ब्रिजमधील अशीच एक गम्मत
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
21
आई-वडील आल्यामुळे आणि जयपण ईंटरेस्ट घेत असल्याने आजकाल रोज ब्रिजचा 'अड्डा' बसतो/जमतो. कालची अशीच एक गम्मत.
आमचा तीन बिनहुकुमीचा कॉल होता. बदामात माझ्याकडे गुलाम आणि एक पत्ता, जयकडे राणी आणि दोन पत्ते, आईकडे एक्का आणि ३ पत्ते आणि दादांकडे राजा आणि तीन पत्ते. चाली आलटून-पालटून दोन्हीकडे जात होती आणि तरीही माझ्या गुलामाचा हात झाला आणि शेवटचा हात आमचा आवश्यक असा नववा झाला तो चवकट सत्तीचा ज्यावर बदामचे राणी, राजा आणी एक्का असे तिघेही सर झाले.
(कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणून इथे लिहीले आहे).
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
???
???
ब्रिजचे दिवस आठवले. माबो वर
ब्रिजचे दिवस आठवले. माबो वर ब्रिजचा बाफच नाही. हा होइल की आता.
ब्रिजचे दिवस आठवले. माबो वर
ब्रिजचे दिवस आठवले. माबो वर ब्रिजचा बाफच नाही. हा होइल की आता.
पूर्वी एका ग्रुपबरोबर ब्रिज
पूर्वी एका ग्रुपबरोबर ब्रिज खेळायचो. आता तो ग्रुप फुटला. बहुतेकांना ब्रिज येत नाही. काही काळ ब्रिजचा एक कॉम्प्युटर गेम खेळायचो. पण तो गेम करप्ट झाल्यामुळे खेळता येत नाही. कोणाकडे कॉम्प्युटरवरचा ब्रिजचा एखादा गेम आहे का?
आमच्या कंपनीच्या बसमध्ये
आमच्या कंपनीच्या बसमध्ये दररोज जाता येता आम्ही ब्रिज खेळायचो. त्यातील तरबेज लोकांना मग - "ब्रिजभुषण", "ब्रिजेश" वगैरे नावे द्यायचो.
Can you teach us bridge ?
Can you teach us bridge ?
>>(कुठेतरी लिहून ठेवायचे
>>(कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणून इथे लिहीले आहे).<<
छान.
>>(कुठेतरी लिहून ठेवायचे
>>(कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणून इथे लिहीले आहे).<<
तुम्हाला खरतर ह्याची गरज आहे.

ब्रिज शिकवा कोणीतरी इथे...
ब्रिज शिकवा कोणीतरी इथे... तेव्हढा एकच खेळ कधीच खेळलो नाहीये.. आणि खेळायची प्रचंड इच्छा आहे..
ब्रिजला चौघांचा ग्रुप पाहिजे.
ब्रिजला चौघांचा ग्रुप पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष खेळले पाहिजे. इथे शिकविणे अवघड आहे. कोणाकडे ब्रिजचा कॉम्प्युटर गेम आहे का? त्याचे फ्री डाऊनलोड उपलब्ध असल्यास, कृपया लिंक कळवा.
आम्ही मुंबईच्या लोकल
आम्ही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ब्रिजची स्केल डाऊन वर्जन खेळायचो - मुंबरी. गर्दी कधी जाणवायचीच नाही.
इथे समजतील ब्रिजचे बेसिक्स. पण खेळल्याशिवाय अंदाज नाही येत. ब्रिजवर मुबलक लिखाण उपलब्ध आहे.
ब्रिज खेळूनच जास्त पटकन
ब्रिज खेळूनच जास्त पटकन समजेल. पुर्वी चेस पत्राद्वारे खेळत तसे कोणी ब्रिज खेळेल (आज तरी) - मायबोलीवर सुद्धा असे वाटत नाही.
Bridge Base online हे फुकट
Bridge Base online हे फुकट आहे. गेली कित्येक वर्षे मी ऑन लाईन खेळतो. पण नेहेमीचा पार्टनर व जमल्यास चारी जण तेच तेच असल्याशिवाय ब्रिजची अनेक conventions चांगल्या रितीने आत्मसात करणे कठीण.
मागे एकदा काही महिने माझा भाऊ व त्याचा पार्टनर बंगलोरमधे, मी न्यू जर्सीत व मुलगा डेलावेअर मधे असे ऑन लाईन खेळत होतो. पण ते फार काळ टिकले नाही. नंतर माझा मित्र बडोद्यात व मी इकडे असे पार्टनर होऊन फक्त एक्स्पर्ट लोकांशी खेळणे असे ठरवून खेळत होतो. ते फार चांगले चालले होते. पण तेहि टिकले नाही.
पण अजूनहि मला ब्रिज बेस ऑन लाईनचा वाईट अनुभव आलेला नाही. वापरण्यास सोपा, व टेबल रिजर्व्ह करणे, डुप्लिकेट किंवा आय एम पी . वगैरे सवलती उपलब्ध आहेत. मागे एकदा ओळख देख नसता या साईटवर भेटून, आमचे जमले म्हणून काही अनोळखी व्यक्तींबरोबरहि ठरवून खेळलो!
आणि तरीही माझ्या गुलामाचा हात झाला
तसेच काहीसे अनेक वर्षांपूर्वी ऑफिसमधे खेळताना माझ्या पार्टनरने केले. आमचाहि तीन बिनहुकुमीचा कॉल होता. अश्या डावात सहसा पार्टनर व स्वतःकडे मिळून ज्या रंगाची जास्त पाने असतील, ते रंग आधी खेळतात व ज्याची पाने कमी असतील तो रंग आपणहून खेळत नाहीत. शिवाय प्रतिस्पर्धी, हातातला एक्का पहिल्या फटक्यात शक्यतो घेत नाहीत, खेळणार्याची इतर पाने मोकळी होऊ नयेत म्हणून.
माझ्याकडे डमीत राजा व एक पान, पार्टनरकडे त्या रंगाचे फक्त एक पान. पहिली खेळी जिंकून, जणू आपल्याकडे अनेक पाने आहेत त्या रंगाची असा विश्वास दर्शवत त्याने माझ्या राजाचा हात ताबडतोब घेऊन टाकला!
नि नंतर जास्त लोभ न ठेवता आठ हात घेऊन टाकले नि म्हणाला आता घ्या उरलेले चारी आणि प्रतिस्पर्धी बघत बसले - अरे, एक राजा गेल्यावर चांगले पाच सहा हात आपले झाले असते की!!!
माझ्याकडे 'Bridge Baron
माझ्याकडे 'Bridge Baron Version 6.02.10' हा ऑफलाईन गेम आहे. हा एकट्याने (उरलेले ३ खेळाडू गेम पुरविते) ऑफलाईन खेळता येतो. काही दिवसांपासून हा चालत नाही. बहुतेक हे जुने व्हर्जन विंडोज ७ वर चालत नसावे. ब्रिजचा असा एखाद ऑफलाईन गेम आहे का कोणाकडे?
मी खूप वर्षांपूर्वी खेळायचो,
मी खूप वर्षांपूर्वी खेळायचो, इतकी की आता विसरत चाललो.
बिनहुकमी डावात वेगळीच गम्मत असते आणि काय होईल सांगता येत नाही.
ब्रिज प्रत्यक्ष आमोरासमोर
ब्रिज प्रत्यक्ष आमोरासमोर बसून खेळण्यातच मजा आहे. कंप्युटरवर ब्रिज - ही कल्पना विशेष पटत नाहीय.
अरेच्च्या! हा धागा पाहिलाच
अरेच्च्या! हा धागा पाहिलाच नाही आधी!
मी माझ्या कॉलेजच्या दिवसांपासुन ब्रिज खेळतो.. व सध्याही नियमित (डुप्लिकेट ब्रिज)खेळतोच खेळतो.. पत्त्याच्या खेळात हा खेळ जे खेळतात ते या खेळाशी कधी अॅडिक्ट होतात ते समजतच नाही.. ही एक ज्यांना हा खेळ शिकायचा आहे त्यांना वॉर्निंग!
आशिग.. तु अनुभवलास त्याच्यापेक्षाही अनबिलिव्हेबल हँड्स ब्रिज खेळताना येउ शकतात...:)
मायबोलिवर ज्यांना ब्रिज शिकायचे आहे त्यांना मी मदत करु शकेन.. इथे ब्रिजचा बाफ कोणी उघडला तर त्यावर सोप्या भाषेत मी ब्रिजचे धडे देउ शकेन. पण एकदा बेसिक नियम समजल्यावर बाकीच्या सगळ्या खेळांप्रमाणे खेळुन खेळुनच ब्रिज आत्मसात करता येते.. प्रत्यक्ष खेळण्याला पर्याय नाही..
>>> ब्रिज प्रत्यक्ष आमोरासमोर
>>> ब्रिज प्रत्यक्ष आमोरासमोर बसून खेळण्यातच मजा आहे. कंप्युटरवर ब्रिज - ही कल्पना विशेष पटत नाहीय.
सहमत. पण ब्रिजसाठी अजून ३ खेळाडू आणणार कुठून? त्यामुळे संगणकावर खेळत होतो. दुधाची तहान ताकावर!
मुकुंद नेकी और पूछ पूछ...
मुकुंद नेकी और पूछ पूछ... तुम्हीच सुरु करा की नवीन धागा...
कंप्युटरवर ब्रिज - ही कल्पना
कंप्युटरवर ब्रिज - ही कल्पना विशेष पटत नाहीय.
सुरुवातीला मलाहि तसेच वाटले होते, पण अगदी अनोळखी लोक सुद्धा आपले नेहेमीचे एकत्र खेळणारे होऊ शकतात व मग जणू समोरासमोरच बसून खेळतो आहोत इतकी मजा येते.
काही लोकांना आपले 'मित्र' म्हणून लिहून ठेवले तर ते जर ऑन लाईन असतील तर आपल्याला लगेच कळते, मग चॅट करून एकाच टेबलावर खेळता येते.
तसा पूर्वी आमचा ३२, ३६ लोकांचा डुप्लिकेटचा ग्रूप होता, महिन्यातून एकदा जमायचो. पुढे घरी आलेल्या पाहुण्याला जेवायला घातल्याशिवाय कसे सोडायचे, शिवाय जेवण म्हंटले म्हणजे कसे चौफेर हवे, आग्रह करून खायला लावले पाहिजे, शिवाय इतर गप्पा, या भानगडींमुळे तो बंद पडला.
सध्या स्टँडर्ड अमेरीकनचे
सध्या स्टँडर्ड अमेरीकनचे प्रयोग सुरु आहेत आणि तो प्रकार आवडतो आहे. आज माझ्याकडे सात पानी इस्पीक (राणी आणि १० सोडून इतर ऑनर्स), बदाम राजा एकटा, आणि इतर दोन सुईट्समधे काही नाही. माझ्या १ S ला जयचा रिस्पॉन्स आला २ H चा. मी लगेच ४ S म्हणालो. त्याच्याकडे एकही इस्पीकचे पान नसतांना झाले आमचे