दररोज काही ना काही

Submitted by drsavita on 4 September, 2008 - 18:45
गुलमोहर: 

दररोज काही ना काही घडणारे घडतच असते
हसणारे हसतच असते रडणारे रडतच असते
तू उगाच होशी उदास होणा-या कुचंबनेने
वाचून आपुल्या कोणाचे काहितरी अडतच असते
मिरवण्याचा सोस हा ज्यांना मिरवू देत खुशाल
हिसकावून घेणा-याचे काळीज सडतच असते
या उसण्या हसण्याची लाली ते खुशाल लावू दे ओठी
अंतर्मन खरेतर त्यांचे आत आत कुढतच असते
डावपेच चालू दे त्यांचे मज तूज थांबवण्याचे
घोडे त्यांचे परी अपुल्या वाचून अडतच असते
तू नको काळजी वाहू त्यांच्या सुरेख दिसण्याचे
मुखवट्याआडुन सत्य कधी उघडे पडतच असते

छान आहे... थोडी आत्ममग्न, अन् थोडी व्यवहारीक

गोदेय

गोदेयला अनुमोदन.