणजे एक बार देखा है और एक बार देखनेकी चाहत है कॅटेगरीत आहे माझ्यासाठी.
ह्या डिशेंबरात जमवतोच.
फोटो छानच. २ वर्षांपूर्वी
फोटो छानच.
२ वर्षांपूर्वी ह्या मंदिराला भेट द्यायचा योग आला. भग्नावस्थेत असूनही त्याची भव्यता, कोरीवकाम सगळ आवडलं.
पण माझे फोटो नाही इतके चांगले आले.
आणि मला गाभारा जरा नाही जास्तच अंधारा वाटला.
मस्त आहेत सर्व फोटो. काही
मस्त आहेत सर्व फोटो. काही काही अँगल्स छान घेतले आहेत. आम्ही खिद्रापूरला गेलो होतो तेव्हा रस्ता इतका बेक्कार होता की गाडी रस्त्यातून चालली आहे की शेतातून असा प्रश्न पडावा.
http://www.maayboli.com/node/15085 हा घ्या आमचा झब्बू.
हे मंदिर इतके सुंदर असूनदेखील इथे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही; हे सर्वात खेदाची बाब. इथे मंदिराची माहिती सांगाय्ला गाईड नाही, स्थानिकांना माहिती विचारली की ते पुस्तक विकत घ्या म्हणून सांगतात. आजूबाजूला एकही छोटेसे का होइना पण हॉटेल नाही. वॉशरूमदेखील नाही.
सुंदर मंदीर, शिल्प आणि
सुंदर मंदीर, शिल्प
आणि अप्रतीम फोटो...
सर्वच फोटो अप्रतिम आलेत.
सर्वच फोटो अप्रतिम आलेत.
मला एकही फोटो दिसत नाही
मला एकही फोटो दिसत नाही
अप्रतिम... फोटो छान आहेत
अप्रतिम...
फोटो छान आहेत
मनसोक्त दर्शन झाले. त्या
मनसोक्त दर्शन झाले. त्या मंडपाला वर गोलाकार झरोखा आहे ना ? त्याचा नाही का एखादा फोटो.
खुप वेळा मी चौकशी केली, तर कोल्हापूर खिद्रापूर गाडी बंद झालीय, असेच सांगत. जायला मिळालेच नाही.
पावसाळ्यात तर जायची काहीच सोय नसते, असे सांगतात.
दिनेशदा, त्या गोलाकार मंडपाचा
दिनेशदा, त्या गोलाकार मंडपाचा फोटो नाही काढला आत्ता परत गेलो तर काढेन. आणि कुरुंदवाड पासून दोन रस्ते जातात एक शॉर्टकट जो नदीकाठा शेजारून शेतातून जातो जो खतरनाक आहे आणि दुसरा चांगला डांबरीकरण झालेला आहे, या रस्त्यामुळे ५-६ कि.मी. जास्त जावे लागते पण वेळ तेव्हढाच लागतो.
सुविधांबद्द्ल नंदिनीला अनुमोदन, काहीही सोय नाहीये. म्हणून कोल्हापूर केंद्रबिंदू धरून इथे यायचा प्लॅन करावा. हो वाटेत कुरुंदवाडचे पेढे खायला विसरू नका
मस्त फोटो !! नंदिनीने मागे
मस्त फोटो !! नंदिनीने मागे टाकले होते ते पण छान होते.
मस्त रे ... खुपच छान मंदिर
मस्त रे ... खुपच छान मंदिर आणि तितकेच छान प्रची.
सुंदर
सुंदर
सुरेख.
सुरेख.
अप्रतिम! सुरेख प्रचि.
अप्रतिम!
सुरेख प्रचि.
मस्तच मित्रा... कोरीव काम पण
मस्तच मित्रा...
कोरीव काम पण अफलातुन आहे.
प्रचि ८ तर तुफान आहे..
थोडासा sharpness जास्त झाल्यासारखा वाटतोय का?
Pages