रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
माझ्या दोन कथाही मायबोली वर आहेत.
http://www.maayboli.com/node/33497
http://www.maayboli.com/node/33369
--१--
जयंत शहाचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पडले होते म्हणण्यापेक्षा बसले होते. वरळीच्या त्यांच्या सागर मंझीलच्या पार्कींग लॉट मधेच त्याचा कुणीतरी गाडीतच गेम केला होता. जुनी इमारत आणी रात्रीची वेळ असल्यामुळे लॉटमधे कुणीच नव्हते. गाडीची पुढची काच उघडीच होती आणी खुन्याने अगदी जवळुन डोक्यात आणी छातीत गोळ्या झाडल्या होत्या.
शहा ही मुंबई जगतातील बडी असामी होती. आई जन्मत:च गेली होती. एकटा असल्यामुळे लाडातच वाढला होता. हर्षद मेहताच्या नादाला लागुन वडीलांनी सर्व संपत्ती आणी आपला हिऱ्याचा व्यापार घालवला होतता आणी आत्महत्या करुन सुटका करुन घेतली होती. नशीबाने वरळीचा फ्लॅट तसाच होता.
पंचविशीतच शहा एकटाच वरळीत रहात होता. वडीलांच्या पासुनच कोणी नातलग फीरकत नव्हते. नाही म्हणायला दिवसात एक नोकर येउन जायचा.
शहा होता हिकमती. बी. कॉम होता. बापाच्या धंद्यामुळे हिऱ्यांची चांगली पारख होती. मार्केटमधे ओळखी होत्या. छोटी मोठी डील करु लागला. जात्याच गोडबोल्या आणी डॅशींग असल्यामुळे जम बसायला वेळ लागला नाही. पंचरत्न मधे जश कॉर्पोरेशनच्या नावाने गाळा घेतला. धंद्यात पहील्या पासुनच त्याने चित्रपट सृष्टीतले, शेअर मार्केटमधले, सरकारी अधीकारी व राजकारणी कस्टमर जोडले होते. त्यांचा पैसा काळा का गोरा ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नव्हते. ह्या लोकांकडे बक्कळ पैसा असतो आणी त्यांना हिऱ्यातल काहीही कळत नाही एवढ्या दोन गोष्टी त्याला धंद्याकरता पुरे होत्या. जम बसल्यावर त्याने बॅंकॉक , दुबई अशा वाऱ्या सुरु केल्या.
चार पाच वर्षातच शहा उच्चभ्रु वर्तुळात उठबस करु लागला. सिने जगतातल्या छोट्या मोठ्या नट्यांबरोबर दिसु लागला. अशातच त्याला माखानी भेटला. राहुल माखानी. तसा सीए होता पण केसेस सगळ्या अंडरवर्ल्डच्या. माखानीचे डोके व शहाचे लागेबांधे ह्यातुन जश टेक्स्टाईल्स उभे राहीले. बंद पडलेली एक मील लीज वर घेउन त्यांनी पुर्ण नवी मशीनरी टाकली. त्याच्या टेक्नीक करता माखानीने याकुबला आणले. याकुब ईराकला मील चालवत होता. अमेरीकन हल्ल्यानंतर तो भारतात परतला. तल्लख व हुशार इंजीनीअर होता. मीलच्या सर्व टेक्नीकल जबाबदाऱ्या त्याने उचलल्या. याकुबचे मीडल इस्ट मधे भरपुर ओळखी होत्या, त्यातुनही त्याने मशीनरीची चांगली डील्स केली.
मीलला भांडवल बरेच लागणार होते. शहाने जशचे शेअर्स जवळच्याच लोकांना ४०% टक्के डिव्हीडंड कबुल करुन विकले. शहावर विश्वास असल्याने लोकांनीही भरभरुन दिले. लोक आता हर्षद मेहताही विसरली होती. माखानी मागेच होता. साल्याच डोक अफाट होत. उलट्यासुलट्या उड्या मारुन त्याने एक पैसाही न घालवता कंपनीची ५०% मालकी शहाच्या व त्याच्या नावावर केली होती. वरुन बंद गिरणी चालु करुन शेकडो लोकांना रोजगार मिळवुन दील्याबद्दल सरकारकडुन ग्रॅंटही उकळली होती.
कंपनीची उलाढाल गेल्या चार वर्षात ५०० कोटींवर पोहोचली होती व कंपनीने भारतातल्या प्रमुख शहरात तसेच दुबई, शांघाय, सिंगापुर अशी आउट्लेटस उघडली होती. टेक्स्टाईल्मधे इंम्पोर्ट एक्स्पोर्ट्चा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढवला होता. शेअर होल्डर्सना ६०/७०% टक्के डीव्हीडंड मिळत असल्याने सगळेच खुश होते. डायरेक्टएर बोर्ड नावालाच होते. कंपनी प्रायव्हेट असल्याने सेबी कींवा कुणाचीही कटकट नव्हती. शहा जरी चेअरमन असला तरी सर्व काम माखानी आणी याकुबच बघत असत तर शहा फक्त मिरवत असे. बाहेरच्या जगात माखानी आणी याकुब कुणाला माहीतही नव्हते.
जश म्हणजे शहा हे समीकरण लोकांच्या डोक्यात ठाम बसले होते. त्याच्या पोरींच्या भानगडी , त्याच्या पार्ट्या, त्याच्या आलीशान गाड्या हे मीडीयाचे आवडते खाद्य होते. नाही म्हणले तरी आज त्याची मालमत्ता काही कोटीत होती आणी असा हा शहा कुत्र्याच्या मॊतीने आज पार्कींग लॉटमधे गाडीत मेला होता.
बारा वाजता ईमारतीत रहाणारा कुणाल आला. गाडी पार्क करेपर्यंत त्याला शेजारच्या गाडीतुन तीन वेळा तरी मोबाईलचा आवाज आला होता. गाडीत कोणीतरी झोपले आहे असे त्याला दिसले. शहाची गाडी त्याने ओळखली. काय वैताग आहे म्हणुन कुणाल गाडीकडे गेला. परत त्याला मोबाइलची रिंग ऐकु आली. अंधारात त्याला वाटले की शहाला पार्टी जरा जास्तच झाली असावी. कारच्या उघड्या खिडकीतुन त्याने शहाला हालवले आणी तो स्वत:च हादरला. कारण शहा चक्क सीटवरच लवंडला होता. त्याला उठवण्याकरता दार उघडले. लाइटच्या प्रकाशात त्याला झालेला प्रकार दिसला. खर तर तो भेदरलाच होता पण शांत डोक्याने त्याने शहाची नाडी बघीतली. डोळे बघीतले. शहा मेलाच होता. दार आणी खिडकीची काच लावुन त्याने दारातल्या गुरख्याला मोबाइल केला.
" बहादुर, मी कुणाल बोलतोय. गेटला कुलुप लाव. आणी इकडे पार्कींग मधे ये "
"कशाला साहेब ? "
" हे बघ उगीच चॊकशा करु नकोस. चटकन ये. "
" कुणी आले म्हणजे ?"
" करतील मोबाइल. तु लगेच इकडे ये बघु" गुरखा दोन मीनीटातच आला.
" हे बघ. तु इथे या गाडीजवळ उभा रहा. कुणालाही गाडीला हात लावु देउ नकोस"
" शहा साहेबांची गाडी दिसतीय. पण ते तर तासाभरापुर्वीच आले होते. "
" फार चॊकशा नकोत. मी येतोच पाच मिनीटात. आणी हो कुणाला बाहेर जायचे असले तरी मी येइ पर्यंत थांबव"
कुणालने घरातल्या लॅंडलाईनवरुन फोन करुन कंट्रोल रुमला माहीती दिली. कपडे बदलुन तो खाली गेला व बहादुरला त्याने गेटवर पाठवले.
" बहादुर आता तु गेटवर जा पण कुणालाही आत सोडु नकोस कींवा बाहेर जाउ देउ नकोस. "
" का साहेब. ?"
" हे बघ सांगीतले तेवढेच कर. आणी थोड्या वेळाने पोलीस येतील त्यांना आत पाठव."
