Submitted by सत्यजित on 8 September, 2008 - 13:00
आता श्रावण संपला, आणि नारळी पोर्णिमा पण झाली आता रहावत नाही हो... गणरायांना निरोप देताच घराघरातुन तळलेल्या माशांचा आणि तिरफळं घातलेल्या कालवणाचा तो घमघमाट उठेल आणि मन लहान होउन गाउ लागेल ...
असावा सुंदर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला
पापलेटच्या बंगल्याला सारंग्याचे दार
धार धार डेंग्यांच्या कुर्ल्या पहारेदार
गोल गोल कोळंब्यांच्या खिडक्या दोन
हॅल्लो हॅल्लो करायला लॉबस्टरचा फोन
मांदेल्यांचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यान्ना अंगभर खवले फार फार
बंगल्याच्या छतावर कालवा रहातो
शिंपीतल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबलाचा मासा मस्त चांगला...
कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला...
-सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
>>कित्ती
>>कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला

सोलकढी भातासंगे मस्त हाणला...
मासे खाणार्यांच्या तोपासु, हे नक्की!
सत्याभाय..
सत्याभाय.. सही.. मजा आली रे.
- अनिलभाई
हे काय बरं
हे काय बरं नाही हां. आमच्या सारख्या फ्रोझन फिले सोडून दुसरं काही क्वचित मिळाणार्यांना तुम्ही मांदेली, कर्ली, सुरमई यांची आठवण करून देता
आईशप्पथ
आईशप्पथ सत्यजित ... खल्लासच रे !
आपण स्वतःला मत्स्यगोत्री समजतो पण अजून असलं भन्नाट काही का सुचलं नाही ह्याचा अचंबा वाटतोय
>> बंगल्याच्या छतावर कालवा रहातो
>> शिंपीतल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो
>> लांब लांब करल्यांचा नाच रंगला
>> बोंबलाचा मासा मस्त चांगला...
>>कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
>> सोलकढी भातासंगे मस्त हाणला...
क्या बात है रे !!
जमल्यास हे 'बोंबील आख्यान' वाच; तुला आवडेल असं वाटतंय
मांदेली
मांदेली वॉव एकदम फेव मासा. त्याच्या कालवणाबरोबर नुसती तांदूळाची भाकरी नी दहा बारा मांदेल्या .. आहाहा.... मी तर अक्खा गिळायची नी मग फक्त मधला काटा हळूच बाहीर काढायची. एक चवीष्ट चव असते ह्याच्या कालवणाला.१० एक वर्षे झाली हा मासा खावून. अजून मिळतो का मुंबईत? कारण २ वर्षापुर्वी मुंबईत गेले तेव्हा घरी रोजचेच मासे होते सुरमई,बांगडा,बोंबील वगैरे वगैरे...
गणपती विसर्जन झाले की परत येताना पप्पा मार्केटात नी आम्ही पोरे घरी, आई वाटन वगैरे करून तयार. भरपूर मासे घेवून पप्पा घरी. हे ताव मार.
कशाला हे
कशाला हे असं काहितरी लिहावं...
नद्या वाहायला लागल्या ना इथे..
यव रे यव...
यव रे यव... सत्यजीत! माझ्या आवशिक व्हरान दाखवतय ह्या तुझा माशाचा 'कवतिक'.... जेवताना वाचुक होया
गावाल्यान
गावाल्यान्नु तुमचा येवढा प्रेम गावला, माका बरा वाटला... माका माहीत व्हाता हे वाचान तुमचो गांजो चुरचुरतलो. बॅगलोरात चांगला म्हावर गावात न्हाय ना, म्हनुन ह्या लिवान आणि वाचान मासे खाउची मनषा भागवतय, तुम्ही पण भागवा मरे. कित्या रडतास...?
त्या लॉबस्टराक शेवुट म्हनतात न गावा कडे? कुना नक्की माहीत हा काय?
संदिप मस्त रे... आपल्या सारख्या मासेहारींच्या उचंबळुन आलेल्या भावना आहेत ह्या.. आयला कळफळीवर लाळ सांडलीना वाचताना...
दाद, आवशीक कळव आणि माका दहा बारा तुकडि पाठवुन देउक सांग तिका....
आहाहाहा!
आहाहाहा! सहीच! चॉकलेटच्या बंगल्यापेक्षा हा बंगला जास्त टेम्पटींग आहे

-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
खल्लास रे
खल्लास रे सत्या
-प्रिन्सेस...
सत्याभाय,
सत्याभाय, एकदम सही. सर्व मानवजातीत सारस्वत लोक देवाचे विशेष आवडते. म्हणूनच त्याने पहिला अवतार मत्स्यावतार घेतला.
विंदांची एक छोटीशी कवीता आहे:
शांत्या शिंदळीच्या! तू खरा सारस्वत
देवाने मत्स्यावतार घेतला हे ऐकून
तू पिशवी घेउन बाजारात गेलास... (चु.भु.द्या.घ्या.)
>>शांत्या
>>शांत्या शिंदळीच्या! तू खरा सारस्वत
देवाने मत्स्यावतार घेतला हे ऐकून
तू पिशवी घेउन बाजारात गेलास...
मस्तच!!
मस्तच,
मस्तच, वाचुनच खुप भुक लागली आता. माझ्या लेकीला वाचुन दाखवीन घरी गेल्यावर. एकदम खुश होईल.
खरच सारस्वत लोकांना मासे म्हणजे पंचपक्वानच वाटतात.
सत्यजित मस
सत्यजित
मस्त लिहीलयस
सुधीर
मांसाहार
मांसाहार नाही करत पण मैत्रिणींकडून वरील माशांची नावे ऐकली होती त्यामुळे वाचून जाम मजा आली. सगळे मासे फिट्ट बसवलेत तुमच्या बिल्डरने
मायबोलीवर
मायबोलीवर पुर्वी पापलेट या नावाचा आय डी होता....... ( जुन्या हितगुज वर) तो कुठे गायब झाला ?
सत्यजीत,
सत्यजीत, झकास जमलीय! मत्स्यगोत्रींचा जीव आता कासावीस होणार!
बंगलोरला असता का? रसल मार्कॅटला जाऊन बघा. कधीतरी बोंबील, मांदळी, तिसर्या आणि बांगडे मिळतात. नाहीच मिळाले तर मुंबई भेटीत, 'मसाला लावून फ्रीझ केलेले मासे' थर्मकोलच्या डब्यात, बर्फात घालून आणावे. (जमल्यास तेव्हड्यासाठीतरी विमानप्रवास करावा म्हणजे केबिन बॅगेत टाकता येतात.)
>> 'मसाला
>> 'मसाला लावून फ्रीझ केलेले मासे' थर्मकोलच्या डब्यात, बर्फात घालून आणावे.
क्या बात है मृ !! हा नुस्खा आम्ही भारतातून बोंबील आणण्यासाठी वापरलाय
आवडलंच !
आवडलंच ! पापलेट खाताना आता हा बंगला आठवणार
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
नुसते
नुसते वाचूनच तोंडाला पाणी सुटले रे .....
सत्या
सत्या मस्त..
मासे खात नाही तरिही आवडला हा बंगला
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
मी तर एकदा
मी तर एकदा सुखी मासळी मस्त pack करून बाहेरून perfume मारून वरती कपडे असे आणले होते एकदम सुरवातीला ८ -९ वर्षापुर्वी. आता माहीत नाही असे आणू शकतो की नाही ते.
आईग!!! माझी
आईग!!! माझी तर नेहेमीच वानवा असते खायची आणि आता तर अगदी पारच जीवावर बेतल
आई गं....
आई गं.... कसलं पाणी सुटलंय तोंडाला..... अरे अजून अनंत चतुर्दशी व्हायचीये रे आमची

एकदम चपखल बसलेत सगळे मासे........ चविष्ट झालाय तुझा बंगला
सत्या, मजा
सत्या, मजा इली. छान लिवलहस.
आवडला
आवडला पापलेटचा बंगला
मस्तच!!!!
अरे अजून अनंत चतुर्दशी व्हायचीये रे आमची >>>>>>
जयावी आमची सुद्धा त्यामुळे सध्या फक्त वाचुनच समाधान
भन्नाट रे
भन्नाट रे सत्यजीत!!! सहिच!!!
अशा बंगल्यात रहायला मला आवडेल नक्की!!
अरे वाह..
अरे वाह.. काय बंगल्यावर गर्दी उडाली आहे... आभार..
पावन्यान्नु असेच येवत रव्हा... माव्हरा जेवत रव्हा... बंगलो बांधलेलो असा तुमच्याच साठी...!
मन्या भाऊ ... हा हा हा ...
शांत्या शिंदळीच्या! तू खरा सारस्वत
देवाने मत्स्यावतार घेतला हे ऐकून
तू पिशवी घेउन बाजारात गेलास...
खल्लास...
मित्रा
मित्रा जबरदस्त,
जरा अगोदर येउन पहायला पाहिजे होत. श्रावण पाळ्लेल्यान्च्या दुखा:वर जरा आमसुल चोळता आली असती , आता जरा उशिरच झाला.
हाहाहा ...
हाहाहा ... हे वाचलंच नव्हतं मी. अफलातून आहे रे!
परागकण
Pages