---२---
क्राईम ब्रॅंचचे ई. राणे एक रुबाबदार व्यक्तीमत्व होते. हाय प्रोफाईल केसेस मधे बहुतेक त्यांनाच पाठवले जायचे. होते डीसीपी पण ई. म्हणवुन घेणेच त्यांना आवडायचे. मीडीयाचा केंव्हा वापर करायच आणी केव्हा मीडीयाला पलटी द्यायची त्यांना चांगले ठाउक होते. सागर मंझील मधे ते दोन तीन हवालदारांना घेउन आले . कुणाल गाडीजवळ उभाच होता.
" आपण कोण ?"
" मी कुणाल कोहली. मीच पोलीसांना फोन केला होता."
" काय भानगड आहे. खुनाची केस म्हणुन मी आलो. बॉडी कुठे आहे ?"
" साहेब, गाडीत बॉडी आहे. "
राणेंनी रुमाल हातात घेउन गाडीचे दार उघडले. आत लवंडलेले प्रेत दिसले.
" हं मग तुम्ही का मारलत याला ? आणी कोण आहे हा ? "
" साहेब ह्याचे नाव जयंत शहा. ह्या इमारतीत सहाव्या मजल्यावर ६१ नं ला राहतो. "
" काय जयंत शहा ? म्हणजे जश चा मालक.? अहो कोहली तुम्ही भलतेच लचांड मागे लावुन दिलेत. आता सी एम पासुन फोनाफोनी. मीडीयाच्या ब्रेकींग न्युज. मुंबाईत पोलीस झोपलेत का? अहो जरा कुणा फालतु माणसाचा तरी खुन करायचात. आणी तुम्ही ईथे काय करताय ? "
" मी इथेच तीसऱ्या मजल्यावर रहातो. आणी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आत्ताच आलो. गाडीत मोबाईल बर्याच वेळा वाजला म्हणुन गाडीजवळ आलो तर मला प्रेत दिसले. गाडीची पुढची काच उघडीच होती. कुणाला पोलीस यायच्या अगोदर कळायला नको म्हणुन मी लावुन घेतली."
" शिंदे. तुम्ही गेटवर जा. गुरख्याला येथे पाठवुन द्या. तो जर काही रजीस्टर ठेवत असला तर ते घेउन बोलवा"
" बर साहेब."
" आणी फोरेन्सिक टीमला फोन करुन बोलावुन घ्या"
गुरखा रजीस्टर घेउन आला.
" काय बहादुर कीती वर्ष झाली इथे?"
" सहा वर्ष झाली साहेब. रात्री पहारा देतो. दिवसा एक वेगळा सिक्युरीटीचा माणुस येतो. "
" मराठी छान आहे. केंव्हा आलास नेपाळ्हुन ?"
" कसले नेपाळ साहेब ? साताऱ्याकडचा आहे. पहारा देतो म्हणून सगळे गुरखा म्हणतात. "
" बर. ही गाडी ओळखतोस ?"
" शहा साहेबांची "
" केंव्हा आले ?"
गुरख्याने रजीस्टर बघुन सांगीतले.
" ११.०५ ला साहेब "
" एकटेच होते?"
" नाही. कुणीतरी पोरगी होती "
" नाव ?"
" माहीत नाही. शहा साहेबांना नाव विचारलेले आवडायचे नाही."
" अजुन कोण कोण आल आणी गेले ?"
" ११.०५ ला शहा साहेब आले. नंतर ११.१० ला काशीनाथ तारी आला. तो साहेबांच्या कंपनीत कामाला होता. तो ११.३०ला घाइघाइत बाहेर गेला. १२ वाजता कुणाल साहेब आले आणी १२:४३ ला तुम्ही आलात. "
" ठीक आहे. जा तु गेटवर आणी आमच्या हवालदाराला पाठवुन दे"
" साहेब काय झाले "
" गावडे ह्याला आत घेरे. सांगतो भड्वीच्याला "
" चुकले साहेब"
राणे हा फार कुशल पोलीस अधीकारी होता. त्यांनी पकडलेल्या केसेस क्वचीतच सुटत असत.
" कोहली तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न विचारल्याबद्दल राग आला असेल पण आमच्या दृष्टीत सर्व़च संशयीत असतात. "
" मला माहीती आहे कारण मी बातमीदार आहे "
" बोंबला ! म्हणजे आता मीडीयाला काय थोपवणार ?"
" साहेब तुमची कीर्ती मी ऐकुन आहे. तुम्ही परवानगी दिल्याशिवाय मी न्युज नाही देणार. नाहीतर तुम्हाला फोन करण्याआधी मी न्युज दिली असती"
तेवढ्यात फोरेन्सिकची गाडी आली. डॉग स्क्वाडही आले होते.
" अरे ह्या कुणालचेही प्रिंटस घ्या "
" फोटो ही घ्यायचेत का? "
" नाही पण प्रिंट घ्यायला लागतील कारण त्याने दहा ठीकाणी हात लावला असेल. "
" साहेब बॉडी स्टीअरींगवर होती. मी हात लावल्यावर पडली"
" ठीक आहे. सावंत आहे तसे फोटो घ्या नंतर बॉडीला बसवुन परत घ्या, कोहली शहा एकटेच रहात होते का ? "
" हो. पण एकटे कधीच नसायचे "
" म्हणजे?"
" कुणीतरी पोरगी बरोबर असायचीच. "
" आज ही कुणीतरी होतीच की . ती कुठे असेल?"
" ६१ मध्रेच असेल"
" खाली कशी आली नाही?"
" एकतर ती नवथर असेल. भेदरुन गेली असेल. दुसरे म्हणजे शहाचा मोबाइल नं तीच्याकडे नसेल."
" सावंत जरा तो मोबाइल प्रिंट करुन मला द्या पाहु. मिस कॉल्स बघुदेत. "
फोनवर मिस कॉल्सच नव्हते.
" कोहली तुम्ही तर म्हणताय फोन ऐकुन तुम्ही गाडीकडे आलात पण मी्स कॉल्स तर नाही आहेत. "
" साहेब मला क्लीअर मोबाईल रिंग ऐकु आली. "
" सावंत गाडीत दुसरा मोबाईल आहे का बघा."
" साहेब गाडी डस्ट करुन झाली आहे. गाडी टो करुन लॅबला न्यावी लागेल. दुसरा फोन नाही"
" मग बॉडीच्या खिशात आहे का बघा"
" साहेब एक अर्धा तास लागेल. खर म्हणजे आम्ही लॅब मधेच खिसे तपासतो कारण फील्ड्मधे महत्वाचा पुरावा हरवण्याची शक्यता असते, त्यामुळे बॉडी बॅग मधे घातली आहे. परत सगळे उघडायला लागेल."
" नको राहु देत."
" पण साहेब बॉडी ठेवत असताना एकदा रिंग ऐकु आली होती."
" बर आहे. तुमचे आवरले की तुम्ही निघा. आणी मिडीयाला बाइट देउ नका. "
" ओके. आणी साहेब गाडीत मोजुमा परफ्युमचा वास आहे. शहाच्या बॉडीला ब्रुट्स्चा आहे"
" कोहली धन्यवाद. जरुर पडल्यास बोलवुच. आता जरा ६१ मधे जातो."
" राणे साहेब मी तुमच्या बरोबर येउ का? "
" नकॊ .मीडीयातील एकाला फेवर केल्याचा आरोप यायचा"
" साहेब प्लीज. आता योगयोगाने ह्या भानगडीत सापडलोच आहे तर जरा द्या ना परवानगी"
" बर चला. आणी तीथे कोणच्याही कॉमेंट्स करायच्या नाहीत आणी पोलीसांबद्दल लिहायचे नाही. सावंत ह्यांची झडती घ्या आणी सर्व काढुन घ्या. खाली आल्यावर परत करु "
छान
छान
चांगली आहे सुरुवात! पण एक
चांगली आहे सुरुवात! पण एक सांगू का, इतके भाग एकदम नका पोस्ट करू
रोज एक किंवा एक दिवसा आड एक असे टाका म्हणजे लोकांना वाचायला उसंत मिळेल !
अरे व्वा ... मायबोलीवर नविन
अरे व्वा ... मायबोलीवर नविन कादंबरीकार !
अविनाशराव मस्त लिहीताय